Author: Saimat

साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी भुसावळ येथील जुना जळगाव रोडवर असलेल्या भिरुड कॉलनीत दि.२१ रविवार रोजी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान पंढरी ओंकार बोखारे-पाटील यांचे वृद्धपकाळात वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले.पंढरी बोखारे-पाटील यांना एकच मुलगी निलीमा सुनील पाटील हिने बापाची सेवा केली मुलाचा उणीव भासू दिली नाही. धर्म शास्त्र नुसार आई वडील यांच्या निधनानंतर मुलगा मुख अग्नी देतो.असे असले तरी २१ व्या शतकातील परिवर्णवादी विचारांच्या निलीमाताई ने वडिलांच्या निधनानंतर अग्नी देण्याचा निर्णय घेतला निलीमाताईच्या निर्णयाचे समाज बांधवांनी कौतुक केले.निलीमाताई व त्यांचे पती सुनिल माणिक पाटील हे दोघे पती,पत्नी सामाजिक कार्यात अग्रेसर असतात.सुनिल पाटील छत्रपती क्रांती सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष आहे.पाटील कुतुबात…

Read More

साईमत लाईव्ह वाळूज महानगर प्रतिनिधी, औरंगाबाद वाळूज,- यंदा वाळूज भागातही आगामी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे.  गेल्या 15 वर्षापासून उत्सवात भर असलेल्या वाळूज(ग्रामीण) गणेश महासंघाची कार्यकारीणी (दि.19) शुक्रवारी निवडण्यात  आली.अध्यक्षस्थानी महासंघाचे संस्थापक बबन गायकवाड हे होते.नुतन पदाधिकारी असे- अध्यक्ष- भय्या पठाण , उपाध्यक्ष-ललीत राऊत, नंदू सोनवणे , सचिव रतन आंबिलवादे, सहसचिव ज्ञानेश्वर शिंदे, कोषाध्यक्ष सचिन पानकडे, कार्याध्यक्ष सर्जेराव भोंड, सहकार्याध्यक्ष नदिम झुबंरवाला,संघटक सचिन मुंढे आदी.सल्लागार- सईदा पठाण,योगेश आरगडे,नासेर पटेल,मुकेश बोहरा,मनोज जैस्वाल, नंदकुमार गांधिले, अमजदखा पठाण, शेख जमील,उत्तम भोंडवे,ईस्माईल पठाण,काकासाहेब चापे,शरदचंद्र अभंग, विजय साबळे, माणिक राऊत,नंदु राऊत,सचिन काकडे,उमर पटेल, दयानंद साबळे,अविनाश गायकवाड, लक्ष्मण पाठे,खालेद पठाण, संजय खोचे सिध्येश्वर ढोले, नामदेव…

Read More

साईमत लाईव्ह वाळूज महानगर प्रतिनिधी, औरंगाबाद श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त वाळूज औद्योगिक नगरीत बजाज नगरात श्रीकृष्ण मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या हर्षोल्हासात पार पडला प्रवचन,श्री कृष्ण जन्मा वरील प्रसंग,आदी कार्यक्रम श्रीकृष्ण मंदिर बजाज नगर ट्रस्टच्या वतीने आयोजित केल्याने श्रीकृष्ण जन्मोत्सवनिमित्त श्रीकृष्ण मंदिरात चैतन्यमय आणि भक्ती रसाचे वातावरण निर्माण झाले होते ११:४५ वाजता श्रीकृष्ण जन्म महापूजेस शुभारंभ झाला. सुरुवातीला भगवान श्री कृष्णाच्या मूर्तीस पंच द्रव्यांनी महाभिषेक संपन्न झाला यावेळी महानुभाव पंथाचे विनोद बाबा शास्त्री आंबेकर यांच्या हस्ते भगवान श्रीकृष्णाला 101 पदार्थाचा नैवद्य भरवून महिलांनी श्रीकृष्णाच्या बाल रूपाचे पूजन करत श्रीकृष्णाचा पाळणा हलवत श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या हर्षोल्हासात आणि आनंदात साजरा करण्यात आला यावेळी श्रीकृष्ण मंदिर…

Read More

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी शहरातील शिवकॉलनी परिसरात दारू अड्ड्याजवळ दोघांमध्ये झालेल्या वादातून एकाचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आल्याची घटना घडल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. अक्षय अजय चव्हाण (वय-२३ रा. पिंप्राळा) असे मयताचे नाव आहे. या संदर्भात अधिक असे की, रविवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शिवकॉलनी स्टॉपसमोर दारूच्या अड्ड्यासमोर मोबाईलच्या वादातून दोन तरुणांमध्ये ५.३० च्या सुमारास मोबाईलच्या जुन्या वादातून वाद झाला. वाद वाढल्याने दोन्ही गटातील १० – १५ तरुणांमध्ये चांगलीच हाणामारी झाली. यानंतर अक्षय चव्हाण या तरुणाने बाळू पवार नामक तरुणाचं भावाच्या डोक्यात दगड मारला. भावाला मारल्याच्या रागातून बाळू पवार याने चॉपरच्या साहाय्याने अक्षय चव्हाण या तरुणावर वार केले.…

