साईमत, जळगाव, प्रतिनिधी जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायतीकडील दिवंगत अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या एकूण १८ वारसांना शासकीय नियुक्ती देण्यात आली आहे. नियुक्तीपत्रांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व मदत , पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वाटप करण्यात आले. यावेळी नोकरी प्राप्त उमेदवारांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. जिल्हास्तरीय गट ‘क’ व ‘ड’ ची सामायिक प्रतिक्षा सूचीतील १८ उमेदवारांना जिल्ह्यातील नगरपरिषदांमध्ये नियुक्तीचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या स्वाक्षरीने देण्यात आले आहे.. शिफारस यादीतील या पात्र उमेदवारांना भुसावळ, पाचोरा, रावेर, चाळीसगाव, अमळनेर, चोपडा, जामनेर, फैजपूर या नगरपरिषदेत नियुक्ती देण्यात आली. अनुकंपावर यांची झाली नियुक्ती कार्तिक ढाके, जुबेर…
Author: Saimat
साईमत, जळगाव, प्रतिनिधी, जळगाव- येथील कांचन नगरात दशक्रिया विधीच्ाा स्वयंपाक सुरू असताना गॅस लिक झाल्यामुळे भीषण आग लागून घराची राखरांगोळी झाल्याची घटना कांचननगरात मंगळवारी सकाळी 10. वाजेच्या सुमारास घडली. याबाबत अकस्मात आगीची नोफ्लद शनिपेठ पोलिसात करण्यात आली आहे. येथील कांचननगरातील सुभाष भाऊलाल बाविस्कर (वय 52) यांच्या शेजारी वृद्घाचे निधन झाले होते. या वृद्घाचा आज दशक्रिया विधी असल्याने स्वयंपाक करण्यासाठी सुभाष बाविस्कर यांनी त्यांची खोली शेजारच्यांना दिली होती. स्वयंपाक सुरू असताना अचानक गॅस सिलिंडर लिक झाले. त्यामुळे अवघ्या काही क्षणातच याठिकाणी भीषण आग लागली. या भीषण आगीत खोलीत असलेले सर्व कपडे तसेच संसारोपयोगी साहित्य, त्यांचे एलआयसीचे कागदपत्र, बँकेचे पासबुक, परिवाराचे शैक्षणिक…
साईमत, प्रतिनिधी, जळगाव येथील आकाशवाणी चौकात मोटारसायकलस्वारास भरधाव गॅस सिलिंडर घेवून जाणाऱ्या ट्रकने चिरडल्याने जिल्हा उपनिबंधक कार्यालयात बैठकीसाठी येणाऱ्या कोल्हाडी(ता. बोदवड) येथील वि.का.सोसायटी सचिवांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास घडली. जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सहकार विभागाची मंगळवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी कोल्हाडी(ता. बोदवड) येथील वि.का.सोसायटी सचिव पंजाबराव बोरसे हे सकाळी बोदवड येथून दुचाकीने (क्र. एमएच 19, एसी 224) जळगावला यायला निघाले. ते शहरातील आकाशवाणी चौकात पोहचले त्या वेळी तेथे मागून भरधाव गॅस सिलिंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकने (क्र. एमएच 04 जेयु 9596) त्यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली. यात बोरसे मागील चाकाखाली आल्याने त्यांच्या डोक्याचा चेंदामेंदा…
साईमत, नाशिक ः प्रतिनिधी जिल्ह्यात कांद्यावरील ४० टक्के निर्यात शुल्काविरोधात कांदा उत्पादक आणि व्यापारी यांनी आक्रमक होत ठिकठिकाणी आंदोलन केले. वणी येथे रास्तारोको करण्यात आला. निफाड प्रांताधिकाऱ्यांकडे ठाकरे गटातर्फे शुल्क हटविण्याची मागणी करण्यात आली. तर, िंपपळगाव बसवंत येथे आमदार दिलीप बनकर यांनी निर्णयाचा निषेध करीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. वणी येथील वीर बिरसा मुंडा चौकात शेतकरी संघटना आणि सर्व पक्षांच्या वतीने तासभर आंदोलन करुन केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाची होळी करण्यात आली. वणी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक नीलेश बोडखे यांना निव्ोदन देण्यात आले. आंदोलनामुळे तासभर वाहतूक थांबली होती. केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा शेतकऱ्यांकडून देण्यात आल्या. िंदडोरीच्या खासदार डॉ. भारती पवार यांच्या भूमिकेचाही…
साईमत, मुंबई : प्रतिनिधी वैद्यकीय कारणास्तव अंतरीम जामिनावर तुरुंगातून बाहेर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री नवाब मलिक महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. नवाब मलिक हे राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांच्या नेतृत्त्वातील गटात सामील होण्याची चर्चा सुरू झाली आहे. अजित पवार गटाच्या कार्यालयाकडून उद्या मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन आयोजित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे नवाब मलिक हे अजित पवार गटात जाणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर नवाब मलिक घरी परतले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या नेत्यांनी त्यांची भेट घेतली. यामध्ये अजित पवार, प्रफुल पटेल, सुनील…
