Author: Saimat

साईमत जळगाव प्रतिनिधी बोगस चिनी लोन अॅप डाउनलोड करण्यास सांगून त्याद्वारे फिर्यादीची संशयित आरोपींनी सर्व माहिती काढून घेतली. त्यानंतर त्यांच्या विविध नातेवाईकांना अश्लील संदेश पाठविले. तसेच, १० लाखाच्यावर फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलीस स्टेशन, जळगावच्या अधिकाऱ्यांनी यशस्वी तपास लावला. थेट कर्नाटकातून भारतातील मास्टरमाईंड असणारे दोन संशयित गुन्हेगारांना पकडून आणले. तसेच, त्यांच्याकडून रक्कम जमा करून पोलीस उपअधिक्षक संदिप गावित यांचे हस्ते फिर्यादी यांना २ लाख रुपये परत देण्यात आले आहे. सदर गुन्हयातील फिर्यादी हे पहुर, ता. जामनेर येथील रहिवाशी असुन त्यांनी दि.०९ जुलै ते दि. २१ सप्टेंबर २०२२ चे दरम्यान विविध नावाचे ऑनलाईन लोन देणारे ३५ मोबाईल लोन अॅप्लिकेशन फिर्यादी यांना मोबाईल…

Read More

साईमत चोपडा प्रतिनिधी आदिवासी कोळी समाजाच्या वतीने अमळनेर प्रांताधिकारी कार्यालयांवर सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ बाविस्कर यांनी पुकारलेल्या अन्नत्याग सत्याग्रहाचा लढा यशस्वी झाला असून आंदोलनाच्या पाचव्या दिवशी प्रभारी प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने प्रलंबित अनुसूचित जमातीचे ६० जात प्रमाणपत्र देण्यात आले. कोळी समाजाला न्याय दिल्याने सत्याग्रही समाज बांधवांना लिंबू सरबत देवून उपोषणाची सांगता करण्यात आली. या आंदोलनामुळे आता अमळनेर व चोपडा तालुक्यातील शेकडो कोळी समाजबांधवांना टोकरे कोळीचे (एस.टी.) दाखले मिळणार आहेत. दि. ८ मे पासून अमळनेर येथील प्रांत कार्यालयासमोर आदिवासी टोकरे कोळीचे जातप्रमाणपत्र सुलभ पद्धतीने मिळावे यासाठी चोपडा महर्षी वाल्मिकी समाज मंडळाचे तालुका संपर्कप्रमुख जगन्नाथ बाविस्कर गोरगावलेकर यांनी समाजबांधवांसह अन्नत्याग सत्याग्रह…

Read More

साईमत चोपडा प्रतिनिधी येथील शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने रात्री ८.३० व १०.३० वाजेची चोपडा ते धरणगावमार्गे जळगाव जाणारी बससेवा पुर्णवत सुरु करण्याची मागणीचे निवेदन आगारप्रमुख महेंद्र पाटील यांना देण्यात आले. यावेळी भाजपा शहराध्यक्ष गजेंद्र जैसवाल व सर्व सहकारी यांनी आगारप्रमुख यांच्या लक्षात आणून दिले की सदर बससेवा बंद झाल्यामुळे प्रवाशांना रात्रभर बसस्थानकावर मुक्काम करावा लागतो, अशाप्रकारे तालुकावासियांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. या त्रासापासून प्रवाशांची सुटका व्हावी म्हणून लवकरात लवकर बससेवा पुर्णवत सुरू करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावर आगारप्रमुख महेंद्र पाटील यांनी येत्या दोन ते तीन दिवसात बससेवा सुरू होईल असे सांगितले. सदर निवेदन देतेवेळी भाजपा शहराध्यक्ष…

