अखेर कजगाव रेल्वे उड्डाण पुलाच्या कामाला सुरुवात

0
3

साईमत लाईव्ह प्रतीनिधी कजगाव

कजगाव ता भडगाव येथील श्री चक्रधर स्वामी रेल्वे उड्डाण पुलाचे खराब झालेल्या कामाला आता प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे.
कजगाव पारोळा रस्त्यावरील रेल्वे उड्डाण पुलावर अनेक ठिकाणी मोठमोठी खड्डे पडली होती, त्यामुळे अपघातांची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यामुळे ह्या पुलावरील खड्डे त्वरित बुजवण्यात यावेत व पुलावरील रस्ता दुरूस्त करण्यात यावा अशी मागणी जोरदार होत होती. आता प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलेले आहे. मात्र हे काम किती दिवस टिकते?नेमके काम उत्कृष्ट पद्धतीने होणार की नाही की पुन्हा अजून दोन महिन्यांनी खराब होणार? हे प्रश्न निर्माण होत आहेत त्यामुळे आता उत्कृष्ट पद्धतीने कामाला सुरुवात करावी व काम पुन्हा पुन्हा खराब होऊ नये याची काळजी घ्यावी अशी मागणी जोरदार होत आहे.

“””:रस्ता दुरुस्त आता नामकरण फलक कधी?

दरम्यान कजगाव पारोळा रस्त्यावरील उड्डाण पुलाचे नामकरण श्री चक्रधर स्वामी रेल्वे क्रॉसिंग कजगाव गोंडगाव रेल्वे उड्डाण पूल असे करण्यात आले आहे मात्र घोषणा होऊनही सदरील फलक अद्याप लावण्यात आलेला नाही त्यामुळे कजगाव सह परीसरातील ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे त्यामुळे ह्या पुलाचे नामकरण फलक लवकरच बसवण्यात यावे अशी मागणी जोरदार होत आहे.

 

प्रतिक्रिया

आता उड्डाण पुलाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. हे काम टिकाऊ व उत्तम दर्जाचे चांगल्या पद्धतीने होणार आहे तसेच उड्डाण पुलाचे श्री चक्रधर स्वामी यांच्या नावाचा फलकही लवकरच लावण्यात येईल, अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता बी एम पाटील यांनी दिली.

उड्डाण पुलावर अनेक ठिकानि मोठमोठे खड्डे पडले होते. आता मात्र ह्या पुलाचे काम लवकरच पूर्ण करून जास्त वेळ टिकेल अश्या पद्धतीने करावे तसेच कनाशी ही जिल्ह्याची शान असल्याने पुलाला दिलेले नामकरणाच्या नावाचा फलक त्वरित लावावा समाधान पवार नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य कजगाव.

महानुभाव पंथाची काशी म्हणून कनाशी ला विशेष महत्व आहे. मात्र ह्या ठिकाणी येतांना पुलावर पडलेले खड्यांमुळे मोठी अडचण निर्माण होत होती, आता काम चालू झाले आहे. तसेच पुलाचे नामकरण झाले आहे मात्र आता फलक लावायला एवढा वेळ लागण्याचे करण अजूनही समजत नाही ही मोठी शोकांतिका आहे. त्यामुळे फलक लवकरच लावण्यात यावा. सचिन पुजारी कनाशी ग्रामस्थ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here