साईमत मुंबई प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस (Rashtawadi Congress) पक्षात मोठे बदल केले जात आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाकरी फिरविण्याचे संकेत दिल्यानंतर अनेक घडामोडी घडत असल्याचे दिसून येत आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी एका मुलाखतीत अनेक प्रश्नांची रोखठोक उत्तरे दिली आहेत. त्यावेळी त्यांना मुख्यमंत्रीपदावर प्रश्न विचारण्यात आले. तुम्ही कार्याध्यक्ष झाल्या पण महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याचा मान जर तुमच्या वाट्याला आला तर तुम्ही त्याला पसंती द्याल का? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला. त्यावर सुप्रिया सुळे यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले. मुख्यमंत्री पदाला एकतर पुरुष अथवा महिला असा…
Author: Saimat
साईमत जळगाव प्रतिनिधी येथील पोलीस मुख्यालयातील मंगलम हॉल मध्ये जिल्हा पोलीस दलाच्या वतीने शनिवारी १ जूलै रोजी सकाळी ११ वाजता तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस उपअधिक्षक संदीप गावीत यांच्या उपस्थितीत जवळपास १५० तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. जिल्हा पोलिस दलाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकांच्या तक्रारींचे निरसन व्हावे म्हणून तक्रार निवारण दिन ही संकल्पना राबविण्यात येते. महिन्याच्या प्रत्येक आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी जळगाव शहरात तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात येते. यात नागरिकांच्या प्रलंबित तक्रारी नुसार त्यांना तक्रार निवारण दिनाचे दिवशी बोलावण्यात येते. त्यावेळी अर्जदार आणि ज्याच्या विरोधात तक्रार आहे अशा दोघांना बोलावण्यात येते. यात नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेवून त्या…
साईमत बोदवड प्रतिनिधी राज्यात सर्वत्र पाऊस सुरु आहे जळगाव जिल्ह्यातील बर्याच तालुक्यात पेरणी योग्य पाऊस पडला आहे परतु बोदवड तालुक्यात अद्यापही पाउस नाही जवळपास १००%धुळ पेरनी पूर्ण झाली आहे परंतु शेतकऱ्यांचे डोळे आता आकाशाकडे लागले आहे. दराम्यान, बोदवड परिसरात शेतकऱ्यांवर दुबारा पेरणीचे संकट उभे ठाकले असून बळीराजा हवालदिल झाला आहे. कायम स्वरूपी दुष्काळ ग्रस्त असलेल्या तालुक्यात वरुण राजाने सुद्धा पाठ फिरवली कि काय ? असा सवाल उपस्थित होत आहे. तालुक्यात पाण्याची समस्या गंभीर असुन, पिण्यास सुद्धा पाणी मिळत नाही गुराढोराना चारा नाही शेतमजूराच्या हाताला काम नाही बाजार पेठ सुन्न असून शेतकरी चिंताग्रस्त आहे . शेतकरी नाना पाटील यानी सागीतले की,…
साईमत मलकापूर प्रतिनिधी ढाब्यावर दारू पिवून ढाब्याशेजारी असलेल्या जनरल स्टोर मालकास सिगारेट उधार मागून उधार न दिल्याच्या रागातून 10 ते 15 लोकांनी एकास बेदम मारहाण करून तेथून पळ काढल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी 8 च्या सुमारास वडनेर धानोरा दरम्यान महामार्गावरील फिरोज च्या ढाब्यावर घडली. मलकापूर ते नांदुरा राष्ट्रीय महामार्गावर वडनेर ते धानोरा दरम्यान असलेल्या फिरोजचा ढाबा असून तेथे धानोरा येथील अनंता कोल्हे हा युवक जनरल स्टोर आणि पानपट्टी व्यवसाय करतो. शुक्रवारी संध्याकाळी 8 च्या सुमारास तेथे 10 ते 15 लोक जेवण करण्यासाठी आले होते त्यापैकी काहींनी मद्यप्राशन केल्याचीही माहिती असून त्यापैकी काहींनी शेजारील अनंता कोल्हे यांच्या पानपट्टीवर जाऊन सिगारेट मागितली सिगारेट…
साईमत बुलढाणा प्रतिनिधी नागपूरहून पुण्याला निघालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्स या खासगी कंपनीच्या एसी स्लीपर कोच बसला बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. आधी लोखंडी खांबाला धडकून बस संरक्षक कठड्यावर आदळली. त्यानंतर उलटून काही क्षणातच बसने पेट घेतला. या अपघातात बसमधील २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर आठ प्रवासी बालंबाल बचावले. परंतु हायवेवरुन जाणाऱ्या इतर प्रवाशांनी वेळीच मदत केली असती, तर आणखी जीव वाचले असते, असा दावा घटनास्थळी बचावकार्य करणाऱ्या काही जणांनी केला आहे. डोळ्यांदेखतच एका बाळाचा जळून मृत्यू झाल्याचंही एका व्यक्तीने सांगितलं. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील पिंपळखुटा परिसरात हा अपघात झाला. बसमध्ये एकूण ३३…
