Author: Saimat

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी : पावसाळी अधिवेशनाच्या  दुसऱ्या दिवशी विधान परिषदेत खडाजंगी पाहायला मिळाली. अत्यंत शांत आणि संयमी स्वभावाच्या म्हणून ओळखल्या डॉ. नीलम गोऱ्हे या गुलाबराव पाटील यांच्यावर कमालीच्या संतापल्याचं यावेळी पाहायला मिळालं. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गुलाबराव पाटील यांनी झापलं. मंत्री तुम्ही तुमच्या घरी, अशा शब्दांत झापलंय. छातीवर हात ठेवून कसलं बोलता, सभागृहात बोलण्याची ही पद्धत नाही, असंही त्यांनी म्हटलंय. दरम्यान, यावेळी झालेल्या गदारोळात विरोधही पुन्हा वेलमध्ये उतरले होते. जोरदार गदारोळ यावेळी पाहायला मिळाला. सभागृहात नेमकं काय घडलं? उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या गदारोळादरम्यान, संपातल्या होत्या. वारंवार विनंती करुनही आमदारांचा गदारोळ सुरुच होता.…

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी : रायगड जिल्ह्यातील खळबळजनक माहिती समोर येते आहे. हरिहरेश्वर किनाऱ्यावर संशयास्पद बोट आढळून आलीय. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बोटीमध्ये शस्त्र सापडली असल्याचंही सांगण्यात येतंय. त्यामुळे पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. जिल्ह्यात चोख नाकाबंदी करण्यात आली असून पोलीस यंत्रणाही अलर्ट मोडवर आहे. प्रत्येकक वाहनाचीही कसून चौकशी तपास नाकाबंदी दरम्यान केला जातोय. शोथ पथकाद्वारे पुढील तपास केला जातोय.

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी : गेल्या बारा वर्षांपासून मुंबई -गोवा महामार्ग रखडला आहे. हा महामार्ग केव्हा पूर्ण होणार यासंदर्भात कोकणातील आमदारांनी मंत्री रवीद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांना विविध प्रश्न केले. या मुद्दयांवर शिवसेनेचे (Shivsena)नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) बोलत असताना नितेश राणे (Nitesh Rane) यांनी त्यांना टोला लगावत अडीच वर्षे वाया गेली असे म्हटले. यावर जाधव यांनी संताप व्यक्त करत राणे यांचा चांगलेच सुनावले. आमदार सुनिल प्रभू यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावर लक्षवेधी मांडली होती. याला उत्तर देतांना चव्हाण म्हणाले डिसेंबर २०२३ पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येईल. तसेच या कामात भुसंपादन, भौगोलीक स्थिती, माती ढासळणे, न्यायालयीन वाद आदी…

Read More

साईमत लाईव्ह यवतमाळ प्रतिनिधी : तब्बल ४० आमदारांनी शिवसेनेची साथ सोडून शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासमोर आता पक्ष संघटना मजबूत करण्याचे मोठे आव्हान आहे. मात्र आता त्यांनी विदर्भाकडेही लक्ष केंद्रित केले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा प्रचाराचा नारळ शिंदे गटात (Shinde Group)सामील झालेले मंत्री संजय राठोड (Sanjay Rathore)त्यांच्या बालेकिल्ल्यातून फोडण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी (ता. मानोरा, जि. वाशीम) दौऱ्यावर लवकरच जाणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी पोहरादेवी (Pohradevi) येथे भेट द्यावी, यासाठी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक व मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील राजू नाईक यांनी पुढाकार…

Read More

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी  जीवनाला आधार  देणाऱ्या वडिलांचे  मध्यरात्री अकस्मात  निधन झाले असतांना शिक्षणाचा ध्यास घेतलेल्या एकुलत्या  एक कन्येने आज सीईटीचा शेवटचा पेपर देऊन जे धाडस दाखविले त्याबद्दल तिचे कुसुंबे गावात कौतुक होत आहे. तालुक्यातील कुसुंबे खुर्द गावात राहणारे रितेश रमेश विसपुते यांचे मध्यरात्री अकस्मात निधन झाले.या घटनेने विसपुते परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळेला. अशा प्रसंगातही त्यांची एकलुती एक कन्या वैष्णवी विसपुते हिने मोठ्या धीराने आज सकाळी सीईटीचा शेवटचा पेपर देण्याचे धाडस दाखवून जिद्द व शिक्षणाचा ध्यास  पूर्ण  केला. त्यामुळे कुंसुंबे गावात तिचे कौतुक होत आहे. जीवनाला आधार देणाऱ्या जन्मदात्या वडिलांचे पार्थिव घरात असतांनाही व पितृछत्र हरपल्याचे दुःख झाले असतांनाही शिक्षण…

