साईमत लाईव्ह कजगाव प्रतिनिधी
कजगाव येथील कजगाव पारोळा रस्त्यावरील रेल्वे पूलाचे काम हे निकृष्ट दर्जाच्या असल्याचे परिसरातील नागरिकांची तक्रार आहे महिन्याभरापूर्वी पुलाचे उद्घाटन मोठ्या थाटात करण्यात आले यावेळी मोठा गाजावाजा करण्यात आला तसेच प्रसारमाध्यमांमध्ये मोठ्या मोठ्या जाहिराती देऊन कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात आले अनेक राजकीय मंडळींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली पण या कामाच्या दर्जा विषयी कोणीही बोलले नाही.
यासंदर्भात माहिती अशी की कजगाव पारोळा रस्त्यावर रेल्वे रुळावरून फुलाचे बांधकाम लाखो रुपये शासनाचे खर्चून करण्यात आले बांधकाम विलंबाने का होईना पूर्ण झाले पण हे काम थातूरमातूर पद्धतीने व निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप केला जात आहे. उद्घाटन होऊन महिन्याभरातच या पुलावरूनरस्त्यावर मोठमोठे खड्डे व आजूबाजूला तडे पडले आहे शासनाचे लाखो रुपये खर्च करून कजगाव व परिसरातील नागरिकांना या नवीन पुलावर चालणे देखील दुरापास्त झाले आहे या खड्ड्यामुळे अपघात होऊन जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही यानंतर संबंधित विभाग याची चौकशी करेल का?आणि संबंधित ठेकेदारावर कारवाई होईल का? अशी मागणी चर्चा दबक्या आवाजात नागरिकांकडून होत आहे त्याचबरोबर उद्घाटन करणाऱ्या राजकीय नेते यांनी अशा निकृष्ट दर्जाची काम करणाऱ्या ठेकेदारावर वचक बसवण्याचा व रस्त्याचे काम कसे दर्जा पूर्ण होईल याकडेही लक्ष देण्याची मागणी होत आहे.