Author: Saimat

साईमत लाईव्ह पहुर ता.जामनेर प्रतिनिधी  येथील खंडेराव नगरात दोन ठिकाणी घरफोडी करत अज्ञात चोरट्यांनी  रोकडसह  सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली असून याबाबत पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की , खंडेराव नगर येथील रहिवासी विजय सुभाष पांढरे घरामध्ये झोपलेले असताना अज्ञात चोरट्याने यांच्या घरातून 50 हजार रुपये कॅश व साडेतीन तोळे सोने असे एकूण अडीच लाख रुपये किमतीचे एवज  चोरुन नेला. आज सकाळी विजय पांढरे झोपेतून जागे झाले असता सदर प्रकार त्यांच्या लक्षात आला. विजय पांढरे यांनी नुकताच शेतातील मक्का विक्रीचे पैसे व्यापाऱ्यांकडून आणले होते.तसेच घरातील आई व पत्नी, वहिनी यांचे दाग…

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. पण, त्यांनी विश्वास मताला सामोरे जाऊन अधिवेशनात संख्याबळाची चाचणी केली असती तर अधिक उचित ठरले असते, असे म्हणत खडसे यांनी उद्धव ठाकरेंकडून झालेल्या चुकीवर प्रकाश टाकला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेलाच धनुष्यबाण चिन्ह मिळाले पाहिजे , असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. एकनाथराव खडसे यांनी केले. महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या शिंदे गट विरूद्ध ठाकरे गट प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीमध्ये न्यायालयाने शिवसेनेच्या पक्षचिन्हाबाबत निवडणूक आयोगाकडे निर्णय सोपवला आहे. न्यायालयाचा निर्णय उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जातो. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. एकनाथराव खडसे यांनी…

Read More

साईमत लाईव्ह कजगाव प्रतिनिधी कजगाव तालुका भडगाव येथील बस स्थानक समोरील अतिक्रम मोठ्या पोलीस बंदोबस्तात काढण्यात आले. अतिक्रमण धारकांनी स्वताच आपले अतिक्रमण काढून घेतले, याबाबत सविस्तर वृत्त असे की कजगाव येथील बस स्थानक समोरील अतिक्रमण काढण्यात यावे या मागणीसाठी कजगाव येथील भूषण पाटील यांनी गेल्या वीस दिवसापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. या मागणीचा विचार करत कजगाव बस स्थानक समोरील अतिक्रमण काढण्यात बाबत हालचाली सुरू झाल्यानंतर बस स्थानक समोरील अतिक्रमण काढण्यात आले. अतिक्रम काढण्यासाठी लागणारा पोलीस बंदोबस्त कजगाव येथे पोहोचल्यानंतर अतिक्रमण धारकांना बारा वाजेपर्यंत अतिक्रमण काढून घेण्याचे सांगितले त्याप्रमाणे अतिक्रमण धारकांनी स्वतहून आपल्या अतिक्रम काढून घेत बस…

Read More

साईमत लाईव्ह तुळजापूर प्रतिनिधी तुळजापूर येथे शारदीय नवरात्र महोत्सवात श्री तुळजाभवानी देवीची नित्योपचार पूजा करण्यात आली. शारदीय नवरात्राची दुसरी माळ. तत्पूर्वी पहाटे 6 ते सकाळी 10 या वेळेत देवीची अभिषेक पूजा करण्यात आली. त्यानंतर आरती झाली. यापद्धतीने श्री तुळजाभवानी देवीचे दररोज विविध धार्मिक विधी विधीवत पार पाडले जातात. श्री तुळजाभवानी देवीची विविध अलंकार पूजेस दि. 29 सप्टेंबर पासून सुरुवात होत आहे. दि.29 सप्टेंबर रोजी रथ अलंकार महापूजा, दि.30 सप्टेंबर रोजी ललीत पंचमी निमित्त मुरली अलंकार महापूजा, दि.01 ऑक्टोबर रोजी शेषशाही अलंकार महापूजा, दि. 02 ऑक्टोबर रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा आणि दि.3 ऑक्टोबर रोजी महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा होणार आहेत.…

Read More

साईमत लाईव्ह भुसावळ प्रतिनिधी जामनेररोड वरील संतधाम परीसरातील श्री सप्तश्रृंगी देवीच्या मंदिरात सोमवारी नवरात्रोत्सवानिमीत्त भाविकांच्या उपस्थितीत घटस्थापना करण्यात आली. घटपुजन मिलिंद कुळकर्णी यांनी केले, त्यांना दिनेश साहु, पुर्वा कुळकर्णी, किर्ती ठाकूर व प्रिया कुळकर्णी यांनी सहकार्य केले. भाविकांनी देवीचे दर्शन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read More

