स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत  देशभक्ती, राष्ट्रभक्तीपर गीत गायन स्पर्धा

0
2

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना एकक, विद्यार्थी कल्याण विभाग आणि के.सी.ई. सोसायटीचे शिक्षण शास्त्र आणि शारीरिक शिक्षण शास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत देशभक्तीपर गीत, राष्ट्रभक्तीपर गीत, गायन स्पर्धा महाविद्यालयात आयोजित करण्यात आली.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक राणे सर होते. या कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. वंदना चौधरी यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयातील विद्यार्थिनी गायत्री शिंदे हिने केले. महाविद्यालयातील विद्यार्थिनी- विद्यार्थी यांनी राष्ट्रभक्तीपर गीत सादर केले, यात ज्योत्सना पाटील, मीनल पाटील, रोमाली वाघुळदे, अमृता महाजन, अंकिता पाटील, जयवंती पावरा, स्वाती सोनवणे, धम्मज्योती तामस्वरे, मनीष बागुल, वंदना पवार, पुनम यांनी सहभाग घेतला. मनीष बागुल या विद्यार्थ्याने बासरी वादन करून संपूर्ण श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत भारतीय स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट दिनानिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक राणे सर यांनी ध्वजारोहण केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना एकक कार्यक्रम अधिकारी प्रा. पंकज रवींद्र पाटील यांनी केले. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन सहकारी विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here