साईमत, जळगाव ः प्रतिनिधी राज्यात गाजलेल्या नेत्यांच्या फोन टॅिंपग प्रकरणी रश्मी शुक्लांना दिलासा मिळाला आहे. या प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे म्हणाले की, शासनाने रश्मी शुक्ला यांच्या बाबतचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारला आहे. रश्मी शुक्ला तुमच्या आश्रयाला आल्या म्हणून त्यांना भाजपच्या वॉिंशग मशिनकडून दिलासा मिळाला आहे. एकनाथ खडसे पुढे म्हणाले की, अपेक्षेप्रमाणे सरकारने रश्मी शुक्ला यांचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारला. माझा फोन टॅप केला, त्याबाबत मी देवेंद्र फडणवीसांना अधिव्ोशनातून प्रश्न विचारला, मात्र त्याचे उत्तर मला मिळाले नाही. वास्तविक अजूनही मला माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नसतानाही सरकारने क्लोजर रिपोर्ट दिला. उलट रश्मी शुक्लांना क्लीन चीट मिळाली. आमचे म्हणणे न ऐकता आणि आम्हाला उत्तर…
Author: Saimat
साईमत, जळगाव ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुटीनंतर जळगाव जिल्ह्यात अमळनेरचे एकमेव आमदार अनिल पाटील अजित पवार गटात गेले. त्यानंतर त्यांना मंत्रीपद मिळाले. एकनाथ खडसे यांच्यासह अनेक नेते मात्र शरद पवार यांच्या सोबत असून त्यांना साथ देत आहेत. अजित पवार गटाची राज्यातील जिल्हा प्रभारीची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली. त्यात जळगांव, धुळे, नंदुरबार हा खान्देशातील भाग राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. तर, शरद पवार यांच्या गटातर्फे जाहीर करण्यात आलेल्या जिल्हा प्रभारींच्या यादीत माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे जळगाव, धुळे, नंदुरबार व बुलढाणा हा भाग देण्यात आला आहे. या दोन्ही नेत्यांना आता जिल्ह्यात आपला पक्ष बळकट…
साईमत, जळगाव ः प्रतिनिधी जिल्हाभरातील ठेकेदारांची ३०० कोटींची कामे पूर्ण होऊनही बिले शासनानेे अदा केलेली नाहीत. त्यामुळे ३०० कोटींची बिले दिल्याशिवाय पुढील कामे करणार नाही, अशी भूमिका जिल्हाभरातील ठेकेदार आणि त्यांच्या संघटनेने घेतली आहे. त्यामुळेच १००० कोटींच्या कामांना ब्रेक लागला आहे. तसेच जिल्ह्यातील कामे एकाच ठेकेदाराला दिली जात आहेत. ती सर्व कामे वाढीव दराच्या निविदाधारकालाच दिली आहेत. एकही काम कमी भावाच्या निविदाधारकास दिलेले नाही. यात तथ्य असल्यानेच कामांना ब्रेक लागला. मी गेल्या ४० वर्षात कुणा अधिकाऱ्यांस ब्लॅकमेल केल्याचे दाखवून द्याव्ो, असे आव्हान आमदार एकनाथराव खडसे यांनी त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आ. एकनाथराव खडसे ृअधिकाऱ्यांना…
साईमत, नवीदिल्ली ः वृत्तसंस्था चांद्रयान-३ च्या लँडरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवून इतिहास रचला आहे. याने चंद्राच्या अंतिम कक्षेपासून २५ किमीचा प्रवास ३० मिनिटांत पूर्ण केला. लँडर हळूहळू खाली उतरवण्यात आले. ५ वाजून ३० मिनिटांनी सुरुवातीला रफ लँिंडग खूप चांगली झाली. यानंतर लँडरने ५ वाजून ४० मिनीटांनी लॅण्डरने व्हर्टिकल लँिंडग केले. तेव्हा त्याचे चंद्रापासूनचे अंतर ३ किमी होते. अखेर लँडरने सहा वाजून चार मिनिटांनी चंद्रावर पहिले पाऊल ठेवले. त्यामुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला. चंद्राच्या कोणत्याही भागात वाहन उतरवणारा हा चौथा देश ठरला आहे. यापूर्वी केवळ अमेरिका, सोव्हिएत युनियन आणि चीनने हे यश मिळवले आहे.…
साईमत, जळगाव, प्रतिनिधी जिल्हाभरातील ठेकेदारांची 300 कोटींची कामे पूर्ण होऊनही बिले शासनानेे अदा केलेली नाहीत. त्यामुळे 300 कोटींची बिले दिल्याशिवाय पुढील कामे करणार नाही, अशी भूमिका जिल्हाभरातील ठेकेदारांनी व त्यांच्या संघटनेने घेतली आहे. त्यामुळेच 1000 कोटींच्या कामांना ब्रेक लागला आहे. तसेच जिल्ह्यातील कामे एकाच ठेकेदाराला दिली जात आहेत. ती सर्व कामे वाढीव दराच्या निविदाधारकालाच दिली आहेत. एकही काम कमी भावाच्या निविधारकास दिलेले नाही. यात तथ्य असल्यानेच कामांना ब्रेक लागला. मी गेल्या 40 वर्षात कुणा अधिकाऱ्यांस ब्लॅकमेल केल्याचे दाखवून द्यावे, असे आ. एकनाथराव खडसे यांनी त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आ. एकनाथराव खडसे ृअधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करीत…
