Author: Saimat

साईमत मुंबई प्रतिनिधी एक वर्षांपूर्वी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनी रविवारी २ जुलै रोजी बंडखोरी केली आहे. अजित पवार हे आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथही घेतली आहे. पण जेव्हा शिंदे गटाने बंडखोरी केली. तेव्हा अजित पवार निधी देत नाहीत. म्हणून आम्ही बंडखोरी केली. असा दावा शिंदे गटाने केला होता. अजित पवार यांच्या जाचामुळेच आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडलो. असे वक्तव्य शिंदे गटाच्या विविध नेत्यांनी केले होते. आता अजित पवार हेच युती सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे निधी न…

Read More

साईमत सोयगाव प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील ३७० किल्ले सर करण्यासाठी केरळहून निघालेल्या शिवभक्त युवक एम. के. हमरासचे सोयगाव शहरात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रवी भाऊ काळे,व  दैनिक बाळकडू चे पत्रकार विजय काळे यांनी स्वागत केले. केरळहून तो निघाला असून या सायकल राईडमध्ये तो सर्व किल्ल्यांना भेटी देवून आपली ही आगळी वेगळी सफर पूर्ण करणार आहे. शिव भक्त हमरास हा गेली आठ महिने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने प्रेरित होवून सायकलवरुन गडकोटांना भेट देत आहे. त्याने महाराष्ट्रातील ११७ किल्यांना भेट दिला. यावेळी  आदी शिवप्रेमी त्यांचे स्वागत करण्यास उपस्थित होते. हमरासनी छ.संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात सुतोंडा उर्फ नायगावचा किल्ला या नावाचा सुंदर किल्ला आहे.…

Read More

साईमत बोदवड प्रतिनिधी बोदवड महाविद्यालयाचे ग्रंथपाल परिचर श्री.नामदेव बडगुजर नुकतेच सेवानिवृत्त झाले .त्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन संस्थेचे चेअरमन मिठूलालजी अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्राचार्य अरविंद चौधरी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले . सदर कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून अध्यक्ष श्री. मिठूलालजी अग्रवाल, सचिव श्री. विकासभाऊ कोटेचा,अँड. श्री.प्रकाशचंद सुराणा,श्री. श्रीरामभाऊ बडगुजर, श्री.अशोक जैन ,श्री.रवींद्र माटे, नगरसेवक विजय बडगुजर ,प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी,उपप्राचार्य डॉ. विनोदकुमार चौधरी , माजी उपसरपंच संजय बडगुजर ,संजय मोहन बडगुजर यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री.नामदेव बडगुजर, त्यांच्या धर्मपत्नी सौ. रंजना बडगुजर यांचा संस्थेच्या वतीने आणि महाविद्यालयाच्या परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्रातिनिधिक स्वरूपात डॉ. मनोज निकाळजे, श्री. शेखरसिंग चव्हाण यांनी…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी नुकताच कलादर्श प्रस्तूत,महालक्ष्मी थियेटर्स निर्मित, ‘वेगळं असं काहीतरी ‘ या स्थानिक कलावंतांनी संभाजीराजे नाट्यगृहात सादर केलेल्या नाटकास नाट्य-रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. प्रेक्षकांच्या गर्दीने प्रयोग ‘हाऊसफुल्ल’ होता. नाटकाच्या संन्मानिकांची आगावू नोंदणी झाल्याने नाटक रसिक श्रोत्यांनी तुडुंब भरले होते. एरवी घरोघरी छोट्या – मोठ्या कारणावरून थेट टोकापर्यंत ताणल्या जाणाऱ्या नवरा-बायकोच्या वादाला ‘ फ्यांटसी ‘ची  खमंग फोडणी दिली तर ,त्याची चव काही वेगळीच वाटते ,अशाच शेवटपर्यंत निभावून न्यावयाच्या ‘या’ गोड नात्यावर उपरोधिक पण खुशखुशीत भाष्य करणारे नाटक ‘रतनलाल सी.बाफना ज्वेलर्स’ च्या अनमोल सहकार्याने जळगावकर रसिकांसाठी सादर झाले . प्रारंभी नाट्यगृहाच्या प्रवेशद्वाराशी लागलेल्या हाउस-फुल्ल च्या फलकास आर.सी.बाफना ज्वेलर्स चे जनसंपर्क प्रमुख…

