जळगाव – प्रतिनिधी अनुभूती निवासी स्कूलच्या दिल्ली सीआयएससीई बोर्डच्या इयत्ता 12 वी आयएससीच्या निकालात आत्मन अशोक जैन हा 97.75 टक्के गुणांसह शाळेत दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला, तसेच तो शाळेच्या विज्ञान शाखेतून प्रथम आला आहे. त्याला गणित विषयात पैकीच्या पैकी 100 गुण मिळाले तर इंग्रजीत 98, केमिस्ट्रीत 97, फिजीक्स 96, कॉम्प्युटर 96 असे गुण प्राप्त झाले आहेत. त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतूक होत आहे. संपूर्ण भारतातून 96,940 विद्यार्थ्यांनी 12 वी इयत्तेसाठी परिक्षा दिली. त्यापैकी 96,340 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यात 45,579 विद्यार्थीनी तर 50,761 विद्यार्थी यांचा समावेश आहे. अनुभूती स्कूलमधून 29 विद्यार्थी या परिक्षेला बसले होते अभ्यासात सातत्य हेच यशाचे…
Author: Saimat
जळगाव – प्रतिनिधी अनुभूती निवासी स्कूलच्या दिल्ली सीआयएससीई बोर्डच्या इयत्ता 12 वी आयएससीचा निकाल नुकताच जाहिर झाला. यामध्ये अनुभूती स्कूलच्या 12 वी इयत्तेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले. स्कूलच्या स्थापनेपासून 100 टक्के निकालाची परंपरा यावर्षीदेखील कायम राहिली आहे. आयसीएसई बोर्डच्या 12 वी इयत्तेत 29 विद्यार्थी परिक्षेला बसले होते. यापैकी वाणिज्य शाखेतील विद्यार्थीनी रितीका अरूण देवडा ही 99.25 टक्के गुणांसह पहिली आली. आत्मन अशोक जैन (97.75 टक्के) द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला असून आत्मन हा शाळेच्या विज्ञान शाखेतून प्रथम आला आहे. संपूर्ण भारतातून 96,940 विद्यार्थ्यांनी 12 वी इयत्तेसाठी परिक्षा दिली. त्यापैकी 96,340 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यात 45,579 विद्यार्थीनी तर 50,761 विद्यार्थी…
मुंबई : प्रतिनिधी राज्यातल्या सत्तांतरानंतर पहिल्यांदाच माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांची ‘सामना’साठी (Saamana)कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut)यांनी मुलाखत घेतली आहे.या मुलाखतीत ठाकरे यांनी राजकीय घडामोडीवर भाष्य करत बंडखोरांवर निशाणा साधला. आज आणि उद्या ही मुलाखत प्रदर्शत होणार आहे. या मुलाखतीवर मनसेने (MNS)व्यंगचित्राच्या माध्यमातून सडकून टीका केली आहे. “साहेब’ जैसा जैसा बोले हा तैसा तैसा चाले म्हणून यांचे आस्तित्व बुडाले”, असे म्हणत मनसेने शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी एक व्यंगचित्र शेअर केले आहे. या चित्रात मुलाखतीला सुरुवात करण्याआधी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंमधील…
मुंबई : प्रतिनिधी महाविकासआघाडी सत्तेत असतानाच शिवसेनेत एक असंवादळ आलं, ज्यामुळं पक्ष पुरता हादरला. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा एक मोठा धक्का होता. पक्षातील एक मोठं नाव, एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांच्या साथीनं बंडखोरी केली आणि महाराष्ट्राच्या राजकारणानं सर्वांच्या नजरा वळवल्या. पक्षात बंडखोरी झाल्यानंतर पहिल्यांदाच राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक जाहीर मुलाखत दिली. संजय राऊत यांनी घेतलेल्या या मुलाखतीत ठाकरेंनी काही प्रश्नांवर स्पष्ट उत्तरं दिली. मातोश्रीशी जोडली गेलेली नाळ असो किंवा वर्षावरील वास्तव्य. इथपासून त्यांनी बंडखोरी झाली, पण नेमकं इथं काय चुकलं? या प्रश्नाचंही उत्तर दिलं. यावेळी चूक आपलीच असल्याचं ते वारंवार म्हणताना दिसले. गुन्हा माझाच……
मेष राशी: आज मेष राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. नोकरदार लोकांच्या प्रभावात वाढ होईल आणि कार्यक्षेत्रात लाभाचे स्थान प्रबळ होईल. कुटुंबात कोणत्याही प्रकारचा शुभ कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो. मित्रांसोबत मजेशीर क्षण घालवू शकाल. आज तुमचे नातेवाईक आणि मित्रांसोबतचे संबंध सुधारतील. विपणन आणि विक्री क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी दिवस थोडा व्यस्त असेल. काही लोक आर्थिक बाबतीत चिंतित राहतील आणि त्यांची कमाई वाढवण्याची योजना आखतील. आज ८९% नशिबाची साथ आहे. शिवाचा अभिषेक उसाच्या रसाने किंवा पाण्यात गुळ मिसळून करावा. वृषभ राशी: वृषभ राशीच्या लोकांचा आजचा दिवस उत्साहाने भरलेला असेल. तुम्ही तुमच्या कामात अधिक सक्रिय असाल. व्यवसायात चांगले आर्थिक लाभ होतील आणि…
