Author: Saimat

साईमत, नवापूर-प्रतिनिधी जि.प.शाळा थुवा येथे रक्षाबंधन सणानिमित्त विद्यार्थ्यांनी स्वनिर्मित पर्यावरणपूरक राख्या तयार केल्या .त्यामध्ये सजावटीसाठी व्ोगव्ोगळ्या बियांचा वापर करून“ एक मुल एक झाड-एक राखी“ हा उपक्रम राबविण्यात आला. बियांचा वापर केल्यामुळे राखी पाण्यात विसर्जन केली किंवा इतर ठिकाणी पडल्यास बियांपासून वृक्षनिर्मिती होईल हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून राखी तयार करण्यात आली. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतः जे झाड लावले त्याच्या रक्षणाची जबाबदारी झाडाला राखी बांधून उचलली. त्यानंतर सर्व मुलींनी मुलांना राख्या बांधल्या मुलांनी मुलींना त्याबदल्यात भेट दिली. रक्षाबंधन सणाविषयी प्रतिज्ञा कविता पाटील यांनी स्वतः लिहून मुलांकडून म्हणून घेतली. या सर्व कार्यक्रमाला विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन कविता पाटील यांनी केले. व कार्यक्रमासाठी प्रेरणास्रोत म्हणून…

Read More

साईमत, नंदुरबार: प्रतिनिधी बहीण-भावाच्या नात्याचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राज्यातील महिला कर्मचाऱ्यांतर्फे जिल्ह्यातून हजारो राख्या पाठविण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन नंदुरबारने घेतला आहे. मुख्यमंत्र्यांना राखी पाठवीत ‘भाऊराया, जुनी पेन्शनच्या रूपाने ओवाळणी दे..!’ अशी साद महिला भगिनींनी घातली आहे. कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या जुन्या पेन्शनचा विषय मागील काळात चांगलाच गाजला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच सरकारी नोकरदार आक्रमक झालेले आहेत आणि सरकारला शेवटी आपली भूमिका सोडावी लागली व फॅमिली पेन्शन लागू करत जुन्या पेन्शनचा विषय सरकारने निकाली लावला. मात्र २००५ नंतर शासकीय सेव्ोत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शनचा प्रश्‍न महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या माध्यमातून रेटून…

Read More

साईमत, शिरपुर : प्रतिनिधी शहादा रस्त्यावर वरूळ शिवारात न्यु तारा पेट्रोल पंपाजवळ अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात वरुळ येथील २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी पहाटे घडली .याप्रकरणी शिरपुर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. कैलास आत्माराम मराठे (वय २५) रा. वरूळ ता. शिरपुर असे अपघातात मयत तरुणाचे नाव आहे. तालुक्यातील वरूळ येथे कैलास आत्माराम मराठे हा तरुण सोमवारी रात्री राहत्या घराच्या अंगणात झोपला होता. रात्री डासांचा त्रास होत असल्याने तो मंगळवारी पहाटे साडे तीन चार वाजेच्या सुमारास वडिलांना रस्त्यावर पायी फिरण्यासाठी उठून निघाला. याबाबत त्याने वडिलांना सांगितले आणि शिरपुर शहादा रस्त्यावरून पायी जात…

Read More

साईमत, शिरपुर : प्रतिनिधी तालुक्यातील सावळदे लगत तापी नदी पुलाववरून एका अनोळखी वृद्ध व्यक्तीने तापी नदीपात्रात उडी घेतल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. यावेळी प्रवाशांनी पुलावर गर्दी केली होती. तालुक्यातील सावळदे येथील तापी नदी पुलावर मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास तापी पुलावरून एका अनोळखी व्यक्तीने नदी पात्रात उडी घेतली. सदर वृध्दास उडी घेतांना काही प्रवाश्‍यांनी पाहिले. त्यामुळे त्यांनी थांबविण्याचे प्रयत्न केले मात्र पाण्यात पडल्यानंतर काही काळ वृद्ध पाण्यावर तंरगतांना आढळून आला.पण काही व्ोळाने पाण्यात बुडाल्याने त्याचा तपास लागू शकला नाही. पुलावरून काही नागरिकांनी ११२ या आपत्कालीन क्रमांकावर माहिती दिल्याने पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली मात्र वृद्धाबाबत काहीच माहिती मिळू शकली नाही.…

Read More

साईमत, नंदुरबार : प्रतिनिधी धडगाव तालुक्यातील चांदसैली माळ येथे महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती आणि मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २५ रोजी दुपारी महिलेने पती आणि मुलाकडून सतत होणाऱ्याला त्रासाला कंटाळून घरात गळफास घेत आत्महत्या केली होती.कांतीबाई ब्रिजलाल वळवी (४५) रा. चांदसैली माळ असे मयत महिलेचे नाव आहे. कांतीबाई यांचा पती ब्रिजलाल वळवी (५०) हा वर्षभरापासून दुसरा विवाह करावयाचा असल्याने छळ करत होता. पत्नी कांतीबाई हिने घर सोडून निघून जाव्ो, असे त्याचे म्हणणे होते. दरम्यान, मुलगा सोहम (२५) हादेखील महिलेला त्रास देत होता. यातून पती आणि मुलाकडून होणाऱ्या छळाला कंटाळून कांतीबाई वळवी यांनी २५ ऑगस्ट रोजी आत्महत्या केली होती.…

