साईमत लाईव्ह धुळे प्रतिनिधी :
जिल्ह्यात एक असा गुन्हा झाला आहे की, खळबळ उडाली आहे. पत्नीने रागाच्या भरात पत्नीचे कुऱ्हाडीने घाव घालत तुकडे केल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत एक कारण असं समजलं आहे. पतीने पत्नीकडे तपकीर मागितली होती. परंतु पत्नीने तपकीर देण्यास नकार दिला होता. त्यानंतर चिडलेल्या पतीने पत्नीच्या डोक्यात कऱ्हाड घातली. त्यामुळे पत्नीचा मृत्यू झाल्याची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाली आहे.पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. नटवाडे गावातील ही या महिन्यातील दुसरी घटना आहे. विशेष म्हणजे महिन्यातील नटवाडे गावातील दुसरी घटना आहे.
नेमकं काय घडलं
शिरपूर तालुक्यातील नटवाडे गावातील नवऱ्याने स्वतःच्या बायकोवर कुऱ्हाडीने घाव घालत पत्नीचा खून केल्याची घटना धुळे जिल्ह्यात घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या महिलेला शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरातील लोकांना उपजिल्हा रुग्णालयात आणल्याशिवाय मृमतदेह ताब्यात घेणार नसल्याची भुमिका मृत महिलेच्या माहेरच्या मंडळींनी घेतली आहे.नटवाडे येथे सहा महिन्यात खूनाची ही दुसरी घटना घडली आहे. तर धुळे जिल्ह्यात पंधरा दिवसात ही तिसरी घटना घडली आहे.