साईमत लाईव्ह जळगांव प्रतिनिधी
भारताच्या 75 वा स्वातंत्रदिनाच्या निमित्ताने शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने 13 ते 15 ऑगस्ट असे तीन दिवस शहरात स्वच्छता मोहीम राबिण्यात येत आहे.त्या अनुषगाने आज रोजी काव्य रत्नवली चौकात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
या स्वच्छता मोहिमेत मनसे जिल्हा अध्यक्ष जमील देशपांडे, शहराध्यक्ष आशिष सपकाळे, विनोद शिंदे, जिल्हा संघटक राजेंद्र निकम, राजू डोंगरे,संजय पाटील,प्रशांत बाविस्कर, दीपक राठोड,राहुल चव्हाण, राहुल दाभाडे,हरीओम सुर्यवंशी,खुशाल ठाकूर,निलेश वाणी, किरण सपकले, प्रणव चव्हाण, लोकेश वडनेरे,प्रशांंत उमडकर, सुमित राठोड यांच्यासह मनसेचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.