मेष- आज दिवसभर तुम्हाला थकवा राहील. संध्याकाळी मित्रांसोबत फिरायला जाऊ शकता. साखरेची मिठाई दान करा. वृषभ- आजच्या दिवशी व्यावसायिक प्रवास फायदेशीर ठरणार आहे. कोणतेही व्यवहार अतिशय काळजीपूर्वक करा. मिथुन- आजच्या दिवशी कोणाचीही थट्टा करू नका. तर विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास करावे. कर्क- या राशीच्या व्यक्तींनी आज कुटुंबात वाद घालू नये. तर गरजूंना मदत करा. सिंह- आजच्या दिवशी विचार सकारात्मक ठेवणं फायदेशीर ठरेल. तर नोकरीसाठी अर्ज करा. कन्या- आजच्या दिवशी कामाचा ताण वाढू शकतो. आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या. तूळ- आजच्या दिवशी घाईघाईने वाहन चालवू नका. घराच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या. वृश्चिक- आजचा दिवशी धावपळीचा असणार आहे. घरातील छोट्या छोट्या गोष्टींवर कोणाशीही वाद…
Author: Saimat
सातारा : वृत्तसंस्था सातारा जिल्ह्यातील दत्तनगर-कोडोली येथे आज सकाळी धाकट्या भावाने कुटुंबात झालेल्या भांडणाच्या कारणातून थोरल्या भावाच्या १० महिन्यांच्या बाळाला विहिरीत फेकल्याची धक्कादायक संतापजनक घटना उघड्कीस आली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, आरोपीने बाळाला दुकानात घेऊन जातो, असं सांगून सातारा-रहिमतपूर रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीमध्ये फेकून दिले. या कृत्याची माहिती आरोपी धाकट्या भावनेच थोरल्या भावाला फोन करून सांगितली. ही माहिती देऊन तो घटनास्थळावरून पसार झाला. अक्षय मारुती सोनवणे असं संशयित आरोपीचे नाव असून सदर घटनेत लहानग्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेतील आरोपीला सातारा शहर व एमआयडीसी पोलिसांनी काही तासांतच अटक केली आहे. याबाबतचे वृत्त पसरताच दत्तनगर- कोडोली येथे खळबळ उडाली…
साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी मागच्या महिन्यापासून राज्याच्या राजकारणात बऱ्याच राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. युवापिढी राजकारणात सक्रिय झाल्याचे दिसत आहे. मनसे नेते अमित ठाकरेदेखील सध्या दौरा करत आहेत आणि सर्वसामान्य लोकांशी, तरुणांशी, विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवण्याचे ते प्रयत्न करत आहेत. अश्यातच त्यांनी आगामी निवडणुकांविषयी मोठे विधान केले आहे. “येणारी प्रत्येक निवडणूक आपल्यासाठी महत्त्वाची आहे. आपल्या पक्षाने केलेलं काम आणि विचार घरोघरी पोहचवू. येत्या निवडणुकीत चांगला आणि निवडून येणार उमेदवार द्यायचा आहे आपला निवडून आणण्यासाठी पुरजोर प्रयत्न करायचे आहेत. त्या निवडणुकांमध्ये प्रचार करण्यासाठी मी तयार आहे. कुठलीही निवडणूक लागली तरी मला हाक द्या. आपण जोरदार प्रचार करू. आपल्याला प्रत्येक…
पाचोरा : प्रतिनीधी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत १३ ते १५ ऑगस्ट या काळात केंद्र सरकारच्या सूचनेनुसार ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने आज शहरातील शाळेच्या विद्यार्थ्यांनी ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेचे रॅलीद्वारे आवाहन करण्यात आले. शहरातील गोसे हायस्कूल, नवजीवन विद्यालय जागृती विद्यालय या शाळेच्या माध्यमातून मुख्याध्यापक व शिक्षकांच्या आदेशाने शालेय विद्यार्थ्यांचे युनिफॉर्म मध्ये राष्ट्रध्वज हातात घेऊन भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये ‘हर घर तिरंगा’ होना चाहिये , भारत माते की जय, जवान जय किसान, झाडे लावा झाडे जगवा, अशा विविध देशभक्तीपर नारे देऊन घोषणा देत रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये गोसे हायस्कूलचे विद्यार्थी, नवजीवन शाळेचे विद्यार्थी…
साईमत लाईव्ह जामनेर प्रतिनिधी जामनेर तालुक्यातील पहुर पेठ येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत शिक्षा अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पहुर पेठ ग्रुप ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच नीता ताई पाटील हे होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य राजदर पांढरे, माजी कृषी सभापती प्रदीप लोढा, ईश्वर बाबूजी,पतसंस्थेचे चेअरमन भास्कर पाटील, धनगर समाज उत्तर महाराष्ट्र प्रमुख रामेश्वर पाटील, माजी कृषी सभापती संजय देशमुख, शिवसेना प्रवक्ता तथा पत्रकार गणेश पांढरे, ग्रामपंचायत सदस्य शरद पांढरे, ईश्वर बारी, माजी उपसरपंच इका पैलवान ग्रामपंचायत सदस्य इरफान शेख, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रियाज शेख, ग्रामपंचायत सदस्य शाबिन शेख इरफान, राष्ट्रवादी काँग्रेसचे…
साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी सध्या राज्याच्याराजकारणात बरेच बदल होत आहे. शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आदित्य ठाकरे अधिक आक्रमक झाल्याचं दिसतंय. ते अधिक ठामपणे शिवसेनेची बाजू मांडताना दिसत आहेत. ते सध्या दौरा करत आहेत. पक्षातील नेत्यांशी, सर्वसामान्य लोकांशी बोलून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. अश्यातच त्यांचे बंधू आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी त्यांच्या या दौऱ्यावर टीका केली आहे. अमित ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंच्या रॅलीवर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. “शिवसेनेत बंड होण्याआधी मी माझे दौरे सुरू केलेत. पण माझा आदित्य ठाकरेंना प्रश्न आहे. जर एकनाथ शिंदे यांचं बंड झालं नसतं तर तुम्ही दौरा केला असता का, एवढाच…
साईमत लाईव्ह रावेर प्रतिनिधी रावेर तालुक्यात निमड्या या गावात आदिवासी महिला निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. ग्रामपंचायत निवडणुकीत तिचा विजय झाल्याने संपूर्ण कुटुंबासह समर्थकांनी जल्लोष केला बायको ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाल्यामुळे नवऱ्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यामुळे त्याने विजयी झालेल्या बायकोला थेट चारचौघातच कडेवर उचलून घेतले आणि जल्लोष केला. जळगाव जिल्ह्यात घडलेल्या या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रावेर ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल काल शांततापूर्ण वातावरणात पार पडला. रावेर तालुक्यात निमड्या या गावात आदिवासी महिला निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. ग्रामपंचायत निवडणुकीत तिचा विजय झाल्याने संपूर्ण कुटुंबासह समर्थकांनी जल्लोष केला. कुटुंबीयांनी महिलेच्या गळ्यात हार घातले. तर नवऱ्याने तहसील आवारातच उत्साहात बायकोला…
साईमत लाईव्ह बुलडाणा प्रतिनिधी बुलडाणा : सोन्याच्या दागिन्यांच्या दुकानातून चोरी करणारी एक महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दुकानदाराच्या समोरुन सोन्याची पोत लांबवणाऱ्या महिलेची हातचलाखी कुणाच्याच नजरेत आली नाही. मात्र सीसीटीव्हीने या महिलेचा बरोबर पकडलं. अखेर या चोरट्या महिलेची ओळख पटली असून आता तिचा शोध घेणं सुरु आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघा अज्ञात महिलांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढीत तपास आता केला जातो आहे. बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर शहरातील सराफा दुकाना 22 ग्रॅम सोन्याची पोत चोरण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. अखेर सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर खरेदीच्या बहाण्याने दुकाना शिरलेल्या दोघींपैकी एकीने विक्रेत्यांना गंडवून सोन्याची पोत लांबवली असल्याच स्पष्ट…
साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी यावल तालुक्यात बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गाला लागून तसेच यावल चोपडा रस्त्यावर यावल तहसील कार्यालयापासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या हडकाई-खडकाई नदी पूर रेषेला लागून असलेली 50 लाख रुपये किमतीची असलेली शेतजमीन अकृषिक परवानगी साठी फक्त 20 हजार रुपये घेऊन सोयीस्कर चौकशी यावल मंडळ विभागातून करण्यात आली असल्याचे तसेच मालेगाव,धुळे या नंतर आता यावल तालुक्यात लॅण्ड ‘जिहाद’ चा प्रभाव वाढत असल्याने अकृषिक परवानगी चौकशी प्रकरण प्रांत अधिकारी कैलास कडलग यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन सखोल चौकशी केल्यास वस्तुस्थिती समोर आल्याशिवाय राहणार नाही असे यावल तालुक्यात बोलले जात आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की यावल तहसील कार्यालयापासून दोन किलोमीटर…