हंबर्डीकर चौक ते लोखंडी बोगदा मार्ग बंद

0
2

साईमत लाईव्ह भुसावळ प्रतिनिधी 

नगरपालिकेने सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेंतर्गत श्री संत गाडगेबाबा रुग्णालय ते लोखंडी ब्रिज या मार्गावरील हंबर्डीकर चौक ते लोखंडी ब्रिज या रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाला आता मंगळवारपासून सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यातील काम 36 दिवसांत पूर्ण होईल. तर हंबर्डीकर चौक ते पालिका रुग्णालयापर्यंतच्या मार्गाचे काम दुसऱ्या टप्प्यात केले जाणार आहे. या कामामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असून दुकानदारांनी त्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे.
पालिकेने सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेंतर्गत शहरातील पालिकेचे श्री. संत गाडगेबाबा रुग्णालय ते लोखंडी पुलापर्यंत आरसीसी रोड व गटार बनवण्याच्या कामास मंगळवारपासून प्रारंभ होत असून, त्यासाठी पुढील 36 दिवसांसाठी हा मार्ग बंद राहील. सण-उत्सवाच्या काळात हा मार्ग बंद राहणार असल्याने या मार्गावरील दुकानदार नाराज झाले आहेत. मात्र शहर विकासाच्या दृष्टिकोनातून हे काम होणेही गरजेचे आहे. अरुंद मार्गामुळे एकेरी वाहतूक करून काम करता येणार नाही. त्यामुळे रस्ता बंद करण्याशिवाय पर्याय नाही. संबंधित ठेकेदाराकडे कामासाठी मुदत कमी आहे. यामुळे हे काम अल्पावधीत म्हणजे केवळ 36 दिवसांत पूर्ण करण्याचे नियेाजन आहे. त्याचप्रमाणे पुढील टप्प्यात हंबर्डीकर चौक ते पालिका रुग्णालय या रस्त्याचेही काम ही केले जाणार असून त्यासाठीही एकेरी मार्ग किंवा रस्ता बंद करण्याबाबत अद्याप नियेोजन झालेले नाही. हा मार्ग मात्र रुंद असल्याने या ठिकाणी एकेरी मार्ग वापरून काम करता येऊ शकेल.
शहरातील या दोन
मार्गांवर वाढणार वाहतूक…
गणेशोत्सवाच्या काळातही शहरातील दोन्ही भागांना जोडणारा हा रस्ता बंद राहणार आहे. वाहतुकीसाठी सतारे ब्रिज, आराधना कॉलनी टिंबर मार्केट बोगदा या दोनच मार्गांचा पर्याय राहणार आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतुकीची कोंडी होणार आहे. अर्थात ती होऊ नये, यासाठी शहर वाहतूक शाखा, पालिका व संबंधित ठेकेदारानेही प्रयत्न करणे गरजेचे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here