राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी :संजय राऊत म्हणाले…

0
3

राज्यपालांच्या मुंबई बद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यावर खासदार संजय राऊत यांनी 4 ट्विट करत भाजपची कानउघडनी केली आहे. महाराष्ट्रात भाजपा पुरस्कृत मुख्यमंत्री होताच मराठी माणूस आणि शिवरायांचा अपमान सुरू झाला.स्वाभिमान अभिमान यावर बाहेर पडलेला गट हे ऐकूनही गप्प बसणार असेल तर शिवसेनेचे नाव घेऊ नका. मुख्यमंत्री शिंदे राज्यपालांचा साधा निषेध तरी करा.मराठी कष्टकरी जनतेचा हा अपमान आहे. थोडा जरी अभिमान असेल तरी राज्यपालांचा राजीनामा घ्या, नाहीतर शिवसेनेचे नावही घेऊ नका असा हल्ला खासदार संजय राऊत यांनी भाजपवर चढवला आहे.

मराठी माणसाला आवाहन

आता तरी, ऊठ मराठ्या ऊठ, शिवसेना फोडून बुळबुळीत सरकार का आणले याचा खुलासा भाजप राज्यपालांनी केला आहे. बुळबुळीत गटाचे लोक उठणार नाहीत. मराठ्या तुलाच उठावे लागेल. असा टोला त्यांनी शिवसेनेतून एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या खासदार, आमदारांच्या गटाला लगावला आहे.

मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्र वेगळा?

थोडक्यात काय तर महाराष्ट्र व मराठी माणूस भिकारडा आहे. 105 मराठी हुतात्म्यांचा असा अपमान मोरारजी देसाई यांनी देखील केला नव्हता.मुख्यमंत्री शिंदे ऐकताय ना, की तुमचा महाराष्ट्र वेगळा आहे. स्वाभिमानाचा अंश उरला असेल तर आधी राज्यपालांचा राजीनामा मागा. दिल्ली पुढे किती झुकताय? असा सवाल संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विचारला आहे.

झाडीवाले कुठे लपले?

काय ती झाडी, काय तो डोंगर, काय नदी, आणि आता काय हा मराठी माणूस, महाराष्ट्राचा घोर अपमान! 50 खोके वाले आता कोणत्या झाडी डोंगरात लपून बसलेत असा सवाल संजय राऊतांनी विचारला आहे. .

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here