साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी म. शासनाच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल उपशिक्षक डॉ. विलास पुरुषोत्तम नारखेडे यांचे बहिणाबाई ज्ञान विकास संस्था व विद्यालयातर्फे नुकतेच संस्था अध्यक्ष बंडूदादा काळे यांनी भावपूर्ण रूपात सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बंडूदादा काळे, बाळू दादा लोखंडे, मुख्याध्यापक टी एस चौधरी , प्रतिभा खडके, स्वाती कोल्हे, सीमा चौधरी डॉक्टर प्रतिभा राणे संतोष पाटील राजेश वाणी दिनेश चौधरी विशाल पाटील इ. सत्कार प्रसंगी उपस्थित होते. यावेळी बंडू दादा काळे अध्यक्ष यांनी डॉ. विलास नारखेडे यांच्या बद्दल गौरवोद्गार काढताना म्हटले की ,आपण गेली अनेक वर्ष शाळेत मनापासून अध्यापनाचे कार्य उत्तमरीत्या अगदी नेटाने…
Author: Saimat
साईमत लाईव्ह कजगाव प्रतिनिधी कजगाव ता भडगाव येथून जाणारा जळगाव चांदवळ ह्या राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डेच खड्डे दिसून येतात त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता हाच प्रश्न वाहनचालकाला पडतो ठिकठिकाणी अगदी मोठमोठे खड्डे महामार्गावर पडले आहेत परिणामी अनेक ठिकाणी ह्या रस्त्यावर अपघाताचे प्रमान वाढत चालले आहे. तर कजगावहुन चाळीसगाव जातांना अनेक ठिकाणी रस्त्यावरील खड्यांमुळे वाहने चालवणे जिकरीचे झाले आहे ह्याच रस्त्यावर कजगाव येथून जवळच असलेल्या हिंगोने ता चाळीसगाव येथील भूमिपुत्र असलेले चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांचे हिंगोने हे गाव आहे ह्या त्यांच्या गावाजवळच्या रस्त्याची झालेली दुरावस्था अत्यंत वाईट आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुचर्चित मोजक्या लोकप्रतिनिधींमध्ये गणना होणारे…
साईमत लाईव्ह सोयगाव प्रतिनिधी सोयगाव येथील कृषीमंत्री ना.अब्दुल सत्तार यांच्या संपर्क कार्यालयात स्त्री शिक्षणाच्या पाया रचणाऱ्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, शिक्षणप्रसारक, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी तालुकाप्रमुख प्रभाकरराव काळे (आबा) यांच्या हस्ते ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नगरसेवक हर्षल काळे, गजानन कुडके, भगवान जोहरे,लतीफ शहा, राजू दुतोंडे, दिलीप देसाई, रमेश गव्हांडे, मोतीराम पंडीत, योगेश नागपुरे, संतोष आळेकर, योगेश वामणे, शेख बबलू, अमोल हिरे, दानिश शहा,प्रमोद परदेशी, उदय रावळकर, सलमान सिकंदर आदी शिवसैनिकांची उपस्थिती होती.
साईमत लाईव्ह पाचोरा प्रतिनिधी गृहकर्जाची फाइल मंजूर करुन देतो, अशी खोटे आश्वासन देत कासोदा येथील एकाने पाचोऱ्यातील महिलेची ७६ हजार रुपयांत आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचोरा शहरातील गिरड रोडवरील भवानी नगर भागातील रहिवासी रेखा संजय पाटील (वय४२) या महिला किराणा दुकान चालवून आपल्यासह परिवाराचा उदरनिर्वाह चालवतात. रेखा पाटील यांनी नवीन घर बांधण्यासाठी गृहकर्ज काढण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील धान्य मार्केट समोर राहणाऱ्या कुणाल सुनील चौधरी याने रेखा पाटील यांची गृह कर्जाची फाइल मंजुर करुन देतो, असे सांगून त्यांच्याकडून १८ मे २०२२ ते २५ मे २०२२ या कालावधीत…
साईमत लाईव्ह सोयगाव प्रतिनिधी सोयगाव-चाळीसगाव राज्यमार्गावरील नळकांडी पूल थेट जमिनीत पुरल्या गेल्याचा प्रकार रविवारी वाहनधारकांच्या लक्षात आला आहे त्यामुळे रविवारी या रस्त्यावरील वाहतूक मंदावली होती..नलकांडी पुलाच्या नळकांड्याही जमिनीत पुरल्या गेल्या आहे त्यामुळे आगामी पावसाळ्यात नलकांडी पुलाच्या बाजूने असलेल्या शेती शिवाराला धोका निर्माण झालेला आहे. सोयगाव-चाळीसगाव रस्त्यावर घोसला गावाजवळ खटका लीच्या नाल्यावर जिल्हा परिषदेच्या नलकांडी पूल उभारण्यात आलेला आहे या पुलाची तीन वर्षांपासून जमिनीपासून तीन फूट होती,परंतु हा तीन फूट उंचीचा पूल मात्र अचानक जमिनीत पुरकय9 गेल्याचा प्रकार उघसडकीस आला असून या पुलाच्या नलकांड्या ही जमिनीत गाडल्या गेल्या आहे आधीच या पुलाच्या नलकांड्या मध्ये दोन वर्षांपासून घाण अडकल्याने या पुलाच्या नाल्याच्या…
