संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला द्या अन्यथा करणार सामुहिक आत्महत्या…! प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा अल्टीमेटम

0
3
साईमत लाईव्ह चोपडा प्रतिनिधी
तालुक्यातील गुळ मध्यम प्रकल्पग्रस्त शेतकरी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला मिळविण्यासाठी गेल्या १६ वर्षापासून प्रदीर्घ लढा देत आहे. संबंधित विभागाने निव्वळ आश्वासने देऊन एवढे दिवस प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना ताटकळत ठेवले. गेल्या 23 मार्च रोजी शेतकरी संघटनेने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसोबत तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले होते.
त्यावेळी कार्यकारी संचालक मंडळे यांनी आश्वासन दिले की मी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मार्च महिना अखेरीस निधी उपलब्ध राहिला तर पैसे देईन त्याचा पाठपुरावा म्हणून परत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन शेतकरी संघटनेचे पदाधिकारी तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यालयात गेले असता संबंधित अधिकाऱ्यांनी जमलेली कार्यालयातील गर्दी बघून तातडीची मीटिंग लावून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून येत्या पंधरा दिवसात पैसे वर्ग करतो असा निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी तात्पुरतं आजच्या आंदोलन स्थगित केले मात्र येत्या दहा मे पर्यंत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना पैसे वर्ग न झाल्यास आधी दिलेल्या निवेदनाप्रमाणे कार्यालयाच्या आहारातील वृक्षांवर गळ्याला फास लावून सामूहिकरित्या आत्महत्या करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
तापी पाटबंधारे विभागाने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर रक्कम द्यावी ही मागणी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. यावेळी शेतकरी संघटनेचे संदीप पाटील, सचिन शिंपी, किरण गुजर, सय्यद देशमुख, कमलेश शिंपी, विनोद धनगर, सुरेश पाटील, राहुल धनगर, प्रदीप देसले, अजित पाटील, सचिन धनगर, विजय भालेराव व दीपेश पाटील आदी शेतकरी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here