Read More

साईमत मलकापूर प्रतिनिधी येथील मौजे वाकोडी ता. मलकापुर जि. बुलडाणा येथील विद्या विकास महाविद्यालय असुन सदर संस्थेचे संचालक प्रा. हितेश पाटील व मुख्याध्यापक दिलीप अढाव यांच्या संगनमताने विद्यार्थ्यांची पास होण्यासाठी 10 ते12 हजार रुपये घेऊन विद्यार्थ्यांची मोठया प्रमाणात फसवणूक करीत आहे अशी तक्रार अँटी करप्शन ब्युरो बुलढाणा यांच्याकडे संदीप भगत यांनी केली आहे . सदर तक्रारी मध्ये पुढे नमूद करण्यात आले आहे की प्रत्येक वर्षी महाविद्यालयामध्ये १२ वी कला व विज्ञान शाखेची परिक्षा होत असते या मध्ये विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी त्यांचेच महाविद्यालय सेंटर मिळते. याचा फायदा घेत प्राध्यापक हितेश पाटील व अढाव सर हे संगनमताने विज्ञान शाखेच्या बिद्यार्थ्यांकडुन जास्त टक्केवारीचे आमिष…

Read More

साईमत अमळनेर प्रतिनिधी अमरावती येथे विवाह सोहळा आटोपून परतलेल्या अमळनेर येथील विवाहितेचा उष्माघाताने मृत्यू झाला. रूपाली गजेंद्रसिंग राजपूत (33) असे मृत विवाहितेचे नाव आहे. याबाबत अमळनेर येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. सध्या जिल्ह्याचा पारा ४४.९ अंश या उच्चांकी पातळीवर आहे. यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. अमळनेर येथील विवाहितेला उष्माघातामुळे आपला जीव गमवावा लागला. रूपाली राजपूत या गुरुवारी अमरावती येथे सोहळ्यासाठी गेल्या होत्या. तेथून त्या सायंकाळी परतल्या. आल्यानंतर रूपाली यांना मळमळ, उलट्या व चक्कर आली. त्यामुळे पती गजेंद्रसिंग ऊर्फ अतुल पाटील यांनी त्यांना तांबेपुरा येथील खासगी डॉक्टरांकडे नेते. डॉक्टरांनी उष्माघात असल्याचे सांगत प्राथमिक औषधोपचार केले. मात्र, सकाळी उठल्यानंतर…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी ‘‘नकुशी’’ म्हणजे पद्मश्री स्व.सिंधुताई सपकाळ… माईंच्या जीवनाची सुरुवात जरी नकुशीने झाली असली तरी त्यांनी एका अग्नीदिव्याप्रमाणे संघर्ष केला. केवळ स्वत:चंच नव्हे तर हजारो अनाथांच्या ‘जीवनाचं सोनं’ केलं. अशा या अनाथांच्या माईंना विगत दि. 4 जानेवारी 2022 रोजी परमेश्वराने त्यांच्याजवळ स्थान दिले. असे असले तरी त्यांच्या कार्याचा ठसा ममताताई सपकाळ व सहकारी अविरत पुढे नेत आहेत. ममताताई सपकाळ म्हणजे सिंधुताई सपकाळांची लेक होय. सिंधुताईंनी जेव्हा हजारो अनाथांच्या आयुष्यामध्ये सौख्याचे रंग भरण्यासाठी आपले आयुष्य वेचायचे ठरविले, तेव्हा त्यांच्या पोटच्या गोळ्याचा म्हणजेच ममताताईचं काय करायचं? हा त्यांच्यापुढील यक्षप्रश्न होता. तेव्हा केवळ ममताताईंच्या समजुतदारपणामुळे व आसामान्य त्यागशील स्वभावामुळे त्या हजारो अनाथांच्या…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी जळगाव येथील रहिवासी तथा शाह बिरादरीचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. अमानुल्ला शाह यांनी आपल्या  नातवाचे लग्न अत्यंत साध्या पद्धतीने उपस्थित पाहुण्यांना सरबत पाजून लावत एक आदर्श निर्माण केला आहे. शहरातील सालार नगर येथील बिस्मिल्ला मशीद मध्ये हा आदर्श विवाह संपन्न झाला. यावेळी मुस्लिम समाजातर्फे मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांनी नवरदेव मोहम्मद सालीफ, नवरदेवाचे वडील डॉ. एजाजोद्दीन, नवरी अनम शाह, नवरीचे वडील  अँग्लो उर्दू ज्युनिअर कॉलेजचे प्रो. अशपाक उस्मान यांचे अभिनंदन केले. शाह बिरादरीचे डॉ. अमानउल्लाह शाह यांनी जळगाव जिल्ह्यात मुस्लिम समाजाची अँग्लो उर्दू हायस्कूल ही एकमेव हायस्कूल असताना त्यांनी मुस्लिम विद्यार्थिनींसाठी १९७९ साली अंजुमन खिदमत ए…