साईमत लाईव्ह पारोळा प्रतिनिधी तालुक्यातील मोढाळे गावाजवळ भरधाव ट्रकने बसला धडक दिल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. या संदर्भात खुशाल अशोक सूर्यवंशी (वय २९, नौ. चालक) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार ते आपले सहकारी वाहक मनीष पंडित भोई यांच्यासोबत दि 01 जानेवारी 2022 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास बस क्र. (एमएच 20 बीएन 3214) ने मालेगाव ते शेगाव जात होते. सांयकाळी 4.30 वाजेच्या सुमारास मोढाळे गावाजवळ सेफ एक्सप्रेस कंपनीचा ऑफिस जवळ हायवे रोड वरती समोरुन येणारी ट्रक क्र (डब्ल्यूबी 23, ई 9951) वरील चालक नाव-गाव माहीत नाही. हा जोरात वाहन चालवून व रस्त्याचा परीस्थीतीकडे दुर्लक्ष करुन बसला समोरुन डायवर साईटला…
साईमत लाईव्ह प्रतीनिधी कजगाव कजगाव ता भडगाव येथील श्री चक्रधर स्वामी रेल्वे उड्डाण पुलाचे खराब झालेल्या कामाला आता प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. कजगाव पारोळा रस्त्यावरील रेल्वे उड्डाण पुलावर अनेक ठिकाणी मोठमोठी खड्डे पडली होती, त्यामुळे अपघातांची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यामुळे ह्या पुलावरील खड्डे त्वरित बुजवण्यात यावेत व पुलावरील रस्ता दुरूस्त करण्यात यावा अशी मागणी जोरदार होत होती. आता प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलेले आहे. मात्र हे काम किती दिवस टिकते?नेमके काम उत्कृष्ट पद्धतीने होणार की नाही की पुन्हा अजून दोन महिन्यांनी खराब होणार? हे प्रश्न निर्माण होत आहेत त्यामुळे आता उत्कृष्ट पद्धतीने कामाला सुरुवात करावी…
साईमत लाईव्ह कजगाव प्रतिनिधी कजगाव ता भडगाव येथील सावता माळी चौक परिसरात अज्ञात वन्य प्राण्यांच्या प्रवेशाने चांगलीच धडकी भरली आहे. हा प्राणी कोणी उद मांजर तर कोणी रान मांजर तर कोणी भलतंच काही सांगत आहे, अशी वेगवेगळी चर्चा होतांना दिसत आहे. मात्र नेमका हा प्राणी कोणता यावर अजूनही स्पष्ट झाले नाही, हा प्राणी रात्री अपरात्री जास्त प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे नागरीकांनी भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे वनविभागाने ह्या गंभीर बाबीची त्वरित दखल घेऊन ह्या विषयी असलेली ग्रामस्थांच्या मनातील भीती दूर करावी व ह्या अज्ञात प्राण्यांचा शोध घेऊन त्याला त्वरीत पकडावे अशी मागणी जोरदार होत आहे ह्याबाबतीत वनविभागाशी संपर्क साधला…
साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी मांजाची चक्री देण्याचा बहाण्याने एका ९ वर्षीय बालकासोबत अनैसर्गीक कृत्य करण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली. या प्रकरणी जळगावच्या शनिपेठ पोलिसात ४५ वर्षीय इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात पिडीत बालकाच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, दि.१ रोजी दुपारी साडेचार ते पाच वाजेच्या दरम्यान, शाम गोपाल वर्मा (वय ४५, रा. जळगाव) याने पिडीत बालकाच्या घरी जाऊन त्याच्या अज्ञानपणाचा फयादा घेत त्यास मांजाची चक्री देण्याचा बहाणा करुन आपल्या घरी आणून पिडीत बालकासोबत अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न करतांना मिळून आला. या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला अटक…
साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी यावल येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेच्या वतीने मयत खातेदारांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपयाचा धनादेश देण्यात आला. यावल येथील रहिवासी कैलासवासी यतीन जनार्दन फालक व किशोर प्रकाश माळी परिवारावर तरुण मुलगा गमावण्याची वेळ आली त्यांच्या आई-वडील पत्नी व मुले निराधार झाले फालक व माळी यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या LIC 436 रुपयाचा विमा काढला होता. त्यामुळे मयतांच्या वारसास दोन लाख रुपये मिळावे म्हणून महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा यावल यांच्यावतीने आतापर्यंत 14 मयत व्यक्तीच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपयाचा धनादेश देण्यात आला. महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे चेअरमन श्री मिलिंद धारड व क्षत्रिय व्यवस्थापक एस जे पाटील व शाखा व्यवस्थापक…