साईमत लाईव्ह मुक्ताईनगर प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी या गावातील विरपुत्र नायब सुभेदार विपीन खर्चे यांचा जम्मू-काश्मीर येथील उधमपूर येथे कर्तव्य बजावत असताना सोमवारी मोटासायकल दरीत कोसळून अपघाती मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्यातर्फे देण्यात आली आहे. रात्री उशिरा त्यांचे पार्थीव निमखेडी गावात पोहचणार आहे. उद्या मंगळवारी दि. ९ रोजी त्यांच्या गावी सकाळी ८.३० वाजता शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. निमखेडी येथील मूळ रहिवासी विपीन खर्चे हे सध्या भारतीय सैन्यदलात नायब सुभेदार म्हणून कार्यरत होते. ते सेवा बजावत असताना खर्चे यांच्या दुचाकीचा अपघात झाल्याने त्यांना हौतात्म्य प्राप्त झाले आहे. यामुळे निमखेडी गावात शोककळा…
Author: Saimat
मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी खूप फलदायी असणार आहे. तुमच्या मनात चांगले विचार येतील, ज्यामुळे तुम्ही तुमचा अधिकाधिक वेळ इतरांची सेवा करण्यात घालवाल. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत पार्टी देखील करू शकता. लव्ह लाईफ जगणारे लोक त्यांच्या जोडीदाराला बाहेर फिरायला घेऊन जातील, त्यामुळे तुमच्या आर्थिक ताण पडू शकतो. तुमचे काही हितशत्रू तुमचा हेवा करतील. वृषभ- आज व्यवसाय करणाऱ्या लोकांनी कडूपणाचे गोड्यात रूपांतर करण्याची कला आत्मसात करणे योग्य ठरेल. एखादया सरकारी योजनेचा लाभ मिळू शकतो. रखडलेले काम तुम्हाला अडचणीत आणण्याची शक्यता आहे, जे तुम्हाला त्वरित पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा लागेल. आई-वडिलांचा आशीर्वाद घेऊन घराबाहेर पडल्यास तुमच्या अनेक समस्या दूर होतील. भावंडांसोबत सुरू असलेला संघर्ष…
साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी भारतात दुर्मिळ असलेला अंडी खाऊ निम विषारी जातीचा साप यावल तालुक्यात रिधोरी गावात एका व्यक्तीच्या घरात आढळून आल्याने याबाबतचे रेस्क्यू सर्पमित्र तथा वन्य पशुपक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अजय कोळी (रा. खिर्डी)यांच्या मार्गदर्शनाखाली सदस्य किशोर सोनवणे यांनी यशस्वीरित्या पार पाडले सदरची घटना ही आज सोमवार दि.8 ऑगस्ट 2022 रोजी रात्रीच्या वेळेस घडली. यावल आणि रावेर तालुक्याच्या सीमेवर असलेल्या रिधोरी गावात गब्बर या नावाने परिचित असलेल्या जितेंद्र भीमराव गवळी यांच्या घरात आज श्रावण सोमवारच्या रात्री 12 ते 1 वाजेच्या सुमारास दुर्मिळ भारतीय अंडी खाऊ साप आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली त्यांनी तात्काळ गावातील सर्पमित्र किशोर सोनवणे यांच्याशी…
साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात पुरवठा विभागात नवीन आकृतीबंध, कायदा,नियम,निर्णय लागू करण्यात आला यात पुरवठा विभागातील एकूण 40 कर्मचारी अतिरिक्त ठरल्याने या अतिरिक्त कर्मचाऱ्यांची पोस्टिंग/नियुक्ती आता कुठे आणि कोणत्या पदावर होणार?असे अनेक प्रश्न निर्माण झाले असून कर्मचारी मात्र वाऱ्यावर … आहेत. जिल्ह्यात 18 शासकीय गोदामे आहेत यात प्रामुख्याने जळगाव,भुसावळ,चाळीसगाव, अमळनेर या ठिकाणच्या शासकीय गोदामात नायब तहसीलदार दर्जाचे पद कार्यरत होते,ही चारही पदे आता संपुष्टात आली आहेत त्याचप्रमाणे पुरवठा हिशोब अव्वल कारकून व पुरवठा अव्वल कारकून ही पदे कमी करण्यात आली आहेत. जिल्ह्यात पुरवठा विभागात एकूण 30 अव्वल कारकून,5 लिपिक,4 नायब तहसीलदार यांची एकूण 40 पदे जळगाव जिल्ह्यात संपुष्टात आली…
मेष- कुटुंबात सुख-शांती नांदेल. शत्रूंवर विजय मिळेल. नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. खर्च वाढू शकतो. भावांसोबत मतभेद होऊ शकतात. वृषभ- आत्मविश्वास वाढेल. मानसिक शांतता राहील. वडिलोपार्जित मालमत्तेतून पैसे मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक सुखात वाढ होईल. प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. मिथुन- आईची साथ मिळेल. एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊ शकते. कुटुंबासोबत सहलीला जाऊ शकता. आरोग्याबाबत सावध राहा. कार्यक्षेत्रात बदल होण्याची शक्यता आहे. कर्क- कुटुंबात धार्मिक कार्ये होऊ शकतात. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. व्यर्थ रागावणे टाळा. संतती सुखात वाढ होईल. सिंह- आत्मविश्वास कमी होईल. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. संतती सुखात वाढ होईल. पैशाची कमतरता भासू शकते. पालकांकडून सहकार्य मिळेल. कन्या – मान-प्रतिष्ठेत वाढ होईल.…
