Author: Saimat

साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी समाजात राजकारणाच्या माध्यमातून विविध शासकीय योजनां राबवून रस्त्यांसह इतर अनेक विकास कामांची बांधकामे मोठा गाजावाजा करून होत असतात परंतु राजकीय प्रभावामुळे आणि ठेकेदार संबंधित अधिकारी यांच्या संगनमतामुळे टक्केवारीच्या वाढत्या प्रमाणामुळे विकास कामांची गुणवत्ता खड्ड्यात गेली आहे.विकास कामे रस्त्याची कामे झाल्यानंतर ती कामे किती वर्ष टिकायला पाहिजे याचे सर्व निकष,अटी,शर्ती ठेकेदारांनी जमिनीत गाडून टाकल्यामुळे बोगस आणि निकृष्ट प्रतीची कामे होत आहे आणि हे सर्व लोकप्रतिनिधींना समजून येत असून सुद्धा ते न समजल्या सारखे जनतेला दाखवितात. या मागील सर्व कारणे जनतेला माहीत आहे.अशा प्रकारच्या भ्रष्टाचार,गैरप्रकाराच्या मागे न लागता आरोप प्रत्यारोप न करता तसेच लोकप्रतिनिधी आणि शासकीय यंत्रणेवर अवलंबून…

Read More

साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी संप काळात एस.टी.महामंडळात महाराष्ट्रात एकूण ८०० कत्राटी चालकांची नियुक्ती करण्यात आली होती चालकांना कोणतेही सुचना न देता अचानक जळगाव विभागात वाहतूक विभागाने दि.३सप्टेंबर रोजी कत्राटी चालकांना कमी करण्याचे आदेश काढले एस.टी. महामंडळाचे या निर्णयामुळे कत्राटी चालकांनवर उपासमारिची वेळ आली आहे. संपामध्ये लालपरीला साथ देणारे कत्राटी चालक यांचा विचार करावा व कायम स्वरूपी करावे असे निवेदन रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिरिषदादा चौधरी यांच्याकडे निवेदन देण्यात आले.तरी एसटी महामंडळ काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे, निवेदनावर नेहाल सय्यद,नितेश कोळी,मजर खान,कृष्णा वराडे,अमजत खान अमीर पटेल यांची स्वाक्षरी आहे.

Read More

साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी यावल  अंजाळे शिवारात स्टोन क्रशर चालक,मालक हे तापी नदी किनारपट्टीवर गौण खनिजाचे आपल्या सोयीनुसार आणि आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात गौण खनिजाचे उत्खनन करून नाममात्र रॉयल्टी भरून गौण खनिजाची सर्रासपणे अनधिकृत, बिना परवाना वाहतूक करून गौण खनिज विक्री करून शासनाचा दर महिन्याला लाखो रुपयांचा महसूल बुडवीत असल्याचे महसूल विभागाच्या लक्षात आल्याने आज बुधवार दि.7 सात रोजी दुपारी अंजाळे शिवारातून दोन डंपर खडकाने म्हणजे गौण खनिज आणि अनधिकृत वाहतूक करीत असताना पकडल्याने स्टोन क्रेशर मालकांसह काही राजकीय प्रभाव टाकणाऱ्यांना मोठी चपराक बसली. या पकडलेल्या दोन डंपर मालक चालक यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार हे यावल तहसीलदार ऐवजी प्रांताधिकारी कैलास…

Read More

साईमत लाईव्ह उमाळे ता. जळगाव प्रतिनिधी  येथील ग्रामपंचायत  तर्फे  लंपी रोग प्रतिबंधक लसीकरण व गोचीड निर्मूलन फवारणी चा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला. यावेळी सरपंच संगीता खडसे ,उपसरपंच मीराबाई पाटील, ग्रा.पं सदस्या मनीषा पाटील, ग्रा.पं सदस्य संदीप  बिराडे, योगेश सोनवणे, सुरेश  धनगर आदींची उपस्थीती होती. महाराष्ट्र शासन व पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद जळगाव पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-2 कंडारी व ग्रामपंचायत उमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने. उमाळा ग्रामपंचायत यांनी गावातील पशुधनासाठी 700 लस मात्रा उपलब्ध करून दिल्या. यशस्वीतेसाठी  विस्तार अधिकारी डॉ. सलीम तडवी, डॉ हेमंत कुमावत कंडारी व सचिन पाटील , राज धनगर आदींसह उमाळा येथील ग्रामस्थांनी परीश्रम घेतले.

Read More

साईमत लाईव्ह कजगाव ता भडगाव प्रतीनिधी कजगाव ता भडगाव येथील रहिवासी व लष्करातील सैनिकाने आपल्या मुलीचा जन्मदिवस दिव्यांग बालकांसबोत अनोख्या पद्धतीने साजरा करून एक नवीन आदर्श जगासमोर ठेवला आहे. सैनिक हे वर्षभरातून फार तर दोन ते तीन वेळेस सेवेतून रजा घेऊन आपल्या गावी येत असतात त्यामुळे त्यांना बऱ्याच वेळेस आपल्या मुलाबाळांना वेळ देणे शक्य होत नाही त्यांना नेहमी आपल्या आई वडील पत्नी मुलांपासून व परिवार पासून दूर राहावे लागते त्यामुळे सुट्टी वर आल्यावर ते शक्य तेवढा कुटुंबासाठी वेळ देण्याचा प्रयत्न करीत असतात त्यामुळे कुटुंब व आधार काय असतो हे देशाची सेवा अविरतपणे करणाऱ्या सैनिकांना चांगलेच ठाऊक असते त्यामुळे कजगाव येथील…

