कजगाव येथील सरसकट अतिक्रमण काढण्यात यावे अशी कजगाव नागरिकांची मागणी

0
2

साईमत लाईव्ह  कजगाव प्रतिनिधी

कजगाव ता.भडगाव कजगाव ग्रामपंचायत हद्दीतील गावठाण मधील बस स्थानक,स्टेशन रोड,प्राथमिक आरोग्य केंद्र रोड,नागद रोड तसेच कजगाव चाळीसगाव रोडलगत,कजगाव भडगाव रोडलगत असलेल्या सर्व्हिस रोडवरील पक्के व दुकानदारांनी केलेले अतिक्रमण काढण्यात यावे अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा तेहतीस नागरिकांनी संबंधिताना पाठविलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

बाबत वृत्त की कजगाव बस स्थानक प्रमाणेच स्टेशनरोड,प्राथमिक आरोग्य केंद्र रोड,नागद रोड तसेच कजगाव चाळीसगाव रोडलगत असलेल्या सर्व्हिस रोडवरील, कजगाव भडगाव रोडलगत असलेल्या सर्व्हिस रोडवरील काहि पक्के व दुकानांचे हे सारे अतिक्रमण काढण्यात यावे अशी मागणी येथील तेहतीस नागरिकांनी वरिष्ठांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली असुन निवेदनात म्हटले आहे की अतिक्रमण बाबत सरपंच ग्रामविकास अधिकारी यांनी कर्तव्यात कसुर केल्याचे स्पष्ट दिसुन येत असुन आपल्या स्थरावरून शिस्तभंगाची कारवाई करून सरसकट अतिक्रमण काढण्यात यावे सदर अतिक्रमण मुळे जिवीत हानी होण्याची दाट शक्यता असल्याचे निवेदनात म्हटले असुन निवेदनाच्या प्रति विभागीय आयुक्त नाशिक,जिल्हाधिकारी जळगाव, मुख्यकार्यकारी अधिकारी जळगाव, जिल्हा पोलीस अधीक्षक जळगाव, उपविभागीय अधिकारी पाचोरा,अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव, तहसीलदार भडगाव, पोलीस निरीक्षक भडगाव, गटविकास अधिकारी भडगाव, सरपंच व ग्रामविकास अधिकारी कजगाव यांना पाठविण्यात आल्या असुन वरील मार्गावरील सारे अतिक्रमण काढण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली असुन अन्यथा या साठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषणाचा इशारा दिला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here