सोयगाव पंचायत समितीच्या सहा गणांसाठी गुरुवारी आरक्षण सोडत

0
3

साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी

सोयगाव पंचायत समितीच्या सहा गणांसाठी गुरुवारी दि . २८ पंचायत समितीच्या सभागृहात विशेष भूसंपादन अधिकारी संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे . त्यामुळे आता सोयगाव तालुक्यात जिल्हा परिषद , पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल वाजले आहे . त्यामुळे सोयगावात राजकीय वातावरण तापले आहे . सोयगाव पंचायत समितीच्या आमखेडा , फर्दापूर , सावळदबारा , बनोटी , निंबायती , आणि गोंदेगाव या सहा गणांसाठी आरक्षण व सोडत काढण्यात येणार आहे . त्यासाठी नियंत्रण अधिकारी म्हणून भूसंपादन अधिकारी संदीप पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून तहसीलदार रमेश जसवंत , नायब तहसीलदार हेमंत तायडे , विठ्ठल जाधव , आदी सोडतीची प्रक्रिया राबविणार आहे . सोयगाव पंचायत समिती निवडणुकीसाठी कोणताही बदल झालेला नसून सोयगाव शहर वगळता जिल्हा परिषदेचे तीन गट , व सहा गणांसाठी सोयगाव तालुक्यात निवडणुका होवू घातल्या आहे . यासाठी गुरुवारी आरक्षण व सोडत काढण्यात येणार आहे .

जिल्हा परिषद , पंचायत समितीसाठी नव्याने नागरिकांचा मागासप्रवर्गसाठी आरक्षणमध्ये समाविष्ट करण्यात आल्याने सोयगाव तालुक्यात सहा गनांपैकी दोन गण नागरिकांचा मागासप्रवर्ग साठी आरक्षित होण्याची शक्यता आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here