बुलढाणा जिल्ह्यात या रोगाचा वाढतोय प्रभाव ; जिल्ह्याभरात अलर्ट

0
1

साईमत लाईव्ह बुलढाणा प्रतिनिधी :

गेल्या अडीच वर्षांपासून आरोग्य यंत्रणा कोरोनाशी लढत आहे. आता राज्यात स्क्रब टायफस या दुर्मिळ आणि जीवघेण्या आजाराने शिरकाव केलाय. त्यामुळं आरोग्य विभाग हाय अलर्ट मोडवर आल्याचं दिसून येत आहे. स्क्रब टायफस राज्यासाठी अत्यंत दुर्मिळ असा आजार आहे. या आजाराचे रुग्ण अफगाणिस्तान, पाकिस्तान, जपान, इंडोनेशिया आणि रशिया या देशातच आढळतात. आपल्या देशात या आजाराचे वर्षभरातून एक दोन रुग्ण हिमाचल प्रदेशात आढळले. केरळमध्ये जून महिन्यात स्क्रब टायफसनं एका 15 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. आता एक दोन नव्हे तर तब्बल नऊ रुग्ण बुलडाणा जिल्ह्यात आढळल्याने एकच खळबळ उडालीय. एकट्या खामगावात स्क्रब टायफसचे 7 रुग्ण आढळले. त्यामुळं आरोग्य यंत्रणा अलर्ट  होऊन काम करत आहे.

एका गंभीर रुग्णावर अकोल्यात उपचार

महाराष्ट्रातील बुलडाणा जिल्ह्यात एक दोन नव्हे तर तब्बल 9 स्क्रब टायफस या आजाराचे रुग्ण आढळले आहेत. त्यातल्या त्यात एकट्या खामगाव तालुक्यात 7 रुग्ण आढळून आलेत. आता आरोग्य प्रशासनाची यंत्रणा हाय अलर्ट मोडवर असल्याचं दिसून आलंय. खामगाव तालुक्यातील स्क्रब टायफसच्या एका रुग्णाची प्रकृती अतिशय गंभीर आहे. त्यामुळं गंभीर रुग्णाला अकोला येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीय. नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहनही आरोग्य विभागाच्या वतीनं खामगावचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आभाळाशी खंडारे यांनी केलंय.

काय स्क्रब टायफस आजार

जूनमध्ये केरळातील वरकला येथे 15 वर्षीय मुलीचा स्क्रब टायफसनं मृत्यू झाला. दहावीची विद्यार्थिनी होती. त्यानंतर देशात यासंदर्भात गांभीर्यानं घेतलं जाऊ लागलं. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (सीडीसी) नुसार, स्क्रब टायफस आजार ओरिएंटिया त्सुत्सुगामुशी बॅक्टेरियामुळं होतो. लार्वा मायट्सला कापल्यामुळं हा आजार फैलतो. याला बुश टायफस म्हणूनही ओळखलं जातं. सेंट्रल नर्व्हस सिस्टीम, कार्डिओ वस्कुलर सिस्टम, श्वासाशी संबंधित आजार आहे. गॅस्ट्रोइन्टेस्टाईन सिस्टीमला प्रभावित करते. योग्य वेळेवर यावर उपचार झाले नाही, तर घातक ठरू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here