Author: Saimat

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना एकक, विद्यार्थी कल्याण विभाग आणि के.सी.ई. सोसायटीचे शिक्षण शास्त्र आणि शारीरिक शिक्षण शास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत देशभक्तीपर गीत, राष्ट्रभक्तीपर गीत, गायन स्पर्धा महाविद्यालयात आयोजित करण्यात आली. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक राणे सर होते. या कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. वंदना चौधरी यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयातील विद्यार्थिनी गायत्री शिंदे हिने केले. महाविद्यालयातील विद्यार्थिनी- विद्यार्थी यांनी राष्ट्रभक्तीपर गीत सादर केले, यात ज्योत्सना पाटील, मीनल पाटील, रोमाली वाघुळदे, अमृता महाजन, अंकिता पाटील, जयवंती पावरा, स्वाती…

Read More

साईमत लाईव्ह मुक्ताईनगर प्रतिनिधी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, राज्यात १७ ऑगस्ट २०२२ म्हणजे आज सकाळी ११ ते ११:०१ या काळात सामूहिक राष्ट्रगीत गायन आयोजित करण्यात आले आहे. त्यामुळे जे जिथे असाल तिथेच उभे राहून या उपक्रमात सहभाही होऊ होण्याचे आवाहन करण्यात आले होते. सामूहिक राष्ट्रगीत गायन उपक्रमात सर्व नागरिकांनी सहभागी होऊन एक विक्रम प्रस्थापित करावा असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यानुसार मुक्ताईनगर येथे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या १०० फुटी राष्ट्र ध्वजा जवळ आज बुधवारी पुन्हा सामूहिक राष्ट्र गीत गायनाच्या माध्यमातून हजारो नागरिकांनी त्यांचे व्यापारी प्रतिष्ठाने व रिक्षा चालक , प्रवासी तसेच…

Read More

साईमत लाईव्ह नवी दिल्ली प्रतिनिधी : भाजपने संसदीय समिती आणि निवडणूक प्रचार समितीत मोठे उलटफेर केले असून समितीतील नव्या सदस्यांची नावे जाहीर केली आहे. भाजपच्या नव्या निवडणूक प्रचार समितीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश करण्यात आला आहे. तर निवडणूक प्रचार समिती आणि संसदीय समितीतून केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी  आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान  यांना हटवण्यात आले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा  यांनी आज पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची घोषणा केली. यात देशभरातील भाजपाच्या १५ बड्या नेत्यांच्या समावेश करण्यात आला आहे. समितीच्या अध्यक्षपदी जेपी नड्डा आहेत. तर सदस्यपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह,…

Read More

साईमत लाईव्ह भुसावळ प्रतिनिधी  नगरपालिकेने सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेंतर्गत श्री संत गाडगेबाबा रुग्णालय ते लोखंडी ब्रिज या मार्गावरील हंबर्डीकर चौक ते लोखंडी ब्रिज या रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाला आता मंगळवारपासून सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यातील काम 36 दिवसांत पूर्ण होईल. तर हंबर्डीकर चौक ते पालिका रुग्णालयापर्यंतच्या मार्गाचे काम दुसऱ्या टप्प्यात केले जाणार आहे. या कामामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असून दुकानदारांनी त्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. पालिकेने सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेंतर्गत शहरातील पालिकेचे श्री. संत गाडगेबाबा रुग्णालय ते लोखंडी पुलापर्यंत आरसीसी रोड व गटार बनवण्याच्या कामास मंगळवारपासून प्रारंभ होत असून, त्यासाठी पुढील 36 दिवसांसाठी हा मार्ग बंद राहील. सण-उत्सवाच्या काळात…

Read More

साईमत लाईव्ह भडगाव  प्रतिनिधी  कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील, किसान शिक्षण संस्था, भडगाव, संचलीत, गोपीचंद पुना पाटील, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,कोळगाव ता.भडगाव येथे शासनाच्या आदेशानुसार स्वातंत्र्याचा महोत्सव या उपक्रमांतर्गत स्वराज्य महोत्सव आयोजित करण्यात आला असून दररोज विविध उपक्रम राबविले जात आहे,आज रोजी रांगोळी स्पर्धा विद्यार्थीनी तथा विद्यार्थी यांच्या सहभागाने मोठ्या उत्साहात पार पडली. स्पर्धेत प्रथमस्थान कु.सरोज कैलास पाटील,द्वितीयस्थान कु.प्रियंका अजबराव सोनवणे तर तृतीयस्थान चि.वेदांत नितीन अमृतकर यांनी प्राविण्य मिळवले. प्राचार्य सुनिल पाटील यांच्या मुख्य उपस्थितीत तसेच पर्यवेक्षक अनिल पवार तथा कार्यवाहक प्रा.रघुनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रांगोळी स्पर्धा पार पडली. सदर उपक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील विशेषतः महिला शिक्षिका प्रा.माया मराठे,प्रा.सोनाली सोनवणे,…

