साईमत लाईव्ह बोदवड प्रतिनिधी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसराचे सुशोभीकरण करणे साठी लोकप्रिय आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांनी 30 लाख रुपयाचा भरगोस निधी मंजूर केल्या बद्द्ल बोद्धसामाज बांधवांच्या वतीने आमदार साहेब यांची त्याच्या निवास्थानी भेट घेऊन आभार व्यक्त करून सत्कार करण्यात आला. बोद्धसामाज बांधवांसोबत आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांनी मनमोकळ्या चर्चा केल्या , व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही याची ग्वाही सर्व समाज बांधवांना आमदार यांनी दिली तसेच कोणतेही काम असल्यास माझ्याशी संपर्क साधावा असे देखील सांगितले. त्यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करणे साठी सातत्याने पाठपुरावा केलेले शिवसेना तालुका संघटक शांताराम…
Author: Saimat
साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी यावल तालुक्यातील सांगवी बोरखेडा परिसरात असलेल्या धुळेपाडा येथे व इतर अनेक ठिकाणी ६० ते ७० आदिवासी कुटुंब वास्तव्यास असून आज पावेतो ते पुर्णपणे आपल्या हक्कापासून आणि अधिकारा पासून वंचित आहे. त्यांच्या कडे शासन,प्रशासन राजकीय पक्षांनी पुर्णपणे दुर्लक्ष केलेले असून त्यांच्या वस्तीमध्ये आजही पिण्याचे पाणी नाही,विज नाही,रस्ते नाही गटारी नाही जाण्यायेण्या साठी रस्ते नाही, आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला तर औषधोउपचारा करीता वेळेवर डॉक्टर नाही,रेशन कार्ड नाही, मतदान कार्ड नाही अश्या परिस्थीतीत ते आदिवासी आपले जिवन व्यथीत करीत आहेत.तरी त्यांना तात्काळ त्यांचा हक्क देवून त्यांना त्यांचे जिवनमान व्यवस्थीत व्यतीत करता येईल या करीता शासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात. तसेच सांगवी…
साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामध्ये नोकरी लावून देण्याच्या कारणावरून यावल तालुक्यात वीस ते पंचवीस तरुणांकडून प्रत्येकी 1 ते दीड लाख रुपये खंडणी घेऊन सुशिक्षित बेरोजगार तरुणांची फसवणूक झाल्याची यावल तालुक्यासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात आरोग्य विभागात आणि पंचायत समिती कार्यक्षेत्रात ग्रामीण भागात खमंग चर्चा सुरू असल्याने चोपडा विधानसभेच्या आमदार सौ.लताताई सोनवणे आणि रावेर विधानसभा आमदार शिरीषदादा चौधरी यांना आपल्या मतदारसंघातील सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या बेरोजगार तरुणांची आर्थिक फसवणूक हे एक मोठे आव्हान असल्याची यावल,रावेर,चोपडा तालुक्यात बोलले जात आहे. यावल तालुक्याचा पूर्व भाग हा रावेर विधानसभा मतदारसंघाचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या कार्यक्षेत्रात तसेच यावल तालुक्याचा पश्चिम भाग…
साईमत लाईव्ह मुक्ताईनगर प्रतिनिधी तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकरी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या चुकीमुळे विमा रकमेच्या लाभापासून वंचित राहणार असल्यामुळे विमा लाभाची रक्कम बँक प्रशासनाने देण्याची मागणी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ विवेक सोनवणे यांनी केली आहे. वातावरणातील नैसर्गिक असमतोल बघता शेती पिकाचे होणाऱ्या नुकसानीच्या अनुषंगाने प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत शेतकरी पिक विमा काढत असून शेतकऱ्याच्या पीक कर्ज खात्यातून बँक विम्या पोटी खरीप, जिरायत अनुषंगाने विमा रक्कम डायरेक्ट कपात करून सदर रक्कम विमा कंपनीकडे वर्ग करते त्या अनुषंगाने सदर शेतकरी विम्याच्या लाभास पात्र असून मुक्ताईनगर तालुक्यातील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मुक्ताईनगर यांच्या चुकीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना वारंवार विमाच्या लाभाच्या रकमेपासून वंचित राहावे लागत असून…
साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी पावसाने वीस दिवसांचा खंड दिल्यानंतर मंगळवारी जरंडी व परिसरात दिलासादायक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदी वातावरण निर्माण झाले होते जरंडी व परिसरात खरिपाचे जुलै कपाशीसह इतर पिके जोमात होते मात्र अगस्ट महिण्यात तब्बल पावसाचा वीस दिवसांचा खंड पडल्याने पिकांची पावसाअभावी वाढ खुंटली होती तसेच रोगराईचा प्रादुर्भाव वाढत होता पिके उन्हामुळे शेतकऱ्याच्या हातून जाण्याच्या मार्गावर होती ,यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण होते मात्र मंगळवारी सायंकाळच्या सुमारास पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये दिलासादायक वातारावर निर्माण झाले होते तसेच