Read More

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी  अखिल भारतीय मराठा महासंघाच्या युवक जळगाव महानगराध्यक्षपदी पियुष पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून समाजात सदैव कार्यरत असलेले पियुष पाटील यांच्या कार्याची दखल घेवून युवक प्रदेशाध्यक्ष अतिष गायकवाड व प्रदेश उपाध्यक्ष दिव्यांक सावंत, प्रसाद कोंडे, प्रदेश सर्चिटणीस योगेश पाटील यांच्या आदेशाने पियुष पाटील यांची अखिल भारतीय मराठा महासंघाच्या युवक जळगाव महानगराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सदरचे नियुक्तपत्र त्यांना नुकतेच देण्यात आले. या निवडीबद्दल त्यांच्यावर अखिल भारतीय मराठा महासंघाच्या युवक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसह समाजातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी   राज्यात  मुलींची छेड काढण्याचं प्रमाण अधिक आहे. अशा प्रकरणामध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर अनेक आरोपींना पोलिसांनी  शिक्षा दिली आहे. परंतु तरीही अशी प्रकरण उघडकीस येत आहेत. मुंबईतल्या घाटकोपरमधील कामराजनगरमध्ये एका रोड रोमिओला रहिवाशांनी मारहाण केली आहे. एका 12 वर्षाच्या मुलीची छेड काढत असताना तिथं असलेल्या नागरिकांनी त्याचा चांगला चोप दिल्याची माहिती समजली आहे. ज्याला नागरिकांनी मारहाण केली, तो शाळेत जात असलेल्या मुलींना मारहाण करीत असल्याची माहिती मिळाली आहे. ज्यावेळी आरोपी कृत्य करित होता. त्यावेळी त्याला मारहाण करुन नागरिकांनी त्यांची अर्धनग्न अवस्थेत वरात काढली. अर्धनग्न अवस्थेत वरात देखील काढण्यात आली मागच्या काही दिवसांपासून एक रोड रोमियो शाळेत जात…

Read More

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी  माजी पर्यावरण मंत्री तथा युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे हे शिवसंवाद यात्रेनिमित्त आज जळगावात पोहचले. दरम्यान, आदित्य ठाकरेंच्या स्वागतासाठी लावण्यात आलेले बॅनर फाडल्यावरून आदित्य ठाकरेंनी विमानतळावर माध्यमांशी बोलताना मोजक्या शब्दात बंडखोरांना इशारा दिला. ते म्हणाले की,गद्दार हे गद्दारच असतात मी आज गद्दारांचा मुखवटा काढण्यासाठी आलो आहे, जनतेचे आशीर्वाद घ्यायला आलो असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने आदित्य ठाकरे यांचे भव्य स्वागत करण्यात आले. आदित्य ठाकरे यांनी जळगाव विमानतळावर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे राज्यात ठिकठिकाणी जाऊन पक्षाची भूमिका मांडत आहेत. निष्ठा यात्रा आणि शिवसंवाद या नावाने त्यांच्या यात्रा सुरू आहेत.…

Read More

साईमत लाईव्ह अहमदनगर प्रतिनिधी  कोपरगाव शहरामध्ये दोन दिवसांपूर्वी चौकात दहिहंडी स्वागत कमान उभारणीवरून वाद निर्माण झाला होता. या वादात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत मोठा राडा झाला होता. यामध्येच आता शिर्डीतील साईबाबा संस्थानाचे अध्यक्ष तसेच कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी भाजपचे नेते व कार्यकर्त्यांना इशारा दिला आहे. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या कार्यक्रमाच्या शेवटी आमदार आशुतोष काळे यांनी विरोधकांना टोलादेखील लगावला आहे. ते म्हणाले की, आमच्या नादाला लागाल तर ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही. काही लोकांना वाटतेय सरकार बदलले आहे. त्यामुळे त्यांचा उत्साह वाढलेला आहे; परंतु आमदार बदललेला नाही आमदार मीच आहे, असा टोला त्यांनी भाजपच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांना यावेळी लगावला आहे.…

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी एक मोठी बातमी समोर येत आहे.  मुंबईमध्ये (Mumbai) पुन्हा एकदा हल्ला (Attack) होणार असल्याची धमकी मिळाली आहे. मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) ट्रॅफिक कंट्रोल रूमला (Traffic control room)  धमकीचा मेसेज (threatening message)आला आहे. ऐन सणासुदीच्या काळातच हा मेसेज आल्यानं मुंबई पोलिसांची चिंता वाढली आहे.  मुंबई कंट्रोल रुमला धमकीचा मेसेज आल्यानंतर पोलिसांनी पुन्हा एकदा मुंबईत बंदोबस्त वाढवला आहे. मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक कंट्रोल रुममधील व्हॉट्सअॅप नंबरवर धमकीचा मेसेज आला आहे. या मेसेजमध्ये 6 दहशतवादी भारतात पोहोचल्याचा दावा करण्यात आला आहे. तसंच लवकरच मुंबईत 26/11 सारखा हल्ला करण्याची धमकी या मेसेजमध्ये देण्यात आली आहे. या मेसेजनंतर एकच खळबळ उडाली आहे.…

Read More