साईमत रावेर प्रतिनिधी प्रतिनिधी केळी उत्पादक शेतकऱ्यांकडून सुटच्या नावाखाली अनेक वर्षांपासून घेत असलेली तीन टक्के सुट शनिवारी, 1 जुलैपासून बंद करण्यात यावी, असा महत्त्वपूर्ण निर्णय कृषी दिनाच्या पूर्वसंध्येला रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीने घेऊन केळी उत्पादक शेतकऱ्यांना कृषी दिनाची भेट दिली आहे. रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन कार्यकारिणीची शुक्रवारी, 30 जून रोजी दुसरी बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी बाजार समितीचे सभापती सचिन पाटील होते. सोबत उपसभापती योगेश पाटील, संचालक गणेश महाजन, जयेश कियुटे यांच्यासह अधिकारी, संचालक मंडळ उपस्थित होते. बैठकीत पूर्वापार व्यापारी केळीच्या घडाच्या वेस्टेज दांड्याच्या पोटी तीन टक्के सूट घेत होते. नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने केळी उत्पादक शेतकरी आपली केळी…
साईमत मलकापूर प्रतिनिधी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील मुक्ताईनगर मार्गावर जग्गुमामा धाब्यानजीक रस्त्याच्या कडेला थांबलेल्या लक्झरी बसला भरधाव आयशर ने जबर धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका गर्भवती महिलेसह चार ठार झाल्याची घटना दि ३० रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर सकाळी ७ वाजेच्या सुमारास नागपूरकडे जात असलेली लक्झरी बसचे टायर पंचर झाल्याने पंचर दुरुस्तीसाठी रस्त्याच्याकडेला थांबलेल्या लक्झरी (क्रमांक एम पी १८ बीजी ८३५१) ला मागच्या बाजूने जोरदार धडक दिली या अपघातात लक्झरी समोर उभे असलेले राजू भाई उर्फ हरी जाधव यांचा जागीच मृत्यू झाला तर भरधाव आयशर रोडाच्या विरुद्ध दिशेला…
साईमत जामनेर प्रतिनिधी जामनेर तालुक्यातील जांभूळ येथील शेतकरी कैलास वडाळे याच्या खून प्रकरणी खूनाच्या गुन्ह्यात अटकेत असलेला आरोपी रमेश मोरे रा.वडाळी यास न्यायालयाने दि.३० पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. पोलिस कोठडी ची मुदत संपल्याने आरोपी रमेश मोरे यास आज दि.३० रोजी जामनेर न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली.न्यायालयीन कोठडी मिळाल्याने संशयित आरोपी रमेश मोरे याची रवानगी जळगाव जिल्हा कारागृहात करण्यात आली. दरम्यान पोलिस कोठडीत असतांना संशयिताने वाकोद बसस्थानक परिसरात असलेल्या खुशबू कापड दुकानातून पांढरा कापड खरेदी केला होता. तसेच नरेंद्र मेडिकल वरुन नारळी दोरीचे दोन बंडल खरेदी केले होते. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वडाळी येथील भावड्या नामक…
साईमत पुणे प्रतिनिधी खरीप हंगामाच्या प्रत्यक्ष ई-पीक पाहणी मोबाईल अॅपद्वारे पीक पाहणी करण्यासाठी १ जुलै २०२३ पासून सुरु करण्यात येत आहे. राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी खरीप हंगाम २०२३ साठी दिलेल्या कालावधीमध्ये ई- पीक पाहणी नोंदणी पूर्ण करावी. त्यामुळे शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यास अडचण येणार नाही, अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा ई-पीक पाहणी प्रकल्पाचे राज्य समन्वयक श्रीरंग तांबे यांनी दिली. ई-पीक पाहणी मोबाईल अॅपच्या सहाय्याने सर्व खातेदार शेतकऱ्यांनी तलाठ्याकडे न जाता स्वतःच्या मोबाईलवरुन सातबाऱ्यावर विविध पिकांची नोंदणी करत येणे शक्य झाले आहे. महसूल विभागाचा ई- पीक पाहणी प्रकल्प १५ ऑगस्ट २०२१ पासून महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. या अॅपमध्ये आतापर्यंत १.८८ कोटीपेक्षा अधिक…
साईमत मुंबई प्रतिनिधी महाराष्ट्रात एकनाथ शिंदे गट आणि भाजप सत्तेत येऊन १ वर्ष होत पूर्ण होत आहे. अद्याप या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. परंतु लवकरच शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी चर्चा आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरूवारी पंढरपूर येथून विठ्ठलाचे दर्शन घेऊन दिल्लीला रवाना झाले. एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा दिल्लीला रवाना झाले. विशेष बाब म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी दुपारी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बेस यांची भेट घेतली. या भेटीत मंत्र्यांच्या शपथविधीविषयी चर्चा झाल्याची माहिती आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार ? शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार जलेच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली…