साईमत लाईव्ह पुणे प्रतिनिधी कसब्याच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासने यांना पराभवाची धूळ चारली आहे. २८ वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेल्या गडाला धंगेकरांनी सुरुंग लावला आहे. पहिल्या फेरीपासून अगदी शेवटच्या २१ व्या फेरीपर्यंत रवींद्र धंगेकर यांनी आघाडी कायम ठेवली. या विजयानंतर धंगेकरांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. कसबा हा भाजपचा बालेकिल्ला नव्हता. सगळ्या पक्षामुळे भाजप निवडून येत होता. ही निवडणूक जनतेने हातात घेतली होती. त्यांच्यामुळेच हा विजय मिळाला आहे. कसबा भाजपचा गड नाही तर हा गड जनतेचा आहे, अशी प्रतिक्रिया धंगेकरांनी दिली. या विजयाचं श्रेय मी कोणत्या नेत्याला नाही तर फक्त मायबाप जनतेला देतो. या जनतेनंच मला निवडून आणलं…
Author: Saimat
साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी यावल न.पा.कॉम्प्लेक्स मध्ये ताडी विक्री दुकानाचा परवाना जो दिला ‘तो’ ताडी विक्री दुकानाचा परवाना राज्य उत्पादन शुल्क विभागाने ताडीच्या नशेत दिला आहे की संबंधिताने राज्य उत्पादन शुल्क विभाग यावल ( भुसावळ ) व जळगाव यांची फसवणूक आणि आर्थिक संगनमत करून ‘ताडी’ दुकानाचा परवाना मिळविला आहे का ? असा कायदेशीर प्रश्न उपस्थित झाला असल्याने संपूर्ण यावल शहरात चर्चेला उधाण आले आहे. श्रीधर के.सुर्वे जन्म माहिती अधिकारी तथा कार्यालय अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क जळगाव यांच्याकडील दि.16 नोव्हेंबर 2022 रोजी मिळालेले पत्र व त्यासोबतची मिळालेली माहिती प्रत्यक्ष बघितली असता यावल येथील मेरगु नारायण गौंड रा.करीमनगर,नमापूर. (आंध्र…
साईमत लाईव्ह सोयगाव प्रतिनिधी वसंत ऋतूची चाहूल लागताच डोंगर ,वन तसेच सोयगाव-बनोटी रस्तावरील बहरलेले पळसाची झाडे सर्वांची लक्ष वेधून घेतात ,सोयगाव तालुक्यातील जरंडी परिसरात तर बहुगुणी दुर्मिळ पिवळा पळस बहरला आहे ,हा पिवळा पळस अत्यंत दुर्मिळ असून औषधीसाठी या पिवळ्या फुलांचा उपयोग होत असल्याने या पळसाला विशेष महत्व आहे वसंत ऋतूत फुललेले हे पळसाचे झाड सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. लाल केसरी पळस फुले जंगलात सर्वसाधारणपणे सर्वत्र आढळतात मात्र पिवळा पळस हा अत्यंत दुर्मिळ समजला जातो औषधीसाठी ही या फुलांचा उपयोग आहे असे तज्ञ सांगतात पिवळ्या अळसाबद्दल काही अंधश्रद्धा देखील प्रचलित आहेत गुप्तधन शोधण्यासाठी या फुलांचा उपयोग केला जातो त्यामुळे…
साईमत लाईव्ह ओझर प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी नाशिक जिल्ह्यातील कांदा भावात झालेल्या मोठ्या घसरणीवर राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी निफाड तालुक्याचे आमदार दिलीप बनकर यांनी गळ्यात कांदा माळ घालून व डोक्यावर कांदा भरलेली टोपली घेत विधानभवनाच्या पायऱ्यांवर निषेधार्थ आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध केला. याबाबत सविस्तर वृत्त असे की नाशिक जिल्हात मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादन घेतले जाते नगदी पीक म्हणून शेतकरी कांदा पिकाकडे बघतो एकरी ५० ते ६० हजार रुपये खर्च करून शेतकरी .वर्षभराचे आर्थिक नियोजन करतात मात्र सद्या कांद्याला २ ते ५ रुपये असा कवडीमोल भाव मिळत असून उत्पादनासाठी केलेला खर्चही वसूल होत नसल्याने कांदा…
साईमत लाईव्ह चोपडा प्रतिनिधी येथील आम आदमी पार्टीच्या वतीने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या अटकेच्या निषेधार्थ तहसिलदार अनिल गावित यांना निवेदन देण्यात आले आहे. मनिष सिसोदिया यांची अटक म्हणजे भाजपने सूडबुद्धीने केलेली कारवाई असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. सर्वसामान्य जनतेसाठी काम करणाऱ्या लोकांवर सरकार कारवाई करत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. तर अशीच गळचेपी सुरू राहणार असली तर देशभर इंकलाब करण्याचा इशारा देखील आम आदमी पार्टीच्या वतीने देण्यात आला आहे. सीबीआयने मनीष सिसोदिया यांच्यावर कारवाई करत त्यांना मद्य घोटाळ्याप्रकरणी अटक केली आहे. त्या आधी तब्बल आठ तास मनीष सिसोदिया यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर ही…
साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी :- गृह विभागातर्फे राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये अनेक दिवसांपासून बदलीच्या प्रतिक्षेत असलेल्या 8 आयपीएस अधिकाऱ्यांना अखेर पोस्टिंग मिळाली आहे. त्यामध्ये आयपीएस बिपिन कुमार सिंह यांची आर्थिक गुन्हे शाखेच्या अपर पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर आयपीएस प्रभात कुमार यांना होमगार्डची जबाबदारी देण्यात आली आहे. इतर अधिकाऱ्यांना साईड पोस्टिंग देण्यात आल्या आहेत. राज्यातील एकूण 11 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृह मंत्रालयाने जारी केले आहेत. कोणत्या अधिकाऱ्याची कुठे झाली बदली : – आयपीएस बिपिन कुमार सिंह यांची मुंबई येथे आर्थिक गुन्हे शाखेच्या अपर पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच आयपीएस प्रभात…
साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी जळगाव येथील इकरा शिक्षणशास्त्र महाविद्यालयात आज दि. 28 फेब्रुवारी 2023 रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पोस्टरचे प्रदर्शन ठेवण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे श्री. मुख्तार सय्यद यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयेशा सिद्दिका या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनीने केले. तीलावत तनवीर रजा या विद्यार्थ्याने सादर केली आणि तराना-ए- इकरा प्रा. डॉ. ईश्वर सोनगरे सरांनी सादर केले. विद्यार्थ्यांमधून मनोगतामध्ये प्रथम वर्षाच्या चंचल कार्पेंटर, सना कौसर, सुमय्या कुरेशी, द्वितीय वर्षातून माज अहमद आणि मुजक्किर शेख या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यानंतर प्रा. अजीम शेख सर यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान दिनाविषयी…
साईमत लाईव्ह ओझर प्रतिनिधी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने मातोश्री शेत/पाणंद रस्ते ही योजना तयार करण्यात आलेली आहे परंतु ही योजना प्रत्यक्षात काही अटी अडसर ठरत आहे या जाचक अटी मुळे सदर योजनेचा फायदा शेतकऱ्यांना होत नसल्याने या योजनेत येणाऱ्या जाचक अटी रद्द कराव्या अशी मागणी निफाड तालुक्यातील दिक्षी ग्रामपंचायतीचे विध्यमान सरपंच डॉ योगेश्वर चौधरी यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे ई-मेल द्वारे निवेदन पाठवत केली. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ग्रामीण भागात अनेक शेतकरी हे शेतात वास्तव्यत आहे तसेच आपला शेतीमाल मुख्य रस्त्यावर आणण्यासाठी आपल्या शिवारातील रस्ताचा वापर करावा लागतो…
साईमत लाईव्ह ओझर प्रतिनिधी निफाड तालुक्यातील शिधा वाटप करणारे दुकानदार आधारला शिधापत्रिका लिंक करण्यासाठी जादा पैसेची मागणी करत असल्याची माहिती प्रहार संघटनेच्या पदाधिका-यांच्या लक्षात आल्याने प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्वरित तहसीलदार घोरपडे यांच्याकडे सदर प्रकरणाची चौकशी करणायची मागणी केली व निफाड तालुक्यातील सर्व राशन दुकानात आधारला शिधापत्रिका विनामूल्य करण्याचा मोठा बोर्ड लावण्यात यावा जर रेशन दुकानदार पैसेची मागणी करतांना आढळल्यास सदर रास्तभाव दुकान परवाना रद्द करण्याचे आदेश देण्यात यावे असे निवेदनात म्हंटले आहेत. त्यावेळस तहसील अधिकारी टर्ले व कापसे यांनी आश्वासन दिले की आपल्या निवेदनावर योग्य कार्यवाही कारण्यात येईल. त्यावेळेस प्रहार दिव्यांग संघटना तालुकाध्यक्ष सोमनाथ धुमाळ, प्रहार युवा आघाडी तालुकाध्यक्ष जयेश…
साईमत लाईव्ह कजगाव प्रतिनिधी कजगाव ता भडगाव येथील दोन दाम्पत्य पतिपत्नी असे चौघे जण मुस्लिम धर्मात सर्वात पवित्र समजली जाणारी उमरा ( हज ) यात्रेसाठी रवाना झाले आहेत कजगाव येथील उद्योजक शौकत रशीद पिंजारी व त्यांच्या पत्नी मुमताज शौकत पिंजारी व सध्या मुंबई येथे स्थायिक असलेले त्यांचे भाऊ युसुफ रशीद पिंजारी व त्यांच्या पत्नी शायर युसुफ पिंजारी हे चौघे जण २८ रोजी मुंबई येथून विमानाने सौदी अरेबिया ह्या देशात सदरील यात्रेसाठी रवाना झाले,एकूण वीस दिवसाच्या यात्रेसाठी हे दाम्पत्य हज यात्रेत सहभागी होणार आहे त्यांना त्यांची यात्रा सुखर होण्यासाठी नातेवाईक मित्र परीवार व ग्रामस्थांची शुभेच्छा दिल्या आहेत.