साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी
मांजाची चक्री देण्याचा बहाण्याने एका ९ वर्षीय बालकासोबत अनैसर्गीक कृत्य करण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली. या प्रकरणी जळगावच्या शनिपेठ पोलिसात ४५ वर्षीय इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात पिडीत बालकाच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, दि.१ रोजी दुपारी साडेचार ते पाच वाजेच्या दरम्यान, शाम गोपाल वर्मा (वय ४५, रा. जळगाव) याने पिडीत बालकाच्या घरी जाऊन त्याच्या अज्ञानपणाचा फयादा घेत त्यास मांजाची चक्री देण्याचा बहाणा करुन आपल्या घरी आणून पिडीत बालकासोबत अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न करतांना मिळून आला. या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास परी. पोलीस उपनिरीक्षक प्रिया दातीर ह्या करीत आहेत.