साईमत लाईव्ह चोपडा प्रतिनिधी येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यासिका केंद्र, करिअर कट्टा व द युनिक अकॅडमी, पुणे शाखा जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पदवी काळात एमपीएससी व यूपीएससी परीक्षेची तयारी कशी करावी ?’ या विषयावर आधारित कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य एन. एस. कोल्हे हे उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते द युनिक अॕकेडमी पुणे, जळगाव शाखेचे प्रमुख विकास गिरासे व अतिथी नरेंद्र पाटील आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. उदघाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक कार्यशाळेचे समन्वयक डॉ. आर. आर. पाटील यांनी…
Author: Saimat
साईमत लाईव्ह चोपडा प्रतिनिधी तालुक्यातील गुळ मध्यम प्रकल्पग्रस्त शेतकरी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला मिळविण्यासाठी गेल्या १६ वर्षापासून प्रदीर्घ लढा देत आहे. संबंधित विभागाने निव्वळ आश्वासने देऊन एवढे दिवस प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना ताटकळत ठेवले. गेल्या 23 मार्च रोजी शेतकरी संघटनेने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसोबत तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले होते. त्यावेळी कार्यकारी संचालक मंडळे यांनी आश्वासन दिले की मी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मार्च महिना अखेरीस निधी उपलब्ध राहिला तर पैसे देईन त्याचा पाठपुरावा म्हणून परत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन शेतकरी संघटनेचे पदाधिकारी तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यालयात गेले असता संबंधित अधिकाऱ्यांनी जमलेली कार्यालयातील गर्दी बघून तातडीची मीटिंग लावून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून येत्या…
साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील वडली येथे एकाच कुटुंबातील तीन जणांनी विषारी औषध घेतल्याची धक्कादायक घटना गुरूवारी ६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता घडली आहे. यातील बापाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून मुलगा आणि आईची प्रकृती गंभीर आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील वडली गावात नारायण दंगल पाटील (वय-६६) हे आपल्या पत्नी भारती नारायण पाटील ( वय – ५५ ) आणि मुलगा गणेश नारायण पाटील (वय-३३) याच्यासोबत वस्तव्याला होते. गेल्या काही दिवसांपासून पाटील कुटुंबिय तणावात होते. गुरूवारी ६ एप्रिल रोजी सकाळी ७ ते ८ वाजेच्या दरम्यान नारायण पाटील, त्यांची पत्नी भारती…
साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी जळगाव येथील शुभ आरंभ फाऊंडेशनतर्फे रामनवमी निमित्ताने बस स्थानकाजवळील संत गाडगेबाबा शहरी बेघर निवारा केंद्रात आश्रयाला असलेल्या गरजूंना मिष्टान्न भोजन दिले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते पियुष कोल्हे, विश्वनाथ चतुर, पत्रकार धन्यकुमार जैन, महावीर सैतवाल, महेश चौधरी यांचेहस्ते मिष्टान्न भोजन वाढण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शुभ आरंभ फाऊंडेशनचे संस्थापक चंदन जैन, अध्यक्ष विक्रांत पाटील, दर्शन काळे, शशिकांत गोरे, पवन जैन, योगेश काळे, पराग अत्तरदे, निखिल चौधरी आदींनी परिश्रम घेतले.
साईमत लाईव्ह उमरगा प्रतिनिधी उमरगा पोलीस स्टेशनचे निष्क्रिय पोलीस निरीक्षक एम.ए.राठोड यांच्या कार्यकाळात कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. गेल्या आकरा महिन्यात उमरगा पोलीस ठाण्याच्या हद्दीत साधारणपणे एका वर्षाच्या कालावधीत सहा खून, तर तितकेच खुनाचे प्रयत्न झाले आहेत तर हाणामाऱ्या, चोऱ्या, मोबाईल चोरी, दुचाकी चोरी, जेष्ठ नागरिकांना फसवून सोने लूट करणे अशा घटनात वाढ झाल्याने लोकामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. उमरगा शहर व आसपासच्या भागातील सर्व जाती – धर्मातील लोकांनी सामाजिक सलोखा जपत उमरगेकरांनी संपूर्ण राज्याला शांतताप्रिय तालुका असल्याचे संदेश दिला आहे. कांही अपवाद वगळता जातीय सलोखा अखंड असतो. मात्र गेल्या वर्षभरात वाढत चाललेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीला लगाम घालण्याचे आव्हान पोलिस…