भुसावळ : प्रतिनिधी शहरातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले असतांनाही भुसावळात आढळून आल्याने खरांत बंधूंसह चौघांना अटक करण्यात आली आहे. मिळालेली माहिती अशी की, नगरपालिकेचे माजी नगरसेवक राजकुमार खरात, त्यांचे बंधू राजन खरात यांच्यासह त्यांच्या साथीदारांना भुसावळ पोलीस प्रशासनाने गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे. मात्र हद्दपार असतांनाही ते शहरात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या अनुषंगाने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरील समता नगरातील खरात यांच्या घरी पोलिसांनी छापा टाकला. या पथकात शहर पोलीस स्थानकाचे निरिक्षक गजानन पडघन, बाजारपेठ ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड आणि त्यांच्या सहकार्यांचा समावेश होता. या पथकाला राजकुमार खरात आणि राजन खरात यांच्यासह दोन…
साईमत लाईव्ह अमळनेर प्रतिनिधी येथील अॅड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या दहावी व बारावी विद्यार्थ्यांचा केंद्रीय शिक्षण बोर्ड दिल्ली (सीबीएससी) दिल्लीच्या वतीने घेण्यात आलेल्या बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत घवघवीत यश संपादन करत विद्यार्थ्यांनी उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. बारावीत प्रथम क्रमांक पटकावत यश महाजन ९४.२० पार्थ पंत ८८.८० पियुष चंद्रे ८७ प्रथमेश कौजलगी८४.२० करिष्मा पाटील ८२.८० हे विद्यार्थी प्रथम पाच आलेले आहेत. तर , दहावीत रुद्रेश गांगुर्डे९७.४० भक्ती मेटकर ९१.४० वसुंधरा शिंदे ८८ स्नेहल पाटील८४.६० भूमिका डिंकराई ८०.८० हे विद्यार्थी प्रथम पाच आलेले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा अॅड.ललिता पाटील, सचिव प्रा.श्याम पाटील , संचालक पराग पाटील,…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था कोरियन वाहन उत्पादक कंपनी ह्युंदाई गेल्या काही वर्षांपासून भारतीय बाजारात दुसऱ्या स्थानावर होती. मात्र गेल्या काही महिन्यांपासून भारतीय वाहन निर्माती कंपनी टाटा मोटर्सकडून ह्युदाईला तगडं आव्हान मिळू लागलं आहे. मे महिन्यात टाटाने ह्युंदाईचं बाजारातलं दुसरं स्थान हिसकावलं होतं. तेव्हापासून ह्युंदाई कंपनी भारतीय वाहन बाजारात आक्रमकपणे नवीनवीन उत्पादनं लाँच करतेय. गेल्या महिन्यात ह्युंदाईने भारतात त्यांची वेन्यू ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही नवीन अवतारात लाँच केली. त्यानंतर कंपनीने त्यांची प्रीमियम एसयूव्ही ह्युंदाई टक्सनवरून (Hyundai Tucson) पडदा हटवला आहे. आता कंपनी आगामी काळात भारतीय वाहन बाजारात अनेक नवीन उत्पादनं लाँच करणार आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार ह्युंदाई मोटर इंडिया कंपनी आगामी काळात…
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील सत्तापालटानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका करायला सुरुवात केली आहे. शिवसेनेत फूट पडण्यासाठी उद्धव ठाकरे हेच सर्वस्वी जबाबदार आहेत. खरी शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबरच संपली, उद्धव ठाकरे यांच्या सध्याच्या शिवसेनेचा बाळासाहेबांच्या विचारांशी कोणताही संबंध नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. त्यानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनीही ट्विट करून बाळासाहेब ठाकरे यांचे खरे राजकीय वारसदार राज ठाकरे हेच असल्याचे अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला होता. मनसेच्या या टीकेला आता शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आहे. शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी मनसेला चोख प्रत्युत्तर दिले आहे. त्या सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. बाळासाहेबांच्या…
नवी दिल्ली: प्रतिनिधी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray )यांचा पुतळा महाराष्ट्र सदनमध्ये तसेच तैलचित्र नवीन संसदेच्या इमारतीमध्ये लावण्यासाठी सर्व खासदारांनी मागणी केली आहे. त्यावर पंतप्रधान मोदींकडे (PM Modi)पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी सांगितले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu)यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत आले होते. त्यांनी शिंदे गटाच्या सर्व खासदारांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. शिंदे गटाचे लोकसभेतील गटनेते राहुल शेवाळे (Rahul Shewale)यांनी मुख्यमंत्र्यांना एक निवेदन दिले. बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा महाराष्ट्र सदनात उभारण्याची त्या निवेदनात मागणी केली आहे. त्याबाबत लवकरच पंतप्रधानांना निवेदन देणार असल्याचे शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. राज्यातून यूपीएससीच्या अभ्यासासाठी शेकडो विद्यार्थी दरवर्षी…