लष्करातील सैनिकाने मुलीचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने केला साजरा

0
40

साईमत लाईव्ह कजगाव ता भडगाव प्रतीनिधी

कजगाव ता भडगाव येथील रहिवासी व लष्करातील सैनिकाने आपल्या मुलीचा जन्मदिवस दिव्यांग बालकांसबोत अनोख्या पद्धतीने साजरा करून एक नवीन आदर्श जगासमोर ठेवला आहे.

सैनिक हे वर्षभरातून फार तर दोन ते तीन वेळेस सेवेतून रजा घेऊन आपल्या गावी येत असतात त्यामुळे त्यांना बऱ्याच वेळेस आपल्या मुलाबाळांना वेळ देणे शक्य होत नाही त्यांना नेहमी आपल्या आई वडील पत्नी मुलांपासून व परिवार पासून दूर राहावे लागते त्यामुळे सुट्टी वर आल्यावर ते शक्य तेवढा कुटुंबासाठी वेळ देण्याचा प्रयत्न करीत असतात त्यामुळे कुटुंब व आधार काय असतो हे देशाची सेवा अविरतपणे करणाऱ्या सैनिकांना चांगलेच ठाऊक असते त्यामुळे कजगाव येथील तरुण व भारतीय लष्करातील जवान हर्षदीप संजय महाजन यांनी आपली मुलगी हर्षिता च्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण वेळ हा दिव्यांग बालकांशी हितगुज करून व त्यांच्या सोबत वाढदिवस साजरा करून त्यांना मायेचा व कुटुंबाचा आधार देऊन प्रेमाने घास भरवून एक नवीन आदर्श निर्माण केला व दिव्यांग बालकांना त्यांच्या आवडीचे भोजन देऊन त्यांचा सन्मान केला दिव्यांगांना नेहमी आपल्या सोबत घेऊन चालावे व समाजाने त्यांना दुबळे न समजता त्यांना आपल्यातीलच एक समजून त्यांना आधार द्यावा असा त्यामागील हेतू आल्याचे सैनिक हर्षदीप महाजन यांनी सांगितले यावेळी चाळीसगाव अंधशाळेच्या मुख्याध्यापिका प्रभा मेश्राम संजय महाजन हर्षदीप महाजन एकनाथ महाजन मयूर महाजन मथुराबाई महाजन आशाबाई महाजन अलका महाजन निकीता महाजन शुभांगी महाजन वैष्णवी महाजन साईराज महाजन अंधशाळेच्या कर्मचारी व आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here