राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे खडसे तर अजितदादा गटाचे मंत्री अनिल पाटील प्रभारी

0
3

साईमत, जळगाव ः प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुटीनंतर जळगाव जिल्ह्यात अमळनेरचे एकमेव आमदार अनिल पाटील अजित पवार गटात गेले. त्यानंतर त्यांना मंत्रीपद मिळाले. एकनाथ खडसे यांच्यासह अनेक नेते मात्र शरद पवार यांच्या सोबत असून त्यांना साथ देत आहेत. अजित पवार गटाची राज्यातील जिल्हा प्रभारीची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली. त्यात जळगांव, धुळे, नंदुरबार हा खान्देशातील भाग राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. तर, शरद पवार यांच्या गटातर्फे जाहीर करण्यात आलेल्या जिल्हा प्रभारींच्या यादीत माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे जळगाव, धुळे, नंदुरबार व बुलढाणा हा भाग देण्यात आला आहे. या दोन्ही नेत्यांना आता जिल्ह्यात आपला पक्ष बळकट करावयाचा आहे. त्यांचा आता खऱ्या अर्थाने कसं लागणार आहे. विशेष म्हणजे दोन्ही नेते एकेकाळी भाजपमध्ये असताना ते एकमेकांचे अत्यंत निकटचे मानले जात होते. अनिल पाटील यांना त्या काळात खडसे यांच्या गटाचे मानले जात होते. आता राष्ट्रवादीचे दोन गट झाल्यानंतर खान्देशात या दोघांतच सामना होणार असूनत्यांनी एकमेकांविरुद्ध तोफ डागणे सुरू केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here