साईमत, धुळे : प्रतिनिधी नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून केंद्रस्तरावर प्रधानमंत्री मत्स्यसंवर्धन योजना राबविण्यात येत आहे. पारंपरिकरित्या मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांना प्रशिक्षण देत आधुनिक पद्धतीने मत्स्य व्यवसाय करण्यासाठी साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या माध्यमातून या व्यवसायिकांना उभारी देण्याचा प्रयत्न शासनामार्फत केला जात असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी शिरपूर येथे केले. शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ तसेच प्रधानमंत्री मत्स्यसंवर्धन योजना, मत्स्य व्यवसाय नाशिक विभाग व आवलामाता प्राथमिक भूजलाशयीन मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मत्स्य व्यवसाय साहित्य वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित,…
साईमत, पुणे : प्रतिनिधी राज्यात विभागीय स्तरावर आरोग्याचा कारभार पाहण्यासाठी सध्या आठ आरोग्य परिमंडळे असून त्याचे काम आरोग्य उपसंचालक पाहतात. मात्र, एका आरोग्य परिमंडळाच्या अंतर्गत तीन ते चार जिल्हे येत असल्याने आरोग्य उपसंचालकांवर त्याचा ताण येतो. त्यामुळे आता या आरोग्य परिमंडळांचा विस्तार होणार असून आठ आरोग्य परिमंडळांचे आता २० आरोग्य परिमंडळे आणि वीस आरोग्य उपसंचालक नियुक्त केले जाणार आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली. सार्वजनिक आरोग्य विभागाचा विभागीय स्तरावरील कारभार हा परिमंडळांचे आरोग्य उपसंचालक पाहतात. सध्या राज्यात ठाणे, नाशिक, पुणे, कोल्हापुर, औरंगाबाद, लातुर, अकोला आणि नागपुर असे एकुण आठ परिमंडळ आहेत. त्या ठिकाणी आठ आरोग्य उपसंचालक आहेत. परंतू…
साईमत, जळगाव, प्रतिनिधी तालुक्यातील खेडी बुद्रुक येथील माहेर असलेल्या विवाहितेचा पैशांसाठी छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या सात जणांविरोधात रविवारी ४.४५ वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेडी बुद्रुक येथील मनीषा राठोड यांचा विवाह अकोला येथील नितीन बळीराम राठोड यांच्याशी झाला आहे. लग्नानंतर काही दिवस चांगले गेल्यानंतर मनीषा हिच्या वडिलांनी लग्नात हुंडा कमी दिला. या कारणावरुन तिचा छळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर घर बांधण्यासाठी १० लाख रुपये आणावेत, अशी मागणी मनीषा हिच्याकडे तिचे पतीसह सासरच्यांनी केली. तसेच याच कारणावरुन तिचा वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून मनीषा राठोड या माहेरी जळगाव येथे निघून…
साईमत, प्रतिनिधी, जळगाव जळगाव-शहरातील काव्यरत्नावली चौकातील भाऊंचे उद्यानाजवळ पायी जात असलेल्या वृद्धाला मागून येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिल्यान वृद्ध जखमी झाले असून त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात दुचाकीधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोदर मूलचंद बंजारा (वय ६६) रा. महाबळ रोड, महाबळ पोलीस चौकी, हे शनिवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास काव्यरत्नावली चौकातील भाऊंचे उद्यानाजवळून पायी जात होते. त्यावेळी मागून दुचाकीवर येणारा महिपाल धर्मपाल जांगिड (रा. रविराज कॉलनी), याने मागून जोरदार धडक दिली. या धडकेत वृद्धाच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वृद्धांने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी…
साईमत, प्रतिनिधी, जळगाव महापालिकेस जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत चालू आर्थिक वर्षात मंजूर 30 कोटींचा निधी रस्ते, गटार बांधकामांसाठी मंजूर करण्यात आला आहे. प्रत्येक वार्डात कामे व्हावीत, यासाठी सर्वच नगरसेवकांना 20 ते 25 लाखांचा निधी दिला जाणार आहे. परंतु नगरसेवकांचा कार्यकाळ संपण्यात आला आहे. नगरसेवकांना आता विकासकामांसाठी कमी आणि आगामी निवडणुकीत निधी वापरण्याची आणि निधीत भ्रष्टाचार होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे नगरसेवकांना निधी न देण्यासंदर्भात आयुक्तांना नोटीस दिली आहे. निधी देण्याच्या विरोधात शहरातील तीन राजकीय पक्षांसह 13 सामाजिक संघटना एकत्र आल्या आहते, अशी माहिती लोकशक्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष पराग कोचुरे यांनी दिली. शहरातील शासकीय पद्मालय विश्रामगृहात सोमवारी कोचुरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.…