Author: Saimat

साईमत लाईव्ह मुक्ताईनगर प्रतिनिधी  15 ऑगष्ट स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवाचं औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा नेत्या तथा जळगांव जिल्हा बँकेच्या संचालिका डॉ. रोहिणीताई खडसे – खेवलकर यांनी जनसंवाद यात्रा सुरू केली. र16 ऑगस्ट रोजी या जनसंवाद यात्रेचा दुसरा दिवस होता. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील 182 गावांमध्ये ही यात्रा पोहचणार आहे. स्वातंत्र्यदिनी बोदवड तालुक्यातील राऊतझिरा येथून जनसंवाद यात्रेचा शुभारंभ झाला. मुसळधार पावसातही कार्यकर्ते आणि गावकऱ्यांचा उत्साह तसूभरही कमी झालेला दिसला नाही. ह्या जनसंवाद यात्रेचे जो तो ज्याच्या त्याच्या परीने विश्लेषण करेल; परंतु कुठल्याही प्रकारच्या निवडणुका समोर किंवा जवळ नसतांना लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्याच्या निराकरणासाठी निघालेली ही एकमेव यात्रा असावी. त्यामुळे स्वार्थासाठी ही यात्रा…

Read More

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी  युवाशक्ती फाऊंडेशनतर्फे आज 19 ऑगस्ट रोजी काव्यरत्नावली चौक येथे सायंकाळी 6 वाजेपासून तरूणींची दहीहंडी आयोजित करण्यात आली आहे. सदर आयोजनाचे हे 14 वे वर्ष असून यावर्षी मोठ्या प्रमाणात आयोजनाची तयारी करण्यात आली आहे. डॉ.अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाचे मुलींचे गोविंदा पथक, शिवतांडव प्रतिष्ठानचे 130 वादकांचे ढोल पथक, हायटेक लाईटस, बालगोपालांसाठी श्रीकृष्ण वेषभूषा स्पर्धा, मल्लखांबचे थरारक प्रात्यक्षिक, सांस्कृतिक नृत्य आदी. या दहीहंडी महोत्सवाचे मुख्य आकर्षण आहे. जळगाव जिल्ह्यात सार्वजनिक रित्या युवाशक्ती फाऊंडेशनतर्फे एकमेव तरूणींच्या गोविंदा पथकाची दहीहंडी आयोजित करण्यात येते. दहीहंडी सारख्या उत्सवात महिलांना मुख्य प्रवाहात आणून उत्सवाचा आनंद द्विगुणीत करणे हे या आयोजनामागील युवाशक्ती फाऊंडेशचा…

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी : राज्यभरात सर्वत्र दही हंडीचा उत्सव साजरा करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. दही हंडीचा उत्सवाला राजकीय रंग देण्याची गरज नाही. वरळीतील जांबोरी मैदानावरूनही शिवसेना आणि भाजपमध्ये वाद पेटला आहे. यावरही आदित्य यांनी भाष्य केले. दही हंडीसाठी जांबोरी मैदान मिळावं यासाठी आम्ही कोणतेही प्रयत्न केले नाही. आज आनंदाचा दिवस आहे. सर्वांनी तो उत्साहत साजरा करावा असेही ठाकरे म्हणाले. दोन वर्षापूर्वीच अडीच कोटी रुपये खर्चून आम्ही जांबोरी मैदान चांगले केले आहे. माझी सर्वांना एवढीच विनंती आहे की, प्रत्येक गोष्टीत राजकारण आणू नका. हा बालिशपणा असल्याचा टोला आदित्य ठाकरे यांनी विरोधकांना…

Read More

साईमत लाईव्ह  पाचोरा प्रतिनिधी  माजी मंत्री शिवसेना युवा प्रमुख यांच्या जिल्हा शिव संवाद दौऱ्याची पाचोरा नगरीतून सुरुवात करण्यात येणार आहे. शिवसेनेचे माजी आमदार स्व. आर. ओ. पाटील यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्या पासून मतदार संघाच्या राजकारणात सक्रिय झालेल्या आर.ओ. पाटील यांच्या कन्या दिली. यावेळी विधानसभा क्षेत्र जेष्ठ शिवसैनिक शेतकरी सेना तालुकाप्रमुख, रमेश बाफना, उपजिल्हा प्रमुख ॲड.अभय पाटील, शेतकरी सेना जिल्हाप्रमुख अरुण पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य उध्दव मराठे, आजी तालुकाप्रमुख शरद पाटील, नरेंद्रसिंग सुर्यवंशी, नाना वाघ, सह शिवसैनिक उपस्थित होते. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा 20 ऑगस्ट मंगळवार रोजी जळगांव जिल्ह्याच्या शिव संवाद दौऱ्याची सुरुवात पाचोरा येथून…