Read More

साईमत, शिंदखेडा: प्रतिनिधी नरडाणा उद्योग वाढीसाठी माजी मंत्री आमदार जयकुमार रावल हे सातत्याने प्रयत्न करीत आहेत. परंतु मागील काळात सिमेंट कंपन्यांमुळे या भागातील विहीरींना लालसर पाणी येत असल्याने शेतकऱ्यांनी रासायनिक कंपन्यांना विरोध केला आहे.भविष्यात या भागात कोणत्याही रासायनिक कंपन्यांनी उद्योग उभारू नयेत किंवा अशा त्रासदायक उद्योजकांना जागाच देवू नये, असा इशारा भाजपचे माजी तालुका अध्यक्ष नथा वारुळे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे. तालुक्यातील नरडाणा औद्योगिक वसाहतीत रासायनिक उद्योग उभारल्यास उद्योग मंत्र्यांचा पुतळा दहन करण्याचा इशारा भाजपचे माजी तालुकाध्यक्ष नथा वारुळे यांनी दिला आहे. नरडाणा औद्योगिक वसाहतीत शिंदखेडा तालुक्याची जमीन गेली आहे. उद्योग मंत्र्यांनी परस्पर कोणत्याही रासायनिक कंपनीला जागा दिलीच असेल तर…

Read More

साईमत, धुळे : प्रतिनिधी शहरातील ऐंशीफुटी रस्त्याची तत्काळ दुरूस्ती न केल्यास खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या घरासमोर उपोषण करण्याचा इशारा शिवसेनेतर्फे (उबाठा) देण्यात आला. खासदारांच्या घरासमोर निदर्शने करण्यात आली. अनेक वर्षापासून शहरातील ऐंशीफुटी रस्त्याची दुरावस्था झाली आहे. खासदार भामरे यांच्या निवासस्थानासमोरच खड्डे पडले आहे. पादचारी, वाहनधारकांना खड्ड्यांमुळे त्रास सहन करावा लागत आहे.पावसाळ्यात आणि इतरव्ोळीही खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचते. यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढतो. असे असतांना खासदारांना या रस्त्याची दुरुस्ती करावी, असे वाटत नाही का? असा प्रश्‍न निव्ोदनातून शिवसेनेचे माजी नगरसेवक पुरूषोत्तम जाधव, संदीप चौधरी, पंकज भारस्कर, आबा भडांगे आदींनी उपस्थित केला आहे.

Read More

साईमत, मालेगाव : प्रतिनिधी शिलेदार फाउंडेशन यांनी वडगाव येथील गरीब वस्तीत जाऊन तेथील महिलांना मदत व्हावी, या उद्देशाने अनोखे रक्षाबंधन साजरे केले. महिलांना साडी भेट देत, तेथील कुटुंबांना फरसाण, गोडधोडचे जेवण दिले. त्या कुटुंबातील महिलांना, त्यांच्या परिवाराला झालेला आनंद हाच शिलेदार फाउंडेशनकरिता प्रेरणादायी ठरला. रक्षाबंधन म्हणजे रक्षण आणि बंधन यांचा समन्वय होय. आपल्या हिंदू धर्मात या सणाला फार मोठे महत्त्व आहे. यात बहीण भावाला हाताच्या मनगटाला राखी बांधते अन्‌‍ आपले रक्षण करण्याचे वचन भावाकडून घेते. हाच धागा पकडत समाजातील तळागाळातील वंचित लोकांना मदत व्हावी, हा प्रामाणिक हेतू ठेवून ‘शिलेदार फाउंडेशन, मालेगाव जे ‘वसा कतृत्वाचा’ हे ब्रीद घेऊन आपल्या कमाईतून काही…

Read More

साईमत, नाशिक : प्रतिनिधी शहरातील६९ स्मार्ट शाळा दुपारच्या सत्रात भरवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. महापालिकेच्या शाळांच्या व्ोळेमध्ये सोमवारपासून बदल करण्यात आले आहेत. शाळांच्या व्ोळा सकाळच्या सत्रात करून दुपारनंतरचा संपूर्ण व्ोळ शिक्षकांना मोकळा मिळत असल्याने त्या व्ोळात शिक्षण देण्यासाठी उपयोग करता येणार असल्याने मनपा शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशाने सोमवारपासून शिक्षकांना दिवसभर आपली हजेरी शाळेत लावताना मोठी अडचण होताना दिसून आली. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसह गुणवत्तावाढीसाठी प्रयत्नाचा भाग म्हणून शिक्षणाधिकारी बापूसाहेब पाटील यांनी नवनवीन उपक्रम शाळांची राबवण्यास सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत सकाळी भरणाऱ्या शाळांमध्ये विद्यादान करताना शिक्षकांकडून हात अखडता घेतला जात असल्याच्या तक्रारी तसेच शाळांची तपासणी करताना व्ोळेची येत असलेली अडचण लक्षात घेऊन सकाळच्या सत्रात भरणाऱ्या…

Read More

साईमत, त्र्यंबकेश्‍वर : प्रतिनिधी कळमुस्ते (ता. त्र्यंबकेश्‍वर) शिवारातील डोंगरगाव-दुगारवाडी गावाजवळ दमणगंगा खोऱ्यातील 690. 10 दशलक्ष घनफूट पाणी पावसाळ्यात गोदावरी खोऱ्यात 13. 68 किलोमीटर लांबीच्या बोगद्याव्दारे वळविण्याच्या 494 कोटी 98 लाख रुपये खर्चाच्या प्रवाही वळण योजनेला जलसंपदा विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. तसेच पश्‍चिम वाहिनी नद्यांमधून अरबी समुद्रात वाहून जाणारे पाणी अडवून गोदावरी खोऱ्यात 29.29 दशलक्ष घनफूट पाणी आणण्यासाठी चिमणपाडी (ता. दिंडोरी) प्रवाही वळण योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. ही योजना 36 कोटी 40 लाख रुपयांची आहे. जनहित याचिकेच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयातील 23 प्रवाही योजनांमध्ये या दोन्ही प्रवाही वळण योजनांचा समाव्ोश आहे. राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीच्या 25 फेब्रुवारी 2021 आणि 4…

Read More