साईमत, प्रतिनिधी, जळगाव पिंप्राळा येथील मनपा क्षेत्रातील मुस्लिम कब्रस्तानमधील काँक्रिट पाथ-वेच्या पूर्ण झालेल्या कामाची आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी पाहणी केली. यावेळी सदरचे काम समाधानकारक केल्याचे आढळून आले. प्रभागातील नागरिकांनी आयुक्त डॉ. गायकवाड यांची भेट घेऊन काम चांगले केल्याबद्दल समाधान व्यक्त केली. तसेच गणपतीनगरातील आरसीसी गटार बांधकामाची देखील आयुक्तांनी यावेळी पाहणी केली. यावेळी परिसरातील नागरिकांनी रस्त्यांची कामे त्वरित करून मिळावीत, अशी मागणी आयुक्तांकडे केली.
Author: Saimat
साईमत, नाशिक : प्रतिनिधी शहरातील मोसम पूल सर्कलजवळ २७ ऑगस्टला टँकरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने अपघातात गंभीर जखमी झालेल्या अलोक जयस्वाल (वय १२) याचे रुग्णालयात उपचार सुरु असताना निधन झाले. अलोकच्या मृत्यूस प्रशासनाचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचा आरोप करत शहरातील विविध सामाजिक संघटनांनी बुधवारी (ता. ३०) सायंकाळी महात्मा गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करुन मनपा व पोलिस प्रशासनाचा तीव्र शब्दांत निषेध केला.मोसम पूल सर्कलजवळ टँकरने (एमएच ४१ एयु ५७९७) दुचाकीला (एमएच ४१ बीबी ११६९) पाठीमागून जबर धडक दिली. यात दुचाकीस्वार पिंटू विश्वनाथ यादव (वय ३८, रा. बलेसरा, बिहार, हल्ली रा. सोयगाव), बरखा जयस्वाल व त्यांचा पुतण्या अलोक जयस्वाल हे तिघे जबर जखमी…
साईमत, दिंडोरी : प्रतिनिधी तालुक्यातील महिलांसह तरुणांनी शिवसेना शिंदे गटात प्रव्ोश केला.शिंदे गटाचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी तालुक्यात शिवसेना निरीक्षक हेमंत पवार, संपर्कप्रमुख सुनील पाटील, जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, सहसंपर्क प्रमुख राजेंद्र सोनवणे, माजी आमदार धनराज महाले, सहकार नेते सुरेश डोखळे यांची दिंडोरी-पेठ विधानसभेची आढावा बैठक झाली. नगरपंचायत कार्यालय, शासकीय रुग्णालय व शहराच्या अनेक समस्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शिवसेना निरीक्षक हेमंत पवार यांच्यासमोर मांडल्या. संपर्कप्रमुख सुनील पाटील यांनी ग्रामीण भागातील अनेक प्रश्न बैठकीत मांडले. दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा, जेणेकरून तालुक्यातील सामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लागतील, अशी मागणी कार्यकर्त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे यांच्याकडे केली. तालुक्यातील अनेक महिला व तरुणांनी…
साईमत, नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात जुलै अखेरपर्यंत ७८ गुन्हे दाखल झाले. यात २५ पोस्को व विनयभंगाचे गुन्हे आहेत. कायद्याच्या अंमलबजावणीमुळे मुलांवरील लैंगिक गुन्ह्यांची नोंद करण्याचे प्रमाण वाढत आहे.यातील गुन्हे आणि खटले अजामिनपात्र असल्याने समाजात मोठ्या प्रमाणात प्रचार-प्रसार होणे काळाची गरज आहे. यामुळे विकृत व्यक्तींवर जरब बसेल.वाढत्या जागरूकतेमुळे अशा प्रकरणांची वाढ काळजीत टाकणारी आहे. ग्रामीण भागात शिक्षणाचा अभाव, कायद्याबद्दल माहिती नसणे अथवा काही संघटनांकडून दिशाभूल करणारी माहिती दिली जात असल्याने प्रभावी असणारा कायदा कुठे तरी मोडीत निघाला का, हे पाहणे गरजेचे आहे. शाळा, महाविद्यालय, चावड्यांवर, विविध सेवाभावी मंडळे यात शिक्षक किंवा समुपदेशकाला लैंगिक अत्याचार किंवा लैंगिक गुन्ह्याच्या कोणत्याही प्रकरणाची जाणीव झाल्यास,…
साईमत, नाशिक : प्रतिनिधी महापालिका आयुक्तांच्या बंगल्याला सध्या वास्तुदोषाने घेरले आहे. त्यामुळेच विद्यमान आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी बंगल्यात वास्तव्य न करता खासगी फ्लॅटमध्ये राहण्याचा निर्णय घेतल्याच्या चर्चेने राखी पौर्णिमेच्या दिवशी चर्चेला उधाण आले.मात्र, आयुक्तांनी वृत्ताचा इन्कार केला असून, वास्तुदोष वगैरे काही नाही. बंगल्यात दुरुस्ती करावयाची असल्याने खासगी फ्लॅट घेऊन राहत असल्याचा खुलासा केला. महापालिका आयुक्तांचा गडकरी चौकात असलेला बंगला पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे. या व्ोळेची चर्चा मात्र वास्तुदोषाची आहे. यापूर्वी आयुक्तांचा बंगला विविध कारणांमुळे चर्चेला उधाण आले आहे. कृष्णकांत घुगे आयुक्त असताना बंगल्यात चोरी झाली होती. भास्कर सानप आयुक्त असताना चोरांनी वरच्या मजल्यावर डल्ला मारला होता. अभिषेक कृष्णा…