शेतीपिकांचे पावसाअभावी थांबलेल्या पुढील कामाच्या मशागतीस शेतकरी पुन्हा जोमात सुरुवात करणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी सोयगाव येथील संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख यांना राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त औरंगाबाद जिल्हा ऑलम्पिक संघटनेमार्फत आदर्श क्रीडा मार्गदर्शक पुरस्काराने रविवारी सहकार मंत्री अतुल सावे अर्जुन पुरस्कारप्राप्त दत्तू भोकनळ प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे औरंगाबाद ऑलम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष पंकज भारसाखळे डॉ उदय डोंगरे डॉ मकरंद जोशी डॉ संदीप जगताप यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याच बरोबर अजिंठा शिक्षण संस्था चे अध्यक्ष श्री रंगनाथनाना काळे सचिव श्री प्रकाशदादा काळे प्राचार्य डॉ गणेश अग्निहोत्री उपप्राचार्य डॉ शिरीष पवार डॉ रावसाहेब बारोटे डॉ शिवाजी अंभोरे डॉ दिलीप बिरुटे डॉ राजू वणारसे डॉ सैराज तडवी डॉ छत्रुगन भोरे…
साईमत लाईव्ह कजगाव ता भडगांव प्रतीनिधी वृक्षारोपण वैज्ञानिक आणि भौगोलिकदृष्ट्या देखील महत्त्वपूर्ण आहे. झाडे वातावरण थंड आणि शुद्ध करतात. शुद्ध हवा लोकांना निरोगी बनवते. वृक्षांच्या आकर्षणामुळे पावसाचे ढग येतात आणि दुष्काळाची भीती दूर होते. वृक्षारोपण करणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे. ते आयुष्य निरोगी, सुंदर आणि आनंदी बनवते. या सर्व गोष्टींचा विचार करत आयसीआयसीआय फाउंडेशन तर्फे आलेल्या श्री गणेश बोरगे सर आणि श्री अजिंक्य सर यांनी शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, पारोळा रोड, कजगाव आणि शारदा विद्यानिकेतन (सेमी-इंग्रजी), कजगाव या शाळेला भेट देऊन विविध प्रकारच्या 300 रोपांची शाळेला भेट देत वृक्षारोपणाचे महत्व पटवून दिले. भेट देते वेळी संस्थेचे…
साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी जळगाव महानगरपालिका शहरातील विविध मार्केटमधील पार्कींगचा प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरली आहे. या प्रश्नावर अनेकवेळा संबंधित मार्केटमधील व्यापाऱ्यांनी आवाज उठवूनदेखील त्याची दखल का घेतली जात नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सुभाषचौक परिसरातील भवानी मंदिरासमोर असलेल्या डी.एच. प्लाझा या दुमजली मार्केटमधील पार्कींगच्या जागेबाबतही गेल्या नऊ वर्षापासून मनपाकडे वारंवार तक्रारी अर्ज करुन देखील अद्यापपावेतो कोणतीही कार्यवाही होत नसल्यामुळे आता या मार्केटमधील 24 व्यावसायिकांनी एकत्रित येत या प्रश्नी मुख्यमंत्र्यांची भेट घेवून न्याय मिळण्याची भूमिका घेतल्याचे वृत्त आहे. डी.एच. प्लाझा या मार्केटमध्ये पार्कींगच्या जागेवर मार्केटचे मालक दिलीपकुमार हिराचंद यांनी गाळे बांधून भाडेतत्त्वाने दिले आहेत व पार्कींगच्या जागेवर खुलेआमपणे अतिक्रमण…
साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी तालुक्याशी दोन महत्वाच्या राज्यांना जोडणाऱ्या बु्ऱ्हाणपुर अंकलेश्वर या राज्यमार्गा वरील रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाली असुन , रस्त्यात खड्डा की खुडयात रस्ता अशी अवस्था ही खड्डेमय झाली असल्याने या मार्गावरील खड्डेमय रस्त्यांमुळे वारंवार वाहनधारकांना अपघाताला सामोरे जावे लागत असुन अनेक वाहनधारकांनी अशा प्रकारे झालेल्या अपघातात आपला जिव देखील गमावला असुन , या मार्गावरील रस्त्यावरील यावल ते किनगाव हे रस्ते आठ दिवसात दुरुस्त न झाल्यास आपण यावलच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा ईशारा संबंधीत विभागास दिलेल्या निवेदनाद्वारे जिल्हा परिषदचे माजी आरोग्य सभापती रविन्द्र सुर्यभान पाटील यांनी दिला आहे . या संदर्भात दिलेल्या तक्रार निवेदनात…
साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी पाडळसे ग्रामपंचायत 15 व्या वित्त आयोगातून पाडळसे गावातील बस स्टँड परिसर आठवडे बाजार परिसर ग्रामपंचायती इमारतीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले या कॅमेऱ्याचा लोकार्पण सोहळा काल दि.28 रोजी फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ.कुणाल सोनवणे यांनी सांगितले गावामध्ये एकोपा आणि शांतता नांदल्यास गावात मोठा विकास होऊ शकतो आगामी काळातील गणेशोत्सव आणि इतर सण शांततेत साजरा करावे असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांनी व्यक्त केले यावेळी फैजपूर सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर, पाडळसे सरपंच ज्ञानेश्वर तायडे, उपसरपंच माधुरीताई पाटील, पोलीस पाटील सुरेश खैरनार, सहाय्यक फौजदार हेमंत सांगळे, माजी…