Read More

साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी गणेशोत्सव विसर्जनाच्या पार्शवभूमीवर सोयगाव पोलिसांनी अवैध दारूविक्री विरोधात तालुक्यात वाश आउट मोहीम हाती घेतल्याने, बुधवारी चक्क स्वतंत्र महिला पोलिसांच्या पथकांनी बहुलखेड्यात अवैध दारूविक्री करणाऱ्या महिलेविरोधात कारवाई केल्यानें तालुक्यात सोयगाव ठाण्याच्या महिला पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे…सोयगावचे पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांनी स्वतंत्र महिला पोलिसांना अवैध दारूविक्रेत्या महिला विरुद्ध कारवाई साठी पथक स्थापन केले आहे. बहुलखेडा ता सोयगाव येथे राहत्या घरासमोर संगीताबाई संजय पवार या राहत्या घरासमोर गावरान(हातभट्टी) दहा लिटर दारू विक्रीसाठी बाळगून कबज्यात असल्याची खात्रीलायक माहिती महिला पोलीस भाग्यश्री चव्हाण यांना मिळताच त्यांनी तातडीने बहुलखेडा गावात सापळा रचून विनापरवाना अवैध गावरान(हातभट्टी) ची दहा लिटर दारू…

Read More

साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी सोयगाव परिसरात अचानक झालेल्या वादळी वाऱ्याच्या तडाख्याच्या चक्रव्यूहात १४ गावे अर्धातास अडकली होती..या अर्ध्यातासात तेरा गावात खरिपाची पिके आडवी पडली आहे त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे..या वादळी वाऱ्याच्या तडाख्यात तीस मिनिटात होत्याचे नव्हते झाल्याने शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे या वादळी वाऱ्याच्या तडाख्यात तेरा गावांमध्ये तब्बल पाच हजार तीनशे आठ हेक्टर वर पीक उध्वस्त झाली असून यामध्ये कपाशीचे पिके आडवी झाली आहे. सोयगाव परिसरातील तेरा गावांना बुधवारी सायंकाळी चार वाजता अचानक वादळी वाऱ्याच्या चक्रव्यूहाने घेरले होते यामध्ये जरंडी परिसराला मोठा तडाखा बसला आहे.जरंडी, निंबायती शिवारात तब्बल एक हजारावरील हेक्टरवरील कपाशी पिके आडवी झाली असून वादळाचा…

Read More

 काय मटक्याच्या टपऱ्या,काय दारूचे अड्डे, काय करोड रु जुगारची अड्डे, काय लाखोचा गुटखा कस एकदम ओके मध्ये कस खोके देऊन जोरात चालू आहे राजकीय वरदहस्त की प्रशासनाचे दुर्लक्ष तर नाही ना पोलीस प्रशासनाकडून कारवाईस विलंब का ? साईमत लाईव्ह मुक्ताईनगर प्रतिनिधी  मुक्ताईनगर शहरांमध्ये जवळच असलेल्या परिवर्तन चौकाच्या लागून काही हात गाड्यांमध्ये खुलेआम मटका घेतला जात आहे लाखो करोडो रुपयांची उलाढाल या माध्यमातून होताना दिसून येत आहे सट्टा मटका हा रोज हा साधारण वर्ग व अ साधारण वर्ग प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या भ्रमणधणी द्वारे किंवा चिठ्ठ्यांद्वारे खेळला जात आहे साधारणतः परिवर्तन चौका लागत असलेल्या रोहिदास नगर पासून ते बजरंग टी जवळून गावंडे कॉम्प्लेक्स च्या…

Read More

शनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (NEET) UG, 2022 साठी निकाल जाहीर करण्याची तारीख आणि वेळ जाहीर केली आहे. NTA वेळापत्रकानुसार, NEET UG 2022 चा स्कोअर कार्ड neet.nta.nic.in वर अधिकृतपणे वेबसाइटवर आज प्रसिद्ध केला जाईल. NEET Result 2022 LIVE Updates: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (NEET) UG, 2022 साठी निकालाची तारीख आणि वेळ जाहीर केली आहे. NTA वेळापत्रकानुसार, NEET UG 2022 चे स्कोअरकार्ड   neet.nta.nic.in. अधिकृतपणे वेबसाइटवर आज  प्रसिद्ध केले जातील. ही परीक्षा 17 जुलै रोजी घेण्यात आली होती. एका अहवालानुसार, सुमारे 18.72 लाख उमेदवारांनी प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी केली होती. NTA…

Read More

साईमत लाईव्ह चाळीसगाव प्रतिनिधी गणेशोत्सवानिमित्ताने राज्यात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, त्याचप्रमाणे चाळीसगाव येथे आमदार मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित एकदंत गणेशोत्सव मंडळाने देखील एका स्तुत्य उपक्रमाचे आयोजन केले होते. चाळीसगाव शहरातील तृत्तीय पंथीय महिलांकडून यावेळी गणेशाची आरती करण्यात आली. ‘श्रीं’च्या आरतीचा मान तृत्तीयपंथी महिलांना मिळाल्याने या महिलांनी देखील आनंद व्यक्त केला. यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.प्रतिभाताई चव्हाण, शहर पोलीस निरीक्षक के.के.पाटील, एकदंत गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र पाटील, किशोर रणधीर, माजी नगरसेवक भास्कर पाटील, राजेंद्र गवळी, आनंद खरात, मनोज गोसावी, योगेश खंडेलवाल, स्वप्नील मोरे, संदीप गवळी, राहुल पाटील, कपिल पाटील आदी उपस्थित होते. यावेळी…

Read More