Read More

साईमत सोयगाव प्रतिनिधी महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने काल (शनिवार) सोयगाव शहर व तालुक्यातील नाभिक समाज बांधवांची बैठक जिल्हाध्यक्ष संतोष बोराडे यांच्या अध्यक्षतेखाली श्री मारोती मंदिर सभागृहात पार पडली . या बैठकीमध्ये उपस्थित सर्व नाभिक बांधवांच्या सर्वानुमताने महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या खालील कार्यकारिणी जाहीर केल्या आहेत . तालुका शाखा महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे तालुकाध्यक्ष म्हणून केदार राऊत (गोंदेगाव), उपाध्यक्ष – बापुराव पंडित (सोयगाव),राजु गलबले (सावळदबारा),सचिव – अशोकराव वाघ , सहसचिव – ज्ञानेश्वर एलिस (सोयगाव) सह दिलीप सोनवणे ,किरण निकम ,दत्तात्रय एलिस,पवन क्षीरसागर ,विशाल सोनवणे v दिनेश सोनवणे आदींचा समावेश आहे . युवक तालुका शाखा अध्यक्ष – रामकृष्ण सोनवणे (सावळदबारा), उपाध्यक्ष – योगेश निकम…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी ईश्वर कॉलनी येथील आर्मी सैनिक शिवाजी सुभाष शिंदे हे २६ वर्ष प्रदीर्घ देशसेवा देऊन नुकतेच ता. १ जुलै रोजी मणिपूर येथून निवृत्त झाले. याप्रसंगी ता. २ जुलै रविवार रोजी त्यांचा भव्य नागरी सत्कार जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे व महापौर जयश्रीताई महाजन यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून मराठा सेवा संघाचे महानगराध्यक्ष व जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त शाखा अभियंता एच. एच. चव्हाण, नगरसेवक कुंदन काळे, नवयुवक मराठा विकास मंडळाचे अध्यक्ष संजय मराठे व सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहन सरोदे हे उपस्थित होते. श्री. शिवाजी शिंदे यांचे ता. २ जुलै रविवार रोजी सकाळी ७ वाजता…

Read More

साईमत मुंबई प्रतिनिधी राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. दादा राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून त्याच्या हरोबर राष्ट्रवादी चे बडे नेते ही सरकार मध्ये गेल्याने आचार्य व्यक्त केले जात आहे . सध्याच्या घडीला राज्याच्या राजकारणामध्ये मोठी घडामोड होत आहे. राजभवनामध्ये अजित पवार दाखल झाले. आणि त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथही घेतली आहे. काही वर्षांपूर्वी राजाच्या राजकारणात अशाच प्रकारचा भुकंप झाला होता. त्यात पुन्हा एकदा धक्कादायक बाब समोर आली आहे. यावेळी देखील विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी आक्रमकपणे आपली भूमिका मांडली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवारांच्या या नव्या खेळीविषयी राष्ट्रवादीच्या नेत्यांना विचारण्यात आले…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी जिल्ह्यात सर्वाधिक चर्चिला जाणारा प्रश्न वाळू चोरीचा असल्याने यासंदर्भात कठोर कारवाईचे निर्देश महसूल प्रशासनाला दिले आहेत. जनतेसाठी आता 9209284010 हा हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आला असून या क्रमांकावर वाळू चोरीसह अन्य तक्रारी जनतेने पुराव्यासह तक्रार केल्यास तत्काळ तक्रारींचे निरसन करण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी येथे दिली. शासकीय योजनांचा आढावा घेण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयात शुक्रवारी दुपारी त्यांनी बैठक घेतल्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले की, वाळू चोरट्यांवर प्रशासन सातत्याने कठोर कारवाई करीत आहे. शिवाय वाळू चोरट्यांनी दंड न भरल्यास त्यांच्या चल-अचल संपत्तीसह बँक खात्यावर बोजा बसवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. स्वस्तात वाळू देण्याचे शासन…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी मजुरीचे पैसे घेण्याच्या कारणावरून दुकान मालकावर चाकूहल्ला केल्याप्रकरणी आरोपी दीपक मधुकर दुसाने (रा. हरिविठ्ठल नगर, जळगाव) याला जळगाव जिल्हा न्यायालयाचे न्यायमूर्ती डी.एन. खडसे यांनी दोन वर्ष सक्तमजुरीची आणि 2 हजारांचा दंड अशी शिक्षा शनिवारी 1 जुलै रोजी दुपारी 2 वाजता सुनावली. याबाबत अधिक माहिती अशी की, जळगावातील वाघ नगर परिसरात सागर शंकर भामरे यांचे वाघ नगर स्टॉप येथे साईदर्शन फेब्रीकेशन वेल्डींग दुकान आहे. या दुकानावर आरोपी दीपक दुसाने हा कामाला होता. त्यानंतर त्याने काम सोडले होते. 25 ऑक्टोबर 2018 रोजी सकाळी 9 वाजता दीपक दुसाने हा दुकानावर आला. त्याने सागर भामरे यांना कामचे राहिलेले पैसे मागितले. त्यावर…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी शेती हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून शेतकऱ्यांनी नव तंत्रज्ञानाची कास धरत शेतीकडे उद्योग म्हणून बघणे गरजेचे आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या संघर्षाच्या काळात जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांच्या सोबत आहे. असा विश्वास जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी व्यक्त केला. कृषी क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेच्या साने गुरुजी सभागृहात आयोजित कृषी दिनाच्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्री. मित्तल अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, कृषी विकास अधिकारी श्री. जगताप यांच्यासह इतर अधिकारी व शेतकरी उपस्थित होते. जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, शासनाच्या सर्वाधिक योजना या शेतकऱ्यांच्या विकासासाठी…

Read More