उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेलाच धनुष्यबाण चिन्ह मिळाले पाहिजे – एकनाथराव खडसे

0
10

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी :

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. पण, त्यांनी विश्वास मताला सामोरे जाऊन अधिवेशनात संख्याबळाची चाचणी केली असती तर अधिक उचित ठरले असते, असे म्हणत खडसे यांनी उद्धव ठाकरेंकडून झालेल्या चुकीवर प्रकाश टाकला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेलाच धनुष्यबाण चिन्ह मिळाले पाहिजे , असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. एकनाथराव खडसे यांनी केले.

महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या शिंदे गट विरूद्ध ठाकरे गट प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीमध्ये न्यायालयाने शिवसेनेच्या पक्षचिन्हाबाबत निवडणूक आयोगाकडे निर्णय सोपवला आहे. न्यायालयाचा निर्णय उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जातो. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. एकनाथराव खडसे यांनी आपले मत मांडले.

सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठात उद्धव ठाकरेंनी दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देण्यात आला, मात्र आमदारांच्या अपात्रतेबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. चिन्हाबाबत निवडणूक आयोगाची भूमिका काय हे आयोगाच्या निर्णयानंतरच समोर येईल. शिवसेना हा जुना पक्ष असून धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरेंनाच मिळावा ही अपॆक्षा आहे. 16 आमदार अपात्र झाले तर शिंदे आणि भाजपचेस सरकार कोसळेल, असेही आ.खडसे म्हणाले.

भाजपने राज्यसभा आणि विधानसभेत पंकजा मुंडे यांना स्थान दिले नाही. याचा राग त्यांच्या मनात आहे. मी जनतेच्या मनावर राज्य केलं, तर मोदीही माझा पराभव करू शकत नाही, असे विधान मुंडे यांनी केले. यावर आ. खडसे यांनी भाष्य केले.
पंकजा यांनी मोदीजी सुद्धा माझा पराभव करू शकत नाही असे जर टीकेने म्हटलं असेल तर ते दुर्दैवी असून मोदींचा अपमान करण्याची भावना पंकजा मुंडे यांची नव्हती असेही आ. एकनाथराव खडसे म्हणाले.पंकजा मुंडे पक्षावर नाराज असणं हे स्वाभाविक आहे. त्यांना न्याय मिळालाच पाहिजे, असे ते म्हणाले. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजपाची सत्ता आणून देण्यामध्ये पंकजा मुंडे यांचेही मोठे योगदान आहे.

जर पक्षाच्या माध्यमातून त्यांची उपेक्षा होत असेल तर ते योग्य नाही,असेही आ. खडसे म्हणाले.
शिंदे गटातील मंत्री तानाजी सावंत यांनी मराठा समाजाबाबत दुर्दैवी वक्तव्य केले आहे. यावरही आ. खडसे यांनी सडकून टीका केली. सावंत यांच्या वक्तव्याने मराठा समाजासह इतरांच्या भावना दुखावल्या असून आरक्षण मागणं चूक आहे का? असा सवाल आ. एकनाथराव खडसे यांनी उपस्थित केला. सावंत यांनी सशर्त माफी मागण्याऐवजी बिनशर्त माफी मागावी,असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here