साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बांधकामाची आणि खर्च करण्याची मुदत 31 मार्च 2022 रोजी संपलेली असताना आज सुद्धा बांधकाम अपूर्णच असल्याने बांधकाम विभाग जिल्हा परिषद जळगाव कार्यकारी अभियंता आणि रावेर जिल्हा परिषद बांधकाम उपविभागीय अभियंता यांच्यावर जिल्हा परिषद सदस्यांचा आणि संबंधित ठेकेदार यांचा प्रभाव असल्याचे प्रत्यक्ष उदाहरण यावल तालुक्यातील म्हैसवाडी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या बांधकामावरून ग्रामस्थांना दिसून येत असल्याने यावल रावेर तालुक्यात याबाबत जोरदार चर्चा सुरू असली तरी ग्रामस्थांनी 6 जून 2022 रोजी केलेल्या तक्रारी नुसार रावेर येथील जिल्हा परिषद बांधकाम उपविभागीय अभियंता आणि जिल्हा परिषद जळगाव बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता काय कारवाई करणार याकडे म्हैसवाडी ग्रामस्थांसह संपूर्ण…
Author: Saimat
मुक्ताईनगर प्रतिनिधी:- राज्यात सत्तांतर झाल्यांनतर राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुक्ताईनगर मतदार संघातील सावदा , बोदवड व मुक्ताईनगर पालिका हद्दीतील रखडलेल्या पायाभूत व मुलभूत सुविधांसाठी नमूद कामांच्या सूचीनुसार निधीसह मंजुरीची मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी लेखी पत्राद्वारे केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी मुक्ताईनगर मतदार संघाला मोठे गिफ्ट दिले असून सुमारे 20 कोटीच्या विविध विकास कामांना मंजुरी दिली. यात मुक्ताईनगर शहरातील दिवा स्वप्न ठरलेले व्यापारी संकुल (शॉपिंग कॉम्प्लेक्स) साठी 4 कोटी रु. च्या तरतुदीसह मंजुरी मिळाली असून मुक्ताईनगर शहर टपरी मुक्त करून छोटे छोटे व मोठे व्यावसायिक यांना न्याय देणार असल्याचे वचन आमदार चंद्रकांत…
साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी बदलती जीवनशैली आणि जंकफूडच्या आहारी गेलेल्या लोकांमध्ये पौष्टिक पदार्थ खाण्याचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे. हिरव्या भाज्या नेहमीच आरोग्यासाठी गुणकारी असतात. त्यांचे नियमित सेवन केल्याने त्या आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवते. हिरव्या भाज्यांमध्ये काही भाज्या कमी वेळेत अधिक परिणामकारक ठरतात. काटवल ही शरीरावर वेगाने परिणाम करणारी भाजी आहे. कटूले सर्वांत ताकदवान भाजी मानले जाते. ही भाजी अनेकदा औषध स्वरूपातही वापरली जाते. शहरांमध्ये पावसाळ्यात रानभाज्या विकायला येतात. याच काळात शेतशिवारात काटवल ही वेलवर्गीय फळभाजी येते. ती भाजी फक्त पावसाळ्यात खायला मिळत असल्यामुळे त्या भाजीला खूप लोकांची पसंती असते. काटवलाचा बाजारभाव आता वाढला आहे. ८० ते ९० रुपये…
साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी राष्ट्रवादी कॉग्रेसचे जेष्ठ नेते आ. एकनाथराव खडसे यांच्या कन्या अॅड. रोहिणीताई खडसे यांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्याला खुप दिवस झाले, तरी त्याची चौकशी थंड बसत्यात आहे, राजकीय दबाव मुळे ही चौकशी होत नसल्याचा आरोप आ. खडसे यांनी केला असून या प्रकरणी आपण औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करणार असल्याची माहिती आ .एकनाथराव खडसे यांनी माध्यमांसमोर दिली आहे. राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते आ. एकनाथराव खडसे यांच्या कन्या अॅड. रोहिणीताई खडसे यांच्या वाहनावर सहा महिन्यापूर्वी मुक्ताईनगर शहरातील गुंडांनी हल्ला चढवला होता, याचा तपास नाशिक कमिशनर कडे दिला होता. ते कमिशनर बदलले आता दुसरे कमिशनर आले, तरीही याची चौकशी पूर्ण झालेली नाही,…
साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी स्वस्त धान्य दुकानातून रेशन कार्डधारकांना स्वस्त धान्य घेण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने तसेच तालुक्यातील अनेक रेशन दुकानदार पुरवठा विभागाच्या अटी शर्तीच्या भंग करीत असल्याने तसेच यावल तहसीलदार महेश पवार यांच्यासह पुरवठा निरीक्षक हे जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याने यावल तालुका भीम आर्मी लवकरच आंदोलन छेडणार असल्याचे तालुकाध्यक्ष यांनी प्रवीण डांबरे सांगितले. यावल तालुक्यात ग्रामीण भागात व शहरी भागात अनेक स्वस्त धान्य दुकानदारांना शासनातर्फे धान्य पुरवठा मिळाल्यानंतर काही स्वस्त धान्य दुकानदार आपल्या दुकानात निश्चित अशा वेळेवर उपस्थित राहत नसल्याने तसेच स्वस्त धान्य दुकानात प्रत्येक रेशन कार्ड धारकास किती धान्य मिळणार? दुकानात उपलब्ध धान्य साठा किती? धान्य वाटपचे…
साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी सोयगाव पंचायत समितीच्या सहा गणांसाठी गुरुवारी दि . २८ पंचायत समितीच्या सभागृहात विशेष भूसंपादन अधिकारी संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे . त्यामुळे आता सोयगाव तालुक्यात जिल्हा परिषद , पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल वाजले आहे . त्यामुळे सोयगावात राजकीय वातावरण तापले आहे . सोयगाव पंचायत समितीच्या आमखेडा , फर्दापूर , सावळदबारा , बनोटी , निंबायती , आणि गोंदेगाव या सहा गणांसाठी आरक्षण व सोडत काढण्यात येणार आहे . त्यासाठी नियंत्रण अधिकारी म्हणून भूसंपादन अधिकारी संदीप पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून तहसीलदार रमेश जसवंत , नायब तहसीलदार हेमंत तायडे , विठ्ठल जाधव , आदी सोडतीची…
साईमत लाईव्ह नंदुरबार प्रतिनिधी एकीकडे शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. राज्यातील असंख्य पदाधिकारी आणि शिवसैनिक शिंदे गटात सामील होताना दिसत आहेत. तर दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना समर्थन देण्यासाठी हजारो शिवसैनिक मोतोश्रीवर पोहचत आहेत. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी बंडखोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केल्याने नंदुरबार जिल्ह्यात शिवसेनेत मोठे खिडार पडले होते. मात्र ही पोकळी सोमवारी आमदार आमश्या पाडवी यांनी साडे सात हजार कार्यकर्त्यांचा पाठींबा सादर करून भरून काढली. आता शिवसेना तळागाळात रुजवण्याचे काम करू अशी ग्वाही यावेळी, शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंना दिली. साहेब, आम्ही निष्ठावंत शिवसैनिक आहोत, अखेरच्या…
साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी राज्य सरकारतर्फे एसटी महामंडळाच्या नव्या बस आणि डिझेलच्या बसचे सीएनजीमध्ये रूपांतर करण्यासाठी २९८ कोटी ८३ लाख रुपयांचा निधी वितरित करण्याचा निर्णय सोमवारी जाहीर करण्यात आला. या निधीच्या माध्यमातून महामंडळाच्या बस स्थानकांचे बांधकाम, पुनर्बांधणी आणि आधुनिकीकरणदेखील करण्यात येणार आहे. राज्य सरकारतर्फे यंदाच्या अर्थसंकल्पात एसटी महामंडळासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या. महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षांत महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी चार हजार १०७ कोटी रुपयांची आर्थिक मदत केली होती. त्यानंतर आता २९८ कोटींच्या निधीच्या वितरणाची घोषणा राज्य सरकारतर्फे करण्यात आली आहे. एसटी महामंडळाच्या आधुनिकतेसाठी पावले उचलण्यात आली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून एसटीच्या बस आगारांचे आधुनिकीकरण करून प्रवाशांना चांगल्या सुविधा…
जळगाव -प्रतिनिधी अनुभूती निवासी स्कूलच्या दिल्ली सीआयएससीई बोर्डच्या इयत्ता 12 वी आयएससीचा निकाल नुकताच जाहिर झाला. यामध्ये अनुभूती निवासी स्कूलची रितीका देवडा ही विद्यार्थीनी देशातून सीआयएससीई रॅंकच्या मेरिटमध्ये तिसरी तर अनुभूती स्कूलमधून ती पहिली आली आहे. वाणिज्य शाखेतील रितीका अरूण देवडा हिला 99.25 टक्के गुण प्राप्त झाले आहेत. तसेच रितीका ही वाणिज्य शाखेतून अनुभूती स्कूलमध्ये प्रथम आली आहे. संपूर्ण भारतातून 96,940 विद्यार्थ्यांनी 12 वी इयत्तेसाठी परिक्षा दिली. त्यापैकी 96,340 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यात 45,579 विद्यार्थीनी तर 50,761 विद्यार्थी यांचा समावेश आहे. अनुभूती स्कूलमधून 29 विद्यार्थी या परिक्षेत बसले होते. शिक्षकांच्या अथक परिश्रमातुन यश – रितीका देवडा शिक्षकांनी सांगितलेला अभ्यासाच्या…