Author: Saimat

साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी सोयगाव दि.. १४ देशभरात लम्पी या आजाराने थैमान घातले असून पशुपालकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे लम्पी या आजारावर अद्यापही तालुक्यात लस उपलब्ध नसल्याने पशुपालकांमध्ये घबाराट निर्माण झाली आहे हा गाय, बैल या प्राण्यावर लम्पी या आजाराची लागन दिसून येत आहे. सोयगाव तालुक्यातील जामठी येथील शेतकरी तुकाराम कल्लू चव्हाण यांच्या बैलाला देखील लम्पी या आजाराची लागण झाली होती अखेर उपचार सुरू असताना मंगळवार दि.१३ रोजी बैलाचा मृत्यू झाला आहे या घटनेने गावासह ,तालुक्यात शेतकरीवर्ग व पशुपालकामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोयगाव पशुवैद्यकीय अधिकारी यांनी याकडे गंभीरतेने लक्ष घालून लवकरात लवकर लम्पी आजार नियंत्रक लस…

Read More

शरीरासाठी आवश्यक प्रमाणात कॅल्शियम देणाऱ्या पदार्थांचे नियमित सेवन करणे गरजेचे आहे. ही गरज दूध किंवा त्यापासून निर्मित पदार्थांपासून भागवता येते. अशी समज आहे. ते बरोबरही आहे. परंतु, डाळींच्या सेवनातूनही आपल्याला कॅल्शियम मिळवता येते. कॅल्शियम शरीरातील हाडांना, दातांना मजबूत ठेवते. तसेच रक्त गोठणे, स्नायू मजबूत करणे आणि हृदयाचे ठोके, तसेच मज्जातंतूंच्या कार्यावर नियंत्रण ठेवण्यातही कॅल्शियम महत्वाची भूमिका बजावते. त्यामुळे, शरीरासाठी आवश्यक प्रमाणात कॅल्शियम देणाऱ्या पदार्थांचे नियमित सेवन करणे गरजेचे आहे. विशेषकरून महिलांना आणि मुलांना त्याची जास्त गरज असते. ही गरज दूध किंवा त्यापासून निर्मित पदार्थांपासून भागवता येते, असा समज आहे. ते बरोबरही आहे. परंतु, डाळींच्या सेवनातूनही आपल्याला मोठ्या प्रमाणात कॅल्शियम मिळते.…

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी  साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळ बरखास्त – महाविकास आघाडी सरकारने नियुक्त केलेल्या साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाची नियुक्ती मुबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्द केली आहे. येत्या दोन महीन्यात नविन विश्वस्त मंडळ नेमण्याचे आदेश राज्य सरकारला आदेश देण्यात आले आहे. तो पर्यंत त्रिसदस्यीय समीती कामकाज पाहणार आहे. गेल्या काही वर्षात उच्च न्यायालयाकडून विश्वस्त मंडळ बरखास्त होण्याची ही दुसरी वेळ आहे. सन 2004 साली राज्य सरकारने एक नवा कायदा आणत साईसंस्थान राज्य शासनाच्या अख्यारीत आणत सतरा सदस्यीय राजकीय व्यक्तीच विश्वस्त मंडळ नेमले होते. राज्यातील सरकार राजकीय कार्यकर्त्यांची सोय विश्वस्त मंडळावर लावते. तसेच विधानमंडळाने पारीत केलेल्या कायद्यानुसार विश्वस्त मंडळातील सदस्य नेमले…

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी ठाणे तालुक्यातील १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेमध्ये समावेश करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार सोमवारी दि. १२ सप्टेंबर रोजी नगरविकास विभागामार्फत त्याबाबत प्राथमिक अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. हद्दवाढीच्या या कार्यवाहीमुळे ठाणे तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूका डिसेंबर २०२२ पर्यंत पुढे ढकलण्याची विनंती नगरविकास विभागाने राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. ठाणे जिल्ह्यातील दहिसर, मोकाशी, वालीवली, पिंपरी, निघू, नावाळी, वाकळण, बामाली, नारीवली, बाळे, नागाव, भंडाली, उत्तरशिव आणि गोटेघर या १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. त्यानुसार याबाबतची अधिसूचना  प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने माहे जानेवारी २०२१ ते मे २०२२ कालावधीत मुदत…

