Author: Saimat

साईमत, नंदुरबार: प्रतिनिधी जिल्ह्यासह शहरात भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्या विक्रेत्यांच्या विरोधात विशेष मोहीम उघडण्यात आली आहे. दूध भेसळ विरोधी पथकाने नंदुरबार शहरात 18 ठिकाणी तपासणी केली. यामध्ये नऊ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या पथकाने भेसळयुक्त 334 लिटर दूध नष्ट केले आहे. नंदुरबार जिल्ह्यात आणि शहरात भेसळयुक्त दुधाची विक्री होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. या वाढत्या तक्रारींची दखल घेत जिल्हा दुग्ध विकास आणि व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी सकाळपासूनच नंदुरबार शहरातील विविध दूध विक्रेत्यांची तपासणी सुरू केली.या पथकाने 18 ठिकाणी तपासणी केल्यानंतर नऊ दूध विक्रेत्यांकडे दुधामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक आढळून आल्याने 334 लिटर दूध नष्ट करण्यात आले आहे. काही ठिकाणी दुधाचे नमुने…

Read More

साईमत, नाशिक : प्रतिनिधी पात्र शिधापत्रिकाधारकांना गौरी-गणपती, दिवाळीसाठी 100 रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे पात्र गरजू लाभार्थ्यांचा गौरी-गणपती उत्सव तसेच दिवाळी सण गोड होणार असून, जिल्ह्यातील तब्बल सात लाख 78 हजार लाभार्थ्यांना या शिधा संचाचा लाभ होईल.गौरी-गणपती उत्सवानिमित्त 1 ते 30 सप्टेंबर या कालावधीत हा संच वितरित होणार आहे. पात्र शिधापत्रिकाधारकांना एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर व एक लिटर खाद्यतेल या चार शिधाजिन्नसांचा समाव्ोश असलेला एक शिधाजिन्नस संच प्रति शिधापत्रिका ई-पॉस प्रणालीद्वारे प्रतिसंच 100 रुपये या दराने वितरित करण्यात येणार आहे. अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबाला (बीपीएल, पिवळे, प्राधान्य…

Read More

साईमत, नाशिक । प्रतिनिधी राज्यात ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या आर्थिक गुन्ह्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून याला आळा घालण्यासाठी राज्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये सायबर सेल सुरु करावा, अशी मागणी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे निव्ोदनाद्वारे केली आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉटसॲप, ऑनलाईन बँकींग, ऑनलाईन खरेदी, विविध कर्ज योजनांद्वारे नागरिकांची फसवणूक होत असते. यामध्ये ग्रामीण भागातील नागरिकांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर आहे. सद्यस्थितीत प्रत्येक जिल्हास्तरावर सायबर सेल कार्यान्वित आहेत. या सेल मध्ये दाखल होणाऱ्या गुन्ह्यांची संख्या विचारात घेता सायबर सेलमधील नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या पुरेशा प्रमाणात नाही. त्यामुळे फसवणुक केलेल्या गुन्हेगारांचा शोध व गुन्ह्यांच्या तपास कार्यात विलंब…

Read More

साईमत, नाशिक : प्रतिनिधी एकीकडे नाशिक पोलीस सायबर दूतांच्या नेमणुकीसह शहरभर चौक बैठका आयोजित करत आहे. मात्र दुसरीकडे खुनाचे सत्र सुरूच असून अंबड परिसर पुन्हा एकदा हादरला आहे. पोलीस चौकीच्या काही अंतरावरच भाजीविक्रेत्याला संपविण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मागील पंधरा दिवसात नाशिकमध्ये खुनाची चौथी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी शहरातील अंबड भागात एका सराईत गुन्हेगाराला टोळीवादातून संपविण्यात आल्याची घटना घडली होती. अशातच याच परिसरात भरदिवसा नागरिकांच्या गर्दीत एका भाजीविक्रेत्याची हत्या करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नागरिक प्रचंड दहशतीखाली आहेत. तर पोलिसही वारंवार घडणाऱ्या घटनांनी चक्रावले असून एक गुन्ह्यांचा तपास लागत नाही तोच दुसरी…

