आदित्य ठाकरेंच्या चार निकटवर्तीयांवर गुन्हा दाखल

0
13

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी

मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि भाजपचे मुस्लीम समाजाचे प्रदेश सचिव हैदर आझम यांच्याविरोधात सोशल मीडियावर फोटो व्हायरल करणे युवासेना अध्यक्ष आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीयांना महागात पडले आहे. भाजपनेते आझम यांचा भाऊ जावेद मोहम्मद फारुख आझम यांनी गोरेगाव येथील बांगूरनगर पोलीस ठाण्यात आदित्य यांच्या जवळच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

“पेंग्विन सेना कुठले जुनेपुराणे संदर्भहीन फोटो शोधून समाजमाध्यमात माझी बदनामी करत आहे, त्याविरोधात हैदर आझम यांनी एफआयआर दाखल केले आहे. गेली २५ वर्षे मुंबईला ज्यांनी लुटले त्यांचे गोरखधंदे उघड होऊ लागल्याने सैराट झालेत. होऊ द्या, खोट्या पत्त्यांचे इमले चढवत राहा, ढासळणार आहेतच,” असे ट्विट आशिष शेलार यांनी केले आहे. अनिल कोकीळ, नीलेश पारडे, विजय तेंडुलकर आणि आकाश बागुल यांच्याविरोधात एफआयआर दाखल केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here