शिंदाड येथील छायाचित्रकार संदीप बोरसे उत्कृष्ठ छायाचित्र कार म्हणून सन्मानित

0
1

साईमत लाईव्ह कुहाड प्रतिनिधी  

जळगाव येथील लोणी कुणबी पाटील समाज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने १० वी, १२ वी व पदवीधर, पदव्युत्तर परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांसह प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.

आमदार राजूमामा भोळे, उपमहापौर कुलभूषण पाटील, माजी उपमहापौर तथा नगरसेवक सुनील खडके, नगरसेवक डॉ. विरेंद्र खडके, सामाजिक कार्यकर्ते भरत कोळी, जीवन विकास केंद्राचे डॉ. विकास निकम, शिक्षक संजय सावळे, नगरसेवक अमित काळे, सामाजिक कार्यकर्ते पियुष कोल्हे, शंकर पाटील, महिला बाल कल्याण समिती सभापती मलकापूर छाया पाटील, बी. टी. पाटील,कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि प्रतिमापूजनाने करण्यात आली. त्या वेळी उत्कृष्ठ फोटोग्राफीबद्दल शिंदाड येथील छायाचित्रकार संदीप बोरसे याना उत्कृष्ठ छायाचित्र कार म्हणून सन्मानित करण्यात आले व समाजहितासाठी देणगी देणाऱ्यांचा देखील सत्कार करण्यात आला.व सोबतच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here