साईमत लाईव्ह जामनेर प्रतिनिधी जामनेर तालुक्यातील पहुर ते शेंदुर्णी दरम्यान आज सकाळी सात वाजेच्या सुमारास शेंदुर्णी येथील सरस्वती विद्या मंदिरची स्कूल बस उलटली या अपघातात विद्यार्थ्यासह शिक्षक जखमी झाल्याची घटना घडली, पहूर येथील विद्यार्थी सरस्वती विद्या मंदिर शाळेत नेहमीप्रमाणे आज सकाळी सात वाजेच्या सुमारास शाळेची स्कूल बस क्रमांक दोन ही विद्यार्थ्यांना घेऊन शेंदुर्णीतील शाळेत घेऊन जात असताना पहुर शेंदुर्णी दरम्यान घोडेश्वर बाबा दर्ग्याजवळ वळण घेत असताना स्कूल बसला अपघात झाला, या अपघातात शाळेच्या विद्यार्थ्यांसह दोन शिक्षक जखमी झाल्याची घटना घडली आहे. बस मध्ये सुमारे 40 विद्यार्थी आणि काही शिक्षक होते यातील 30 विद्यार्थ्यांना व दोन शिक्षक जखमी झाल्याची घटना घडली…
साईमत लाईव्ह ओझर प्रतिनिधी नाशिक एज्युकेशन सोसायटी नाशिक शहरातील एक ध्येयवादी,सामाजिक बांधिलकी सांभाळणारी व उज्वल भविष्याच्या दिशेने वाटचाल करणारी नामवंत शिक्षण संस्था आहे. ‘विद्या यश सुखकरी अर्थात विद्या यशोदायी असते,सुखदायी होते’ हे आपले ब्रीदवाक्य सतत विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवून प्रत्यक्षात आणणारी आदर्शवत शिक्षण संस्था आहे. वर्धापन दिनाचे निमित्ताने संस्थेचा आढावा…. कुठल्याही संस्थेच्या वाटचालीत शंभर वर्ष हा एक ऐतिहासिक टप्पा असतो. गेल्या शंभर वर्षाचा संस्थेचा प्रवास हा सृजन आणि देशभक्त नागरिकांनी एकत्रितपणे निरलस वृत्तीने केलेल्या सेवा कार्याचा आहे. आद्य संस्थापकांनी ज्या मूल्यांना डोळ्यासमोर ठेवून संस्था सुरू केली, त्याच मार्गावरून गेली शंभर वर्ष संस्थेची वाटचाल सुरू आहे. ज्ञान हेच सर्वोच्च…
साईमत लाईव्ह बुलढाणा प्रतिनिधी नांदुरा अर्बन बँक सद्यस्थितीत या ना त्या कारणाने चर्चेत असून आज बँकेत पार पडलेल्या कर्ज वाटप समिती व कर्मचारी समितीच्या बैठकीत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निलंबनाचा विषय येताच स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी प्रोसेडींग घेऊन पळत निघाल्याने सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. या बाबत वृत्त असे की २९ मार्च रोजी बँकेच्या मुख्यालयात कर्ज वाटप समिती व कर्मचारी समितीची बैठक बँकेचे अध्यक्ष अरुण पांडव यांच्या अध्यक्षते खाली सुरु होती. या बैठकी दरम्यान बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्रप्रसाद रामकेवल पांडे यांचे सर्वानुमते निलंबन करण्याचे आदेश काढण्याचा विषय येताच त्यांनी सदर कर्मचारी समितीचे प्रोसेडींग सभा चालू असतांना सदस्यांच्या सह्या…
साईमत लाईव्ह नाशिक प्रतिनिधी शहरासह जिल्ह्यात लाचखोरी थांबण्याचा नाव घेत नसून, काल तब्बल वीस लाख रुपयांची लाच घेताना तालुका सहायक निबंधकासह वरिष्ठ लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी रंगेहाथ पकडले. गेल्या काही वर्षांतील सर्वांत मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे. सिन्नर येथील खासगी सावकारावर सावकारी कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल न करण्याचा मोबदल्यात तब्बल २० लाखांची लाच स्वीकारताना निबंधक कार्यालयातील सहाय्यक तालुका निबंधक रणजित महादेव पाटील आणि वरिष्ठ लिपिक प्रदीप अर्जुन वीरनारायण यांना रंगेहात अटक करण्यात आली आहे. पाटील हे निफाड येथे सहाय्यक तालुका निबंध म्हणून पदभार सांभाळत आहे अजून सिन्नरचाही पदभार त्यांच्याकडे आहे. यापूर्वी सिन्नर येथील तालुका निबंधकही जाळ्यात सापडल्याची चर्चा…
साईमत लाईव्ह जामनेर प्रतिनिधी पहूर पेठ येथील वाघुर नदी तीरावर सार्वजनिक स्मशानभूमीलगत होत असलेले अतिक्रमण काढण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेले घंटानाद आंदोलन आज बुधवारी मागे घेण्यात आले . याबाबत सविस्तर वृत्त असे की , वाघुर नदीच्या तीरावर पहुर पेठ ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत सार्वजनिक स्मशानभूमी असून या स्मशानभूमीलगत शेजारील शेतकऱ्याकडून अतिक्रमण होत असल्यामुळे सदर अतिक्रमण काढण्यात यावे , या मागणीसाठी वाघूर विकास आघाडी आणि शिवसेना शाखा यांच्या वतीने गेल्या तीन दिवसांपासून ग्रामपंचायत कार्यालया शेजारी घंटानाद आंदोलन सुरू करण्यात आले होते . काल महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्मशानभूमीची पाहणी करून आंदोलकांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याचे पत्र दिले…