कधीच होणार नाही डायबिटीज व हार्ट अटॅकचा धोका, रोज खा ही एक डाळ

0
2

डाळ ही अनेक भारतीयांच्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. अनेकांना ही गोष्ट माहित नाही पण डाळीचा समावेश हा आहारात असायलाच हवा कारण आपल्या निरोगी आरोग्यासाठी डाळ महत्त्वाची आहे. तशा तर डाळी अनेक प्रकारच्या असतात – चणा डाळ, मसूर डाळ, काळे वाटाणे, उडीद डाळ, तूर डाळ इत्यादी. यात मुग डाळ एक अशी डाळ हे जी खूप जास्त हेल्दी समजली जाते. एवढेच नाही तर खुद्द आयुर्वेदात सुद्धा ‘क्वीन ऑफ पल्सेस’ असे मुग डाळीचे (moong dal benefits) वर्णन केलेले आहे.

मुग डाळ दोन प्रकारची असते. एक म्हणजे हिरवी मुग डाळ किंवा पिवळी मुग डाळ! मुग डाळीमध्ये मोठ्या प्रमाणावर पोषक तत्वे असतात. ज्यामध्ये फ्लेवोनोइड्स, फिनोलिक एसिड, कार्बनिक अॅसिड, अमिनो अॅसिड, कार्बोहाइड्रेट आणि लिपिड यांचा समावेश आहे. याशिवाय यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, अँटीमायक्रोबियल, अँटीइन्फ्लमेट्री, अँटीडायबिटिक, अँटीहाइपरटेंसिव्ह आणि अँटीट्यूमर गुणधर्म देखील आढळतात जे अनेक आजारांवर प्रभावी असतात.

जाणकार काय म्हणतात?

आयुर्वेद विशेषज्ञ डॉक्टर दीक्षा भावसार यांनी आपली इंस्टाग्राम वर नुकतीच एक खास पोस्ट केली. ज्यामध्ये त्यांनी मुगडाळ खाण्याच्या पद्धती आणि त्याच्या सेवनामुळे मिळणारे अनेक लाभ सांगितले. त्या म्हणतात की मुग डाळ एक सुपरफूड आहे आणि यात मोठ्या प्रमाणात पोषक तत्वे असतात. त्यामुळे प्रत्यकाने मुग डाळीचे सेवन हे केलेच पाहिजे. याशिवाय ही डाळ पचायला सुद्धा सोप्पी असते आणि हलकी असते. कमीत कमी गॅस यामुळे पोटात बनतो आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे मेंदूवर सात्विक प्रभाव पडतो.

मुग डाळीचे औषधी गुणधर्म

  • चवीला गोड आणि तुरट
  • विपाक (पचनानंतरचा प्रभाव) तिखट असतो
  • ते रूक्ष (कोरडे) असते
  • लहान (पचायला हलके)
  • ग्राही (शोषक)
  • शिथा (थंड प्रभाव)
  • विशाद (जो शरीरातील अडथळे, घाण, विषारी घटक दूर करतो आणि चयापचय सुधारतो)

तुम्हाला मंडळी खोटे वाटेल पण ही गोष्ट सिद्ध झाली हे की मधुमेहावर मुग डाळ खरंच प्रभावी आहे. मुग डाळ जर एखाद्या मधुमेही रुग्णाने खाल्ली तर त्यामुळे ब्लड मधील शुगर नियंत्रित राहण्यास मदत होते. याचे कारण यात आढळणारे अँटीऑक्सिडेंट आणि अँटीडायबिटिक गुणधर्म होय. हे गुणधर्म रक्तात असणाऱ्या ग्लुकोजच्या प्रमाणाला कमी करतात. जर तुम्ही मधुमेहावर एखादा घरगुती उपाय शोधत असाल तर नक्कीच आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने एकदा मुग डाळीचे काही दिवस सेवन करून पहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here