साईमत, प्रतिनिधी, जळगाव जिल्ह्यासह परजिल्ह्यातून चोरीच्या दुचाकी आणून त्यांची विल्हेवाट लावणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला. या टोळीकडून चोरीच्या १६ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. शहरातील विविध पोलीस ठाण्यांत दुचाकी चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांचा छडा लावण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी पोलीस पथकाला दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक नेमून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गोपनीय माहितीनुसार सुनील भिल पिंप्रीसिम (ता.एरंडोल)येथील यांच्याकडे चोरीची दुचाकी असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विश्वासात घेत विचारपूस केली असता त्याने इतर चोरीच्या ३ दुचाकी…
साईमत, नाशिक : प्रतिनिधी महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी पेव्हर ब्लॉकचा उपयोग केला जात आहे. दोनच दिवसांनी हे पेव्हर ब्लॉक निखळत आहेत. यामुळे वाहनधारक त्रस्त असून अपघाताची शक्यता आहे. नाशिक-मुंबई महामार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. याच खड्ड्यांवरून मागील महिन्यात विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहावयास मिळाली होती.पालकमंत्री दादा भुसे यांनी तत्काळ खड्डे बुजविण्याचे आदेश दिले होते. मात्र, इगतपुरी येथील सिन्नर चौफुली, बोरटेंभे फाटा, पिंपरी फाटा येथे अजूनही खड्ड्यांचे साम्राज्य असून, वाहनचालकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने मंगळवारी महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी अक्षरश: पेव्हर ब्लॉकचा वापर केला जात आहे. हा केवळ…
साईमत, प्रतिनिधी, जळगाव भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद ही भारतामध्ये वैद्यकशास्त्रातील संशोधन आणि सहयोगाला उत्तेजन देणारी भारत सरकारची संस्था आहे. दरवर्षी 1500 वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शॉर्ट टर्म स्टुडंटशिप कार्यक्रम अंतर्गत संशोधन करण्याची संधी मिळते. या वर्षी ती संधी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या व महाविद्यालयाचा जनरल सेक्रेटरी असलेला वरुणराज नन्नवरे याला मिळाली आहे. यासाठी वरुणराजला फारमॅकोलॉजी विभागाचे प्राध्यापक डॉ. राहुल भावसार यांचे मार्गदर्शन लाभले. सुमारे 20 हजार प्रपोजलमधून केवळ 1 हजार एमबीबीएस विद्यार्थ्यांचे प्रपोजल निवडले जातात. गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील, हृदयरोगतज्ञ डॉ. वैभव पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.…
साईमत, प्रतिनिधी, जळगाव राष्ट्रीय हॉकी खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त श्रम साधना बॉम्बे ट्रस्ट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय खेळ दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाच्या भव्य अशा क्रीडांगणावर सर्व विद्यार्थी व प्राध्यापकांच्या उपस्थितीत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी. के. पटनाईकांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. राष्ट्रीय क्रीडादिननिमित्त तृतीय वर्ष संगणक विभागातील लिखित विजय चौधरी या विद्यार्थ्याचे राष्ट्रीय कराटे स्पर्धेत कुमेती या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक व तसेच काथा या प्रकारात सुवर्ण पदक प्राप्त केल्यबद्दल प्राचार्य डॉ.जी. के. पटनाईक यांनी कौतुक केले. या कार्यक्रमासाठी क्रीडा समिती प्रमुख डॉ.दिनेश पुरी, डॉ.एम हुसैन, डॉ.एम.पी. देशमुख, प्रा.एन.के. पाटील, प्रा. पी.डी. पाटील,…
साईमत, प्रतिनिधी, जळगाव येथील के.सी. ई.सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय-मू जे.(स्वायत्त) महाविद्यालय येथे शिक्षकांच्या सर्वांगीण विकासासाठी प्राध्यापक प्रबोधिनीची सालाबादप्रमाणे स्थापना होऊन त्याचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. याप्रसंगी उद्घाटक म्हणून ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे यांनी उद्घाटनपर भाषणात प्राध्यापक प्रबोधिनी म्हणजे शिक्षकांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारे हक्काचे व्यासपीठ आहे. अध्यापन करत असताना आनंददायी शिक्षण देत विद्यार्थांना सतत प्रोत्साहन देत असताना काय शिकायचे हे न सांगता कसे शिकायचे हे आपल्या अध्यापन कार्यातून विषद करणे अधिक महत्वपूर्ण आहे असे प्रतिपादन केले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.आर.बी.ठाकरे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक प्रबोधिनी समिती प्रमुख प्रा.मीनल…