Read More

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी  जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वातंंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तांबापुरा व महादेव मंदिर परिसरात ‘आझादी की गौरव यात्रा’ कांग्रेस कमिटीचे महानगराध्यक्ष शाम तायडे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली. या यात्रैत जाकिर बागवान, बाबा देशमुख, देवेन्द्र मराठे, मुजीब पटेल,दीपक सोनवणे,मिनाताई जावळे, छायाताई कोरडे, योगिताताई शुक्ल, अमिनाताई तडवी, अण्णा जाधव, गणेश राठोड, रमजान मुलतानी, समीर तडवी, सुधीर पाटील, विशाल पवार, मीराताई सोनवणे, गोकुल चव्हाण, संतोष गायकवाड मिलींद पगारे, शाम गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Read More

साईमत लाईव्ह जळगांव प्रतिनिधी  येथील जुना कानळदा रोडवरील हरी ओम नगर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव 15 ऑगस्ट उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे चिटणीस योगेश साळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी रुपेज तुळसकर, आयुष सोनवणे, देविदास बाविस्कर, सरला तुळसकर, कनक सोनवणे, आदिसह हरी ओम नगर मधिल रहिवासी मोठ्या सख्येने उपस्थित होते.

Read More

साईमत लाईव्ह भुसावळ प्रतिनिधी  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत स्वराज्य महोत्सव उपक्रमांतर्गत तहसिल कार्यालय भुसावळआयोजित तालुकास्तरीय स्पर्धांचे बक्षीस वितरण, सन्मान सोहळा व सांगता आज सकाळी आय.एम ए. हॉल येथे उत्साहात पार पडला. या वेळी प्रांताधिकारी रामसिंग सुलाने, तहसीलदार दीपक धिवरे, नायब तहसीलदार एस. आर. घुले , प.स. विस्तार अधिकारी तुषार प्रधान , नायब तहसीलदार अंगत आसटकर , के नारखेडे विद्यालयाचे मुख्याध्यापक एन. डी. किरंगे आदींची मंचावर उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात द्वीप प्रज्वलनाने झाली. प्रास्ताविक निवासी नायब तहसीलदार श्रीमती घुले यांनी केले. या स्पर्धेचे संयोजकांना , विविध स्पर्धा प्रमुखांना, परीक्षक यांना सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. वक्तृत्व, रांगोळी,निबंध ,पत्रलेखन,गीत गायन स्पर्धा…

Read More

प्रस्तावना : पूर्णावतार असलेल्या श्रीकृष्णाने श्रावण कृष्ण पक्ष अष्टमीला पृथ्वीतलावर जन्म घेतला. त्याने बालपणापासून आपल्या असाधारण कर्तृत्वाने भक्तांवरील संकटे दूर केली. प्रतिवर्षी भारतामध्ये मंदिरे, धार्मिक संस्था येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. उत्सव साजरा करतांना प्रांता-प्रांतानुसार उत्सव साजरा करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. उत्सवाच्या निमित्ताने बरेच लोक एकत्र येऊन भक्तीभावाने हा उत्सव साजरा करतात. यावर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी 18 ऑगस्ट या दिवशी आहे. या लेखात आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीचे महत्त्व पहाणार आहोत. महत्त्व – जन्माष्टमीला श्रीकृष्णतत्त्व नेहमीपेक्षा 1000 पटीने कार्यरत असते. या तिथीला नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप, तसेच श्रीकृष्णाची अन्य उपासना भावपूर्ण केल्याने श्रीकृष्णतत्त्वाचा अधिक लाभ मिळण्यास साहाय्य…

Read More

साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी सोयगाव तालुक्यात गौण खनीज व अवैद्य वाळू माफियांची दहशत वाढली असून अनेक ठिकाणी अवैद्य वाळू साठे पडून आहे. तर अवैद्य गौण खनिज उत्खनन करून सुरु असलेल्या चोरटी वाहतूक विरोधात महसूल विभागाकडून कारवाई करण्यात आली नसल्याच्या निषेधार्थ ईश्वर इंगळे यांनी १५ ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषनास बसल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारास शिंदे सरकारच्या कार्यकाळात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना तहसील कार्यालयासमोर उपोषण करावे लागत आहे .दि.१६ हा उपोषणाचा दुसरा दिवस असल्याने हि शोकांतिका म्हणत सुज्ञ नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.मात्र प्रशासन कोणतीही दखल घेत नसल्याने अधिकारी व कर्मचारी…

Read More