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी : भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी काल एकामागून एक ट्विट करत राष्ट्रवादीचा बडा नेता तुरुंगात जाणार, घोटाळ्याच्या आरोपात जेलवारी होणार, असे ट्विट केले आहे. यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी संताप व्यक्त करत कंबोज यांच्यावर निशाणा साधला आहे. देश सोशल मीडियावरून चालत नाही, सभागृहात चालतो. ईडीसारख्यायंत्रणा स्वायत्त आहेत. मग असे असताना माहिती बाहेर जाते कशी, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. त्यामुळे मोहित कंबोज यांच्या ट्विटची अमित शाह (Amit Shah) यांनी चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे अनिल देशमुख, नवाब मलिक तसेच शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत तुरुंगात…

Read More

साईमत लाईव्ह मुक्ताईनगर प्रतिनिधी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नाने व पाठपुराव्यामुळे पावसाळी अधिवेशनाच्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये (बजेट) मुक्ताईनगर सार्वजनिक बांधकाम उपविभागाअंतर्गत, बोदवड सार्वजनिक बांधकाम उप विभागा अंतर्गत, सावदा सार्वजनिक बांधकाम उपविभागा अंतर्गत रावेर तालुक्यातील गावांच्या विविध विकास कामांसाठी एकूण सुमारे 50 कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर झाला असून नागरिकांतर्फे आनंद व्यक्त केला आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या कडे मुक्ताईनगर मतदार संघाचे दमदार आमदार चंद्रकांत पाटील यांनी पत्रव्यवहार करून व प्रत्यक्ष भेट घेऊन मतदार संघातील विविध विकास कामांना पावसाळी अधिवेशनाच्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये मंजुरी मिळून निधीची मागणी केली होती. त्यानुसार मुक्ताईनगर सार्वजनिक बांधकाम उपविभागाअंतर्गत 28…

Read More

साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी सोयगाव तालुक्यात गौण खनीज व अवैद्य वाळू माफियांची दहशत वाढली असून अनेक ठिकाणी अवैद्य वाळू साठे पडून आहे. तर अवैद्य गौण खनिज उत्खनन करून सुरु असलेल्या चोरटी वाहतूक विरोधात भरारी पथक व महसूल विभागाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने ईश्वर इंगळे यांनी दि १५ ऑगस्ट ७५ व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषनास बसल्याने महसूल चा कारभार चव्हाट्यावर आला आहे. उपोषणा बाबत महसूल प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याने तालुक्यात चर्चेला उधाण आले होते. अधिकारी व कर्मचार्यांना पाठीशी घालुन प्रकरण दडपण्याचा व महसूलच्या अधिकाऱ्यांवर आलेल्या राजकीय दबावामुळे उपोषण लांबू देत असल्याची चर्चा तहसील कार्यालयात रंगली होती.…

Read More

मेष-  आजच्या दिवशी सरकारी नोकऱ्यांसाठी अर्ज करा. तसंच आर्थिक स्थिती अनुकूल राहील. उधार दिलेले पैसे परत मिळण्याची दाट शक्यता आहे. वृषभ-  तुमची जबाबदारी योग्य पद्धतीने आणि योग्य प्रकारे पार पाडा. आजच्या दिवशी गरजू मित्राला मदत करा, दुपारची वेळ चांगली आहे. मिथुन-  आजच्या दिवशी दुपारपर्यंत समस्या सुटतील. त्याचप्रमाणे घाईघाईत कोणताही निष्काळजीपणा करू नका. मोठ्यांचा आदर करा. कर्क-  आजच्या दिवशी कोणालाही कर्ज देऊ नका. तसंच घरात पाहुणे येण्याचा योग आहे. त्याचशिवाय तुमचा निर्णय काळजीपूर्वक घ्या. सिंह-  आजच्या दिवशी कोणत्याही गोष्टीवर वाद घालत बसू नका. व्यवसायामध्ये मोठा नफा मिळणार आहे. आज इतरांकजून गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. कन्या-  नातेससंबंधात कडवटपणा येण्याची शक्यता आहे. रात्री…

Read More

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव येथील यंत्र विभागामध्ये, अंतिम वर्षात शिकत असणार्‍या विद्यार्थ्यांनी सौर उर्जेवर चालणारे वाळू चाळणी यंत्र बनविले आहे. वाळू चाळणी सहसा नदीपात्रामध्ये, मुजरांद्वारे केली जाते, सदर प्रक्रिया खूपच श्रमिक, तसे वेळ घेणारी असते. तसेच नदीपात्र असे ठिकाण आहे, जिथे विद्युत ऊर्जा उपलब्ध नसते, त्यामुळे विद्युत उर्जेवर चालणारे, कुठलेही यंत्र वापरण्यास अडचण येते. ही बाब लक्षात घेऊन, तसेच वाळू मजुरांशी चर्चा केल्यानंतर, विद्यार्थ्यांच्या लक्षात आले की, हा प्रश्न आपण सौरऊर्जेद्वारे सहज सोडवू शकतो. सदर यंत्रामध्ये सौरऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करून, ती बॅटरी मध्ये साठवली जाते. विद्युत ऊर्जेच्या मदतीने इलेक्ट्रिक मोटार फिरविली जाते. इलेक्ट्रिक मोटार पासून…

Read More