Read More

साईमत लाईव्ह चाळीसगाव प्रतिनिधी गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक बघता आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले. दरम्यान, प्रशासनाने  चाळीसगाव पाचोरा भडगाव परिसरातील गिरणा नदीकाठील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गेल्या दोन दिवसापासून परतीच्या मानसूनचा पाऊस सूरू आहे. गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही दमदार पाऊस झाला असून पावसाची रिपरिप सूरूच आहे. त्यामुळे गिरणा  धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्याने आज सकाळी ७ वाजता ६ वक्रद्वार उघडण्यात आले आहे.  यात क्रमांक ३ व ४ हे प्रत्येकी १ फुटने उघडण्यास आले आहे. सध्यस्थितीत धरणाचे ६ वक्रद्वार १ फुटाने उघडे असून त्याद्वारे गिरणा नदीपात्रात  7332क्यूसेस पाण्याच्या…

Read More

साईमत लाईव्ह उस्मानाबाद प्रतिनिधी राज्यात लंपी स्किन आजाराचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात या आजाराने एन्ट्री केली आहे. त्यामुळे पशुपालकामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यासाठी जनावरांचे लसीकरण करणे योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. लंपी स्कीन डिसीज आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी खबरदारीची उपाय योजना उपाय मनुन जनावरांच्या वाहतूकीवरही बंदी बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रशासनाने प्रभावीपणे उपाययोजना करून जनावरांचा मृत्यूदर कमी करावा. लंपी स्कीनचा प्रादुर्भाव आपल्या जनावरांना होऊ नये यासाठी पशुपालकांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने लोहारा व उमरगा तालुक्यातील संशयीत पशुधनाच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवले होते.…

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि भाजपचे मुस्लीम समाजाचे प्रदेश सचिव हैदर आझम यांच्याविरोधात सोशल मीडियावर फोटो व्हायरल करणे युवासेना अध्यक्ष आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीयांना महागात पडले आहे. भाजपनेते आझम यांचा भाऊ जावेद मोहम्मद फारुख आझम यांनी गोरेगाव येथील बांगूरनगर पोलीस ठाण्यात आदित्य यांच्या जवळच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. “पेंग्विन सेना कुठले जुनेपुराणे संदर्भहीन फोटो शोधून समाजमाध्यमात माझी बदनामी करत आहे, त्याविरोधात हैदर आझम यांनी एफआयआर दाखल केले आहे. गेली २५ वर्षे मुंबईला ज्यांनी लुटले त्यांचे गोरखधंदे उघड होऊ लागल्याने सैराट झालेत. होऊ द्या, खोट्या पत्त्यांचे इमले चढवत राहा, ढासळणार आहेतच,”…

Read More

साईमत लाईव्ह जामनेर प्रतिनिधी तालुक्यातील पहूर येथे आज सकाळी दहा वाजता जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी येथील ग्रुप ग्रामपंचायत सभागृहात लोकप्रतिनिधी व पशुसंवर्धन मालक यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आले होते. या बैठकीत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे स्वागत लोकनियुक्त सरपंच नीताताई पाटील सरपंच शंकर जाधव माजी कृषी सभापती प्रदीप लोढा माजी जि प सदस्य राजधर पांढरे माजी पंचायत समिती सभापती बाबुराव घोंगडे उपसरपंच श्याम सावळे उपसरपंच राजीव जाधव आदी मान्यवरांनी शाल श्रीफळ देऊन स्वागत केले. याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी पशुसंवर्धनावर आलेल्या लपी आजाराने ग्रस्त असलेल्या पशुसंवर्धन मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होऊन सर्व पशुसंवर्धन मालकांनी लस्सीकरण ताबडतोब करून घ्यावे…

Read More

साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी यावल तालुक्यात ग्रामीण भागातील अनु.जाती / जमातिच्यां लोकांवर होत असलेल्या अन्यायाबाबत निळे निशाण सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांच्या व पदाधिकारी कार्यकर्ते वतीने यावल पंचायत समिती गट विकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. दि.12 रोजी यावल पंचायत समिती गट विकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात निळे निशाण सामाजिक संघटनेतर्फे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी म्हटले आहे की यावल तालुक्यातिल अनेक गावांमध्ये अनु.जाती / जमातिचे तसेच इतर गोरगरिब मोठया प्रमाणात वास्तव्यास असुन ते आजही त्यांच्या मुलभुत हक्कापासून वंचित आहेत तसेच काही लोक जाणिव पुर्वक त्यांच्यावर अन्याय करित आहेत त्यात काही ग्रामसेवक , आरोग्यसेवक,आशावर्कर , अंगणवाडी सेविका,स्वस्त धान्य दुकानदार,शिक्षक,ठेकेदार असे अनेकांचा समावेश…

Read More