Read More

साईमत, त्र्यंबकेश्‍वर : प्रतिनिधी सनशाईन इंटरनॅशनल मेकअप अकॅडमी तर्फे ‘मिसेस इंटरनॅशनल क्लासिक दुबई 2023’ कार्यक्रम दुबई येथे उत्साहात संपन्न झाला. आंतरराष्ट्रीय ब्यूटी सेमिनार अंतर्गत इंटरनॅशनल लंडन कॉलेज येथे प्रशिक्षण प्राप्त केलेल्या 18 महिला या ब्यूटी शोमध्ये सहभागी झाल्या होत्या. इंटरनॅशनल या प्रशिक्षणाचे नियोजन नासिकच्या विनि कौर राजपूत यांनी केले. या सर्व महिला भारतातील विविध राज्यांमधुन सहभागी झाल्या होत्या. यामधे मीना सूर्यवंशी मध्य प्रदेश, तेजल जगदाळे गुजरात, रोहीनी ठोबे पुणे तर अर्चना म्हस्के, जागृती अव्हाड, दिव्या पाटील, वैष्णवी सोनवणे, कल्पना गरुड, वैशाली नाईक, रोहिणी संतोष ठुबे, प्राची तिवडे नासिक आदी महिलांचा समाव्ोश होता. नासिकच्या ज्योति कमलेश शिंदे यांनी ‘मिसेस इंटरनॅशनल क्लासिक…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी मालमत्ता कर हा महापालिका उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. तसेच सद्या मालमत्ता कराची आकारणी ज्या दराने केली जाते ते दर नगरपालिका अस्तित्वात असतांना २००१-०२ या वर्षात निश्चित करण्यात आले आहेत. त्यानंतर महानगरपालिकेची २१ मार्च २००३ साली स्थापना झाली. म्हणजेच २००१ ते २०२३ या २२ वर्षात मनपाच्या कर आकारणीच्या दरात आजपर्यंत कुठलाच बदल करण्यात आलेला नाही. तसेच कुठलीच दरवाढ २२ वर्षात करण्यात आलेली नाही. २०२१-२२ या वर्षात मालमत्तांचे सर्वेक्षण व संगणकीकरण करण्यात आले परंतु कर आकारणीच्या दरात कुठलाही बदल केला नाही, असे असताना सर्वेक्षण, नवीन मालमत्ता वाढ, क्षेत्रफळात वाढ, वापरात बदल इत्यादी कारणांमुळे मागणीमध्ये वाढ झालेली आहे. ३००…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी जिल्हाभरात प्रशासनाच्या कामात सुसूत्रता यावी, यासाठी सर्व विभागांचे २१ भाग केले असून एका वेळी चार विभागांची बैठक आयोजित करून त्य्ााच्या महिनाभरातील कामांचा आढावा घेतला जाणार आहे. त्यामुळे सर्वच कामांचा यातून पाठपुरावा करणे सुलभ होईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.जिल्हाधिऱ्यांनी पदभार घेऊन गुरूवारी एक महिना पूर्ण झाला. गेल्या महिनाभरात जिल्हाधिकाऱ्यांनी कुठली कामे केली. याचा लेखाजोखा सर्व विभाग प्रमुखांना बोलवून सादर केला. यावेळी कुपोषणाबाबत त्यांनी खबरदारीचे उपाययोजना करण्याचे विभाग प्रमुखांना आदेश देऊन दर आठवड्याला तपासणी करण्याचे आदेश दिले. जिल्ह्यात मूबलक खत साठा उपलब्ध जिल्ह्यात पूर्वीचा १८ हजार मेट्रिक टन खत साठा होता. बुधवारी ३ हजार मेट्रिक टन गुरुवारी…

Read More

साईमत, जळगाव ः प्रतिनिधी येथील काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलमध्ये गुरुवारी चांद्रयान ३ मोहीम यशस्वी झाल्यामुळे आनंद उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात प्राचार्य प्रविण सोनवणे व समन्वयिका स्वाती अहिरराव यांनी सहभाग घेतला होता. सर्वप्रथम इयत्ता तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी शाळेत रॅली काढली. विद्यार्थ्यांनी विविध घोषवाक्य तयार केले होते. रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी जल्लोषात घोषणा दिल्या. त्यानंतर शाळेच्या मैदानावर विद्यार्थांनी इस्त्रो (आयएसआरओ) या शब्दाचे मानवी संचालन केले. विद्यार्थी व शिक्षकांनी या आनंदोत्सवात उत्स्फूर्त सहभाग घेतला.

Read More

साईमत, पुणे : प्रतिनिधी यंदा जुलैत चांगला पाऊस झाला असला तरी ऑगस्टमध्ये हवा तसा पाऊस दिसत नाही. ऑगस्ट महिन्याच्या उर्वरित दिवसांमध्ये राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस असेल. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देखील परिस्थिती तशीच राहणार आहे. मात्र, सप्टेंबरच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात सरासरी पेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. ८ सप्टेंबरपासून २१ सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रात सरासरी इतका किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस बघायला मिळू शकतो. ऑगस्ट महिन्यात अपेक्षित पाऊस पडत नसल्याने नागरिक आणि शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मान्सून परतीच्या वाटेवर असेल तर, शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी वाढ होणार का, असा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे. मात्र, हवामान खात्याने परतीच्या पावसाबाबत…

Read More

साईमत, मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादीतून फुटून िंशदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झालेल्या अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांना शरद पवारांनी आपल्या परवानगीशिवाय त्यांचा फोटो न वापरण्याची ताकीद दिली होती. तरी देखील अजित पवार गटाकडून फोटो वापरण्यात येत होते. अखेर शरद पवार यांनी कोर्टात जाऊ , म्हटल्यावर शरद पवार यांचा फोटो फ्लेक्सवर न वापरण्याच्या सूचना अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना वरिष्ठ नेत्यांनी दिल्या आहेत. अजित पवारांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत फूट पडली आहे. फूट पडल्यानंतर सुरुवातीच्या काळात फोटोवरून शरद पवार गट आणि अजित पवार गटाचे नेते आमने-सामने आल्याचे दिसले. अजित पवार गटाकडून शरद पवार यांचा फोटो वापरला जात होता. शरद पवार हे आमचे दैवत…

Read More