राज ठाकरेंना यांना दिले शपथपत्र ; पहा जसेच्या तसे

0
1

औरंगाबाद : प्रतिनिधी
राजकारणात पदोपदी रंग बदलणारे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा अनेकदा अनुभव येतो. पण सत्ता असो नसो, एकदा एखाद्या नेत्याचे नेतृत्व मान्य केले तर ते शेवटपर्यंत कायम ठेवायचे अशी उदाहरणे क्वचितच पहायला मिळतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या अशाच एका मनसैनिकाने ‘मी स्वतःला आपणास अर्पण करत आहे’ असे चक्क शपथपत्राद्वारे लिहून दिले आहे.

राज ठाकरे एक उत्तम राजकारणी, प्रभावी वक्ते म्हणून देशाला परिचित आहेत. स्वतःचा पक्ष स्थापन केल्यावर पहिल्याच विधानसभा निवडणुकीत तेरा आमदार निवडूण आणत राज ठाकरे यांनी आपले कर्तुत्व सिध्द केले होतेच. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीतही मनसेच्या उमेदवारांनी लाखांच्यावर मते घेत आपले नाणे खणखणीत असल्याचे दाखवून दिले होते.

परप्रांतीयांविरुध्दचे आंदोलन असो, की राज्यातील टोल नाक्‍यांच्या विरोधात केलेले खळ खट्याक असो, राज ठाकरेंची ही स्टाईल महाराष्ट्रातील तरुणाईला चांगलीच भावली. त्यामुळे आजच्या घडीला महाराष्ट्राच्या विधानसभेत एकमेव आमदार असला तरी राज ठाकरे यांच्याकडे तरुणांचा असलेला ओढा काही केल्या कमी झालेला नाही.

राज ठाकरेंची ही जादू मनसे सैनिकांवर कशी कायम आहे, याचे एक ताजे उदाहरण औरंगाबाद येथे पहायला मिळाले. बिपीन शंकरसिंग नाईक या मनसेच्या जिल्हा संघटकाने राज ठाकरे यांच्यावर असलेली निष्ठा दाखवण्यासाठी चक्क शपथपत्र लिहून दिले आहे. विशेष म्हणजे 29 नोव्हेंबर रोजी आपल्या वाढदिवशीच बिपीन नाईक यांनी मुंबईत कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरे यांना हे शपथ पत्र दिले आहे. राज ठाकरे यांनी देखील नाईक यांच्या या संकल्पाचे कौतुक केले.

बिपीन नाईक यांनी लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की
मा. श्री. राज ठाकरे साहेब…
“मी बिपीन शंकरसिंग नाईक पक्षाच्या स्थापनेपासून आपल्या ध्येय धोरण व विचारांशी जोडला गेलेलो आहे. आपल्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद येथे पक्षकार्यात होईल ते मनापासून योगदान देण्याचा आजपर्यंत पुर्णतः प्रयत्न करत आलो आहे, आणि पुढेही करत राहणार.

आज माझ्या वाढदिवसानिमित्त मी आपणास हे शपथपत्र लिहून देतो की, माझ्या शेवटच्या श्‍वासापर्यंत मी आपल्या विचारांशी व नेतृत्वाशी बांधील राहील. मी पक्ष कार्यात स्वतःला तन-मन-धनाने वाहून घेतलेले आहेच. परंतु कितीही कठीण परिस्थीती उद्भवली, तरी आपली साथ सोडणार नाही. मी आपल्या व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी प्रामाणिक राहून एक सक्रिय निष्ठावान म्हणून मी स्वतःला आपणास अर्पण करीत आहे’.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here