साईमत लाईव्ह चोपडा प्रतिनिधी महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल येथे इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आंतरदेशीय पत्रावर पत्रलेखनाचा उपक्रम राबविण्यात आला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त चीफ पोस्ट मास्टर जनरल, इंडिया यांनी देशभरात हा उपक्रम राबविला आहे. महाराष्ट्रामध्ये सी. पी. एम. जी. मुंबई यांच्या अधिपत्याखाली पत्र लेखनाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. ‘द व्हिजन अँड मिशन ऑफ इंडिया 2047’ या विषयावर विद्यार्थ्यांनी त्यांच्या कल्पनेतील 2047 सालच्या भारताविषयीचे विचार नमूद केले. या उपक्रमामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी भुसावळ विभाग डाक अधीक्षक उल्हास दुसाने, सहाय्यक डाक अधीक्षक अनुप गणोरे, निरीक्षक भूषण सैंदाणे, चौधरी ( यावल उपविभाग ),…
साईमत लाईव्ह पुणे प्रतिनिधी पुणे गेल्या 24 तासांच्या आत चार दुचाकीस्वारांनी (Pune Biker died) जीव गमावला आहे. पुणे शनिवारी झालेल्या अपघाताच्या दोन घटनांमध्ये प्रत्येकी दोन याप्रमाणे एकूण चार दुचाकीस्वारांचा बळी गेला. यामुळे हळहळ व्यक्त केली जाते आहे. पहिल्या घटनेत झाड पडून दोघा बाईकस्वारांचा जागीच जीव गेला होता. तर दुसरी घटना घडली पुणे महापालिकेच्या (PMC 2022) टर्फ क्लब चौकाच्या हद्दीत. पुणे पालिकेच्या कचऱ्याच्या गाडीने दुचाकीला धडक दिली. भरधाव कचऱ्याची गाडी (PMC Garbage Vehicle) दुचाकीला धडकली आणि यात दुचाकीवरील दोघेही जण दूरवर फेकले गेले. त्यामुळे झालेल्या अपघातात दोघेही दुचाकीस्वार गंभीररीत्या जखमी झाले होते. दोघांनाही रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान…
साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी जप्त करण्यात आलेल्या हेरॉईनची किंमत सुमारे 362.59 कोटी रुपये इतकी आहे.यपूर्वी देखिल JNPT पोर्टमधे मोठा प्रमानत अमलिपदार्थ सपडले आहे. 15 दिवसापूर्वी नवी मुंबई क्राइम ब्रांच यानी JNPT पोर्ट येथे दुबई येथून आलेल्या कंटेनरमधून 363 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केली होती. हे अमली पदार्थ अफगाणिस्तानातून दुबईमार्गे आले असावेत, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होते. त्यामुळे या अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथक तयार करण्यात आले होते या तपास मधे पाकिस्तानी नागरिक यांच्या हाथ दिसुन अलयाने सदर तपास आज ATS कड़े देन्यात आली आहे . सदर कंटेनर 27 डिसेंबर 2021 रोजी दुबईतून भारतात आला होता.…
साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी रावेर लोकसभा मतदारसंघातील राज्य महामार्गांना राष्ट्रीय महामार्ग दर्जा देण्यात यावा याबाबत रस्ते वाहतूक व महामार्ग केंद्रीय मंत्री मा.नितीनजी गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन महत्त्वपूर्ण मागणी खासदार रक्षाताई खडसे यांनी केली. रावेर लोकसभा क्षेत्रातील १. नशिराबाद-सूनसगाव-कुऱ्हा-बोदवड- मलकापूर-शेगाव रस्ता, २. सावदा-हतनूर-चांगदेव-कोथळी-हरताळा- माळेगाव-बोदवड फाटा रस्ता,३.फागणे-अमळनेर-चोपडा-खरगोन(मध्यप्रदेश)रस्ता व ४. पाचोरा-वरखेडी-शेंदुर्णी-पहुर रस्ता हे राज्य महामार्ग असून यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात दळणवळण असते सदर रस्त्यांची स्थिती ही अत्यंत दयनीय असून सदर रस्त्यांना पाहिजे तसा निधी उपलब्ध होत नाही,त्यामुळे सदर राज्यमार्ग यांना राष्ट्रीय महामार्ग दर्जा देऊन वार्षिक आराखड्यात समाविष्ट करून निधी उपलब्ध करावा. तसेच मध्यप्रदेश, महाराष्ट्र व गुजरात या तीन राज्यांसाठी महत्वपूर्ण असलेला…