हल्ल्याप्रकरणी याचिका  खंडपीठात दाखल करणार – आ. एकनाथराव खडसे

0
2

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी

राष्ट्रवादी कॉग्रेसचे जेष्ठ नेते आ. एकनाथराव खडसे यांच्या कन्या अ‍ॅड. रोहिणीताई खडसे यांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्याला खुप दिवस झाले, तरी त्याची चौकशी थंड बसत्यात आहे, राजकीय दबाव मुळे ही चौकशी होत नसल्याचा आरोप आ. खडसे यांनी केला असून या प्रकरणी आपण औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करणार असल्याची माहिती आ .एकनाथराव खडसे यांनी माध्यमांसमोर दिली आहे.
राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते आ. एकनाथराव खडसे यांच्या कन्या अ‍ॅड. रोहिणीताई खडसे यांच्या वाहनावर सहा महिन्यापूर्वी मुक्ताईनगर शहरातील गुंडांनी हल्ला चढवला होता, याचा तपास नाशिक कमिशनर कडे दिला होता. ते कमिशनर बदलले आता दुसरे कमिशनर आले, तरीही याची चौकशी पूर्ण झालेली नाही, राजकीय दबाव पोटी हे घडत आहे, त्याच प्रकरणातील गुन्हेगार परवाच्या मुक्ताईनगरच्या घटनेमध्ये होते, म्हणून आता आम्ही औरंगाबाद खंडपीठाकडे  दाद मागणार आहोत, अशी प्रतिक्रिया आ. एकनाथराव खडसे यांनी माध्यमांना दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here