जिल्ह्यात पुरवठा विभागात नवीन आकृतीबंधामुळे 40 कर्मचारी अतिरिक्त ठरल्याने वाऱ्यावर

0
4

साईमत लाईव्ह जळगाव  प्रतिनिधी 

जळगाव जिल्ह्यात पुरवठा विभागात नवीन आकृतीबंध, कायदा,नियम,निर्णय लागू करण्यात आला यात पुरवठा विभागातील एकूण 40 कर्मचारी अतिरिक्त ठरल्याने या अतिरिक्त कर्मचाऱ्यांची पोस्टिंग/नियुक्ती आता कुठे आणि कोणत्या पदावर होणार?असे अनेक प्रश्न निर्माण झाले असून कर्मचारी मात्र वाऱ्यावर … आहेत.

जिल्ह्यात 18 शासकीय गोदामे आहेत यात प्रामुख्याने जळगाव,भुसावळ,चाळीसगाव, अमळनेर या ठिकाणच्या शासकीय गोदामात नायब तहसीलदार दर्जाचे पद कार्यरत होते,ही चारही पदे आता संपुष्टात आली आहेत त्याचप्रमाणे पुरवठा हिशोब अव्वल कारकून व पुरवठा अव्वल कारकून ही पदे कमी करण्यात आली आहेत.

जिल्ह्यात पुरवठा विभागात एकूण 30 अव्वल कारकून,5 लिपिक,4 नायब तहसीलदार यांची एकूण 40 पदे जळगाव जिल्ह्यात संपुष्टात आली आहेत यापैकी फक्त 14अव्वल कारकून यांची पोस्टिंग केली आणि बाकी इतर कर्मचाऱ्यांची पोस्टिंग होणार नसल्याने ते वाऱ्यावर आहेत,या कर्मचाऱ्यांची पोस्टिंग आता कुठे कोणत्या पदावर आणि केव्हा होणार? इत्यादी अनेक प्रश्न पुरवठा विभागासह महसूल विभागात उपस्थित केले जात आहे.

शासनाच्या या नवीन आकृतीबंध निर्णयामुळे प्रशासकीय कामकाजात ज्यांना काही अनुभव नाही अशा कर्मचाऱ्यांना पुरवठा विभागात जबाबदारी देण्यात आल्याने शासकीय कामकाजात मोठा खोळंबा निर्माण होऊन यात कर्मचाऱ्यांचे मोठे नुकसान आणि शाशनाचा फायदा होणार असल्याने अतिरिक्त ठरविण्यात आलेल्या कर्मचाऱ्यां मध्ये शासनाने घेतलेल्या या निर्णयाविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here