साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी
शहरातील योगायोग पेठ,बारी वाड्यातील रहिवासी कै.नथ्थु यशवंत पाटील (बारी) यांना मोकाट गूरानी जोरदार मारल्यामुळे त्यांना गंभीर दुखा:पत झाली होती औषधोपचार सुरू असताना अखेर कै.नथ्थु यशवंत पाटील मृत्यूशी झुंज देत त्यांचे निधन आज रविवार दि.२८/०८/२०२२ रोजी झाल्यामुळे योगा योग पेठ बारी वाडा येथिल रहिवासी संतप्त झाले असून आवाज नगरपरिषद प्रशासन व काही टक्केवारी खाणारे जाड गेंड्याच्या कातडीच्या लोकप्रतिनिधी बाबत आणि मोकाट गुरे-ढोरे मालक यांच्या विरोधात मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सर्व स्तरातून केली जात आहे.
यावल नगरपरिषद हद्दीतील मोकाट गुरांना पकडून कारवाई करणे बाबतच्या ठेका देण्यात आला असल्याचे समजले परंतु ह्या मोकाट गुरढोरांवर कारवाई करताना कोणीतरी मोकाट गुरांच्या नावाखाली किंवा मोकाट गुरढोर काही मालकांकडून एका जनावरामागे दोन ते तीन हजार रुपये घेऊन मोकाट गुरे सोडून देण्यात येत असल्याबाबत दबक्या आवाजात चर्चा सुरू असल्याने मोकाट गुरांचे शेण खाणारे ते महारथी कोण याबाबत यावल नगरपालिकेने लक्ष केंद्रित करून कडक कारवाई करावी असे सुद्धा यावल शहरात बोलले जात आहे.