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ पत्रकार तथा धर्म गुरू मुफ्ती हारून नदवी यांची व्हाईस ऑफ मीडिया च्या उर्दू भाषिक सेल च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली, ही नियुक्ती व्हाईस ऑफ मीडिया चे संस्थापक अध्यक्ष, संपादक संदीप काळे यांनी केली आहे. शहरातील ईकरा महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या एका सामाजिक कार्यक्रमात मुफ्ती हारून नदवी यांना मान्यवरांच्या उपस्थितीत सदर नियुक्तीपत्र देण्यात आले. मुस्लिम समाजाच्या जमाते उलेमा या संघटने तर्फे व्यसनमुक्ती आणि वाढत्या आत्महत्या रोखण्या संदर्भात एक मोहीम सुरू करण्यात आली आहे, त्याची सविस्तर माहिती देण्यासह प्रबोधनाचा कार्यक्रम घेण्यात आला होता, त्यावेळी त्यांना हे नियुक्तीपत्र देण्यात आले.प्रारंभी व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष सुरेश उज्जैनवाल…

Read More

साईमत लाईव्ह चोपडा  प्रतिनिधी येथील सीएनजी ग्रुप, चोपडा पिपल्स बॅक सार्वजनिक सेवा ट्रस्ट, चोपडा तालुका व्यापारी महामंडळ व इतर सहकारी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य अशा नवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई, पुणे यासारख्या मोठमोठ्या शहरात होणार्‍या कार्यक्रमाप्रमाणेच या उत्सवाचे आयोजन होणार असल्याचे सांगण्यात आले. शहरातील व तालुक्यातील जनतेने या उत्सवात सहभागी होऊन आपला आनंद द्विगुणित करावा व कधीही न घेतलेला अनुभव घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या उत्सवात सुप्रसिध्द गायक अभिदत्त, शांभवी ठाकूर, आर्यन तिडके, सागर केडुंरकर, आकाश झवेरी, जतिन उदासी, दिवेश राणा, आवेश दरबार, वरूण शर्मा (चु-चा) येत आहेत. सदर कार्यक्रम कृषी उत्पन्न बाजार समिती येथे  २६…

Read More

साईमत लाईव्ह यावल तालुका  प्रतिनिधी दुर्मिळ असलेला पोवळा जातीचा विषारी लहान साप यावल तालुक्याच्या सीमेवर तसेच रावेर तालुक्यातील ’रिधोरी’ गावात आढळून आल्याने तेथील स्थानिक सर्पमित्र किशोर सोनवणे यांनी त्याचे रेस्क्यू केले. पोवळा हा आपल्या परीसरात आढळून येणार्‍या विषारी सापातील सर्वात लहान सांप असून हा साप तांबुस,तपकिरी रंगाचा असतो.या सापाच्या शेपटीला दोन काळे पट्टे असतात.असे काळे पट्टे बिनविषारी काळतोंड्या या सापामध्ये आढळुन येत नाही.पोवळा या सापाला डिवचले असता हा शेपटीची गुंडाळी करुन शेंदुरी/केशरी रंग प्रदर्शित करतो.असा हा पोवळा जातीचा साप रिधोरी गावात आढळून आल्याने सर्पमित्र किशोर सोनवणे यांनी त्याचे रेस्क्यू केले.

Read More

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील जनसंवाद आणि पत्रकारिता विभागातर्फे दि. २७ सप्टेंबररोजी सकाळी ११.३० ते दुपारी १.३० वाजेदरम्यान ’माध्यमांची भाषा : काल आज आणि उद्या’ या विषयावर वेबसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागाचे माजी विभागप्रमुख तथा सवांद माध्यमतज्ज्ञ डॉ.श्रीपाद भालचंद्र जोशी, आकाशवाणी आणि दूरदर्शन केंद्राचे माजी कार्यक्रम अधिकारी तथा नागपूर येथील धनवटे नॅशनल कॉलेजच्या जनसंवाद विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ.बबन नाखले आणि मुंबई येथील लोकमत डिजिटल न्यूजचे संपादक आशिष जाधव हे ’माध्यमांची भाषा : काल आज आणि उद्या’ या विषयावर संवाद साधणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कला व मानव्यविद्या प्रशाळेचे संचालक…

Read More

साईमत लाईव्ह जळगाव  प्रतिनिधी बहुजन समाजाने महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांची कास धरावी. संघटित होऊन महात्मा फुले यांचा कृतिशील वारसा चालवणे आजही काळाची गरज आहे, असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी जळगावात केले. सत्यशोधक समाजाने २४ सप्टेंबर रोजी १५०व्या वर्षांत पदार्पण केले. महात्मा फुले यांच्या अतुलनीय ऐतिहासिक कार्याच्या वाटचालीची कृतज्ञ आठवण म्हणून शनिवारी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी, सत्यशोधकी साहित्य परिषद, भीम-रमाई प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव येथील अथर्व पब्लिकेशन्स यांच्यातर्फे श्रीरत्न कॉलनीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून सत्यशोधकी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. मिलिंद बागुल, प्रा. डॉ. के. के. अहिरे, प्रा. डॉ. सत्यजित साळव, इंदिरा…

Read More