Read More

साईमत सोयगाव प्रतिनिधी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामजीनगर येथे रयतेचे राजे छञपती राजर्षी शाहू महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी छञपती शाहू महारांजांच्या प्रतिमेचे समाजसेवक सुनिल काळे,शालेय व्यवस्थापन समिती सदस्य योगेश बोखारे,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष एकनाथ इंगळे याच्या हस्ते पुजन करण्यात आले. त्या नंतर शासन निर्णया नुसार शाळेतील विद्यार्थ्यांना सोयगांंव शहाराच्या प्रथम नागरीक नगराध्यक्षा आशाबी तडवी,सुनिल काळे,योगेश बोखारे तसेच शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा मनिषा जेठे,सदस्या सुनिता जोहरे,मुख्याध्यापक किरणकुमार पाटील यांच्या हस्ते निकाल पञक वाटप करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.निकाल पञक मिळताच विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर आनंद पाहायला मिळाला.कार्यक्रम यशस्वीते साठी शाळेचे मुख्याध्यापक किरणकुमार पाटील,सहशिक्षक आसिफ देशमुख यांनी परिश्रम…

Read More

साईमत नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- दक्षिण पूर्व रेल्वेने( South Eastern Railway) ॲपरेंटिस पदांसाठी भरती सुरू केली आहे. रेल्वेकडून(Railway) नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक तरुण रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज दाखल करु शकतात. या भरतेीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ३ मेपासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ जून आहे. रेल्वेच्या अधिसूचनेनुसार, या भरतेीच्या माध्यमातून दक्षिण-पूर्व- मध्य रेल्वेत ॲपरेंटिसच्या ५४८ रिक्त पदांसाठी भरती होत आहे. यामध्ये साधारण गटांसाठी २१५ , ईडब्ल्यूएससाठी ५९, ओबीसींसाठी १४८, एससींसाठी ८५ आणि एसटी उमेदवारांसाठी ४१ पदे आरक्षित आहेत. रेल्वेत ॲपरेंटिस भरतेीसाठी अधिकाधिक वय २४ वर्षे असावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सूट…

Read More

साईमत चोपडा प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीस तिच्या पालकांच्या रखवालीतून पळवून नेत लैंगिक अत्याचार करणाऱ्याया आरोपीस अमळनेर सत्र न्यायालयाने पोक्सो व इतर विविध कलमांतर्गत शिक्षा सुनावली आहे. दीपक रविन्द्र भिल (रा. अकुलखेडा , ता.चोपडा) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या घटनेत पिडीत मुलीच्या आईने 5 फेब्रुवारी, 2020 रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार चोपडा शहर पोलिस स्टेशनला सुरुवातीला (गुरन. 25/20) भा.दं.वि. 363 कलमानुसार गुन्ह्याची नोंद घेण्यात आली होती. तपासाअंती आरोपी दीपक भिल 17 फेब्रुवारीरोजी देवळाली, ता. करमाळा, जि. सोलापूर येथे पोलिसांना पिडीत मुलीसोबत मिळून आला होता. त्यानंतर पिडीत मुलीच्या जवाबानुसार त्याच्याविरुद्ध या गुन्हयात भादंवि. 376 (1) (ए), 376 (3) सह…

Read More