साईमत, धुळे : प्रतिनिधी केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्कवाढ रद्द न केल्यास सत्ताधारी नेत्यांना शेतकरी गावात फिरु देणार नाही, असा इशारा देत शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कांदाफेक आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यात आला. जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांना माजी आमदार प्रा. शरद पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी निव्ोदन दिले. जिल्ह्यात कांदा उत्पादकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून केंद्र सरकारने कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क लावल्याने कांद्याचे दर पुन्हा घसरण्यास सुरुवात झाली आहे. मागील काही दिवसांपासून कवडीमोल भावाने कांद्याची विक्री सुरु होती. कांद्याला पंधरवड्यापासून बऱ्यापैकी भाव मिळू लागताच केंद्राने निर्यात शुल्क 40 टक्के केले. एप्रिल ते जुलै या कालावधीत…
साईमत, धुळे : प्रतिनिधी शहरातील हमाल मापाडी प्लॉट भागात जेसीबी यंत्रामुळे फुटलेली जलवाहिनी आठ दिवसात दुरुस्त न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा मंगळवारी रहिवाशांनी दिला. जलवाहिनी फुटल्यामुळे या भागाचा पाणी पुरवठा दोन महिन्यांपासून बंद आहे. याप्रकरणी महापालिकेचे आयुक्त देविदास टेकाळे यांना निव्ोदन देण्यात आले. प्रभाग क्रमांक 11 मधील हमाल मापाडी प्लॉट भागात मनमाड जीन पाण्याच्या टाकीवरून जलवाहिनी टाकण्यात आली आहे. राजीव गांधी नगरमधून ही जलवाहिनी सांडपाण्याच्या नाल्याच्या खालून गेली आहे. या ठिकाणी महापालिकेतर्फे जेसीबी यंत्राव्दारे नाला साफ सफाईचे काम सुरु असताना जेसीबीच्या धक्क्याने जलवाहिनी फुटली. या घटनेला दोन महिने होऊनही जलवाहिनी दुरूस्त करण्यात आली नाही. महापालिकेच्या कार्यकारी अभियंत्यांनी आठ दिवसात जलवाहिनी…
साईमत, दोंडाईचा : प्रतिनिधी परिसरात अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे कोरडवाहू शेतीतील पिके करपू लागली आहेत. दरम्यान, मालपूर (ता. शिंदखेडा) येथील अमरावती धरणातील पाणीसाठ्याने तळ गाठला आहे. जोरदार पावसाअभावी ५ टक्के साठा शिल्लक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. शिंदखेडा तालुक्यात यंदा सुरवातीपासूनच जेमतेम पाऊस होत आहे. भिजपावसावरच शेतकऱ्यांनी कपाशीलागवड व पेरण्या करून टाकल्या. निम्मा पावसाळा संपला, दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ उलटला, मात्र जोरदार पाऊस झाला नसल्याने शेतातून पाणी वाहून निघालेच नाही. नदी, नाले, ओढे वाहिले नाहीत. जलयुक्त शिवाराचे बंधारे, साठवण बंधारे, धरणे कोरडी ठणठणीत पडली आहेत. बागायतदार शेतकऱ्यांच्या विहिरी उपशावर आल्या. मेमध्ये कपाशी लागवड केल्याने पुरेशा प्रमाणात…
साईमत, नंदुरबार: प्रतिनिधी गटग्रामपंचायत सोनबुद्रुकमार्फत आदिवासी गौरव दिनानिमित्त ग्रामसभेत विविध उपक्रम राबविण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून ग्रामपंचायतीने कन्यारत्न झालेल्या आई-वडिलांचा सन्मान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गावातील विविध शासकीय पदावरून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा सेवापूर्ती सत्कार करण्यात आला. त्यात शिवलाल पावरा, ओजाऱ्या पावरा, निवृत्त शिक्षक पावरा, तलाठी भालचंद्र पावरा तसेच भारतभूमीच्या रक्षणासाठी अहोरात्र सेवा बजावलेले माजी सैनिक डेका दादा पावरा यांनाही सन्मानित करण्यात आला. त्यानंतर गावपातळीवर विविध विभागांतील कर्मचाऱ्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना आदर्श कर्मचारी म्हणून सन्मानित करण्यात आले. त्यात प्रामुख्याने ज्यांनी २० वर्षांपासून ग्रामविकास विभागाचे उत्तम आणि आदर्श काम करणारे ग्रामसेवक गिरीश गोकुळ पाटील यांना आदर्श कर्मचारी आणि निरोप…
साईमत, प्रतिनिधी, जळगाव एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीतर्फे दिला जाणारा ‘माझा सन्मान-२०२३’ या पुरस्काराने उद्योग क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन यांचा गौरव करण्यात आला. महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या मंडळींचा माझा सन्मान सोहळा मुंबईच्या परळ येथील हॉटेल आयटीसी ग्रँड सेंट्रल येथे सोमवारी संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, ज्येष्ठ सिनेअभिनेते जितेंद्र यांच्याहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. माझा सन्मान पुरस्काराचे यंदाचे १५ वे वर्ष आहे. सामाजिक, मनोरंजन, कला, लोककला, समाजकार्य, विज्ञान, उद्योग अशा विविध क्षेत्रातील दिग्गजांना ‘माझा सन्मान’ प्रदान करण्यात…