Read More

साईमत लाईव्ह बुलढाणा प्रतिनिधी : गेल्या अडीच वर्षांपासून आरोग्य यंत्रणा कोरोनाशी लढत आहे. आता राज्यात स्क्रब टायफस या दुर्मिळ आणि जीवघेण्या आजाराने शिरकाव केलाय. त्यामुळं आरोग्य विभाग हाय अलर्ट मोडवर आल्याचं दिसून येत आहे. स्क्रब टायफस राज्यासाठी अत्यंत दुर्मिळ असा आजार आहे. या आजाराचे रुग्ण अफगाणिस्तान, पाकिस्तान, जपान, इंडोनेशिया आणि रशिया या देशातच आढळतात. आपल्या देशात या आजाराचे वर्षभरातून एक दोन रुग्ण हिमाचल प्रदेशात आढळले. केरळमध्ये जून महिन्यात स्क्रब टायफसनं एका 15 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. आता एक दोन नव्हे तर तब्बल नऊ रुग्ण बुलडाणा जिल्ह्यात आढळल्याने एकच खळबळ उडालीय. एकट्या खामगावात स्क्रब टायफसचे 7 रुग्ण आढळले. त्यामुळं आरोग्य यंत्रणा अलर्ट…

Read More

साईमत लाईव्ह धुळे प्रतिनिधी : जिल्ह्यात एक असा गुन्हा झाला आहे की, खळबळ उडाली आहे. पत्नीने रागाच्या भरात पत्नीचे कुऱ्हाडीने घाव घालत तुकडे केल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत एक कारण असं समजलं आहे. पतीने पत्नीकडे तपकीर मागितली होती. परंतु पत्नीने तपकीर देण्यास नकार दिला होता. त्यानंतर चिडलेल्या पतीने पत्नीच्या डोक्यात कऱ्हाड घातली. त्यामुळे पत्नीचा मृत्यू झाल्याची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाली आहे.पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. नटवाडे गावातील ही या महिन्यातील दुसरी घटना आहे. विशेष म्हणजे महिन्यातील नटवाडे गावातील दुसरी घटना आहे. नेमकं काय घडलं शिरपूर तालुक्यातील नटवाडे गावातील नवऱ्याने स्वतःच्या बायकोवर कुऱ्हाडीने घाव घालत पत्नीचा खून केल्याची घटना…

Read More

डाळ ही अनेक भारतीयांच्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. अनेकांना ही गोष्ट माहित नाही पण डाळीचा समावेश हा आहारात असायलाच हवा कारण आपल्या निरोगी आरोग्यासाठी डाळ महत्त्वाची आहे. तशा तर डाळी अनेक प्रकारच्या असतात – चणा डाळ, मसूर डाळ, काळे वाटाणे, उडीद डाळ, तूर डाळ इत्यादी. यात मुग डाळ एक अशी डाळ हे जी खूप जास्त हेल्दी समजली जाते. एवढेच नाही तर खुद्द आयुर्वेदात सुद्धा ‘क्वीन ऑफ पल्सेस’ असे मुग डाळीचे (moong dal benefits) वर्णन केलेले आहे. मुग डाळ दोन प्रकारची असते. एक म्हणजे हिरवी मुग डाळ किंवा पिवळी मुग डाळ! मुग डाळीमध्ये मोठ्या प्रमाणावर पोषक तत्वे असतात. ज्यामध्ये…

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी  दीड महिन्यापूर्वी आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादानं सर्वात मोठी हंडी फोडली, आम्ही 50 थर लावले होते, असं टीकास्त्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंंनी शिवसेनेवर सोडलंय. ठाण्यातील टेंभी नाका दहीहंडी उत्सवात ते बोलत होते.

Read More

साईमत लाईव्ह गोंदिया प्रतिनिधी  ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कारंजा परिसरातील एव्हरग्रीन हॉटेलात १८ ऑगस्टच्या रात्री एका तरूणाने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यात तो गंभीर जखमी असून त्याला उपचारसाठी गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. शतक जांगळे (२१) रा. फुलचूर असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरूणाचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येचा प्रयत्न करण्यामागील कारण कळू शकले नाही. तो बेशुध्द असून त्याच्यावर गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे. या एव्हरग्रीन हॉटेलात नागपूरच्या एका तरूणाने आपल्या प्रेयसीसोबत रात्र घालवून रात्रीच विषप्राशन करून दोघांनी आत्महत्या केली होती. त्यानंतर आमगावच्या बजरंग चौकात राहणाऱ्या २१ वर्षाच्या तरूणाने आमगावातील एका २० वर्षाच्या तरूणीवर बलात्कार केला होता. या…

Read More