साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी
भारतात दुर्मिळ असलेला अंडी खाऊ निम विषारी जातीचा साप यावल तालुक्यात रिधोरी गावात एका व्यक्तीच्या घरात आढळून आल्याने याबाबतचे रेस्क्यू सर्पमित्र तथा वन्य पशुपक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अजय कोळी (रा. खिर्डी)यांच्या मार्गदर्शनाखाली सदस्य किशोर सोनवणे यांनी यशस्वीरित्या पार पाडले सदरची घटना ही आज सोमवार दि.8 ऑगस्ट 2022 रोजी रात्रीच्या वेळेस घडली.
यावल आणि रावेर तालुक्याच्या सीमेवर असलेल्या रिधोरी गावात गब्बर या नावाने परिचित असलेल्या जितेंद्र भीमराव गवळी यांच्या घरात
आज श्रावण सोमवारच्या रात्री 12 ते 1 वाजेच्या सुमारास दुर्मिळ भारतीय अंडी खाऊ साप आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली त्यांनी तात्काळ गावातील सर्पमित्र किशोर सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वन्य पशुपक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अजय कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू सुरू करून त्या दुर्मिळ निम विषारी सापास पकडले हा पकडलेला साप आज दि.8रोजी यावल वनविभाग वनक्षेत्रपाल विक्रम पदमोर यांच्या ताब्यात दिला जाणार असून वन विभागामार्फत हा साप सातपुडा जंगलात सोडला जाईल अशी माहिती सर्पमित्र किशोर सोनवणे यांनी दिली.
या पकडलेल्या भारतीय अंडी खाऊ निम विषारी सापाची माहिती पुढील प्रमाणे आहे.
या सापाची अंदाजे सरासरी लांबी 80 सें.मी.2 फूट 7 इंच, रंग व आकार- तपकिरी शरीरावर पुढील भागात काळसर तपकिरी,फिकट पिवळसर धब्बे, पोटाकडील भाग पिवळसर व त्यावर काळसर ठिपके, मोठे काळे डोळे व डोळ्याची बाहुली उभी,निमुळते चपटे शरीर निमूळते डोके.
प्रजनन ची माहिती सध्या उपलब्ध नाही, खाद्य- मुख्यता लहान अंडी सर्पोध्यानात सरडे खाल्ल्याचे नोंद आहे.हा निम विषारी साप मुख्यतः अमरावती,वर्धा,यवतमाळ परिसरात आढळतो.याचे वास्तव्य जमिनीवर असते आणि हा झाडावर सुद्धा चढू शकतो.
याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे निशाचर,डिवचला गेला असता तोंड उघडे ठेवून हल्ला करतो, हा साप नामशेष झाला असा समज होता परंतु 2005 साली अमरावती परिसरात याचे अस्तित्व दिसून आले बाह्य दर्शनी नानेटी तस्कर किंवा मांजऱ्या सापासारखा दिसतो,याची अंडी खाण्याची पद्धत वैशिष्ट्यपूर्ण आहे, याच्या सुरुवातीच्या मणक्यांना खाली आलेला पात्यासारखा भाग असतो अन्ननलिकेतून अंडे गिळले जात असताना अंड्यावर या भागाचा दाब पडतो व ते फुटते.फुटलेल्या अंड्यातील द्रव्य पदार्थ अन्ननलिकेत जातो पण कवच मात्र अन्ननलिकेच्या सुरुवातीला असलेल्या कप्प्यात अडकून राहते. थोड्या वेळाने या कवचाची गुंडाळी तयार होऊन ती तोंडावाटे बाहेर टाकली जाते.अशी या दुर्मिळ निम विषारी सापाची माहिती आहे.आणि ही माहिती वन्य पशुपक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अजय कोळी आणि सदस्य सर्पमित्र किशोर सोनवणे यांच्या माध्यमातून रिधोरी या ग्रामीण भागासह यावल रावेर तालुक्याला, पर्यायी जळगाव जिल्ह्याला या रेस्क्यू मधून मिळाली.