Author: Saimat

साईमत,जळगाव, प्रतिनिधी  भावा-बहिणीचे पवित्र नाते म्हणून आपल्या संस्कृतीत साजरी होणारी श्रावण महिन्याची पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन होय. आज या पावन दिनी जळगाव शहरातील शेकडो भगिनींनी आमदार राजूमामा भोळे यांना शहरातील तेली मंगलकार्यालयात रक्षासूत्र बांधून यशासाठी आशीर्वाद दिले. यावेळी सुमारे 300 हून अधिक भगिनी उपस्थित होत्या.यावेळी राजूमामांनी भारतीय संस्कृतीचा पवित्र सण रक्षाबंधनाच्या सर्व भगिनींना शुभेच्छाही दिल्या. शहराचे आमदार राजूमामा भोळे यांच्यातर्फे बुधवारी सायंकाळी सेवाभाव जोपासून कार्य करणाऱ्या शहर महानगरपालिका दवाखाना विभागात कार्यरत कायम व एनयूएचएम कर्मचारी भगिनी, आशा वर्कर्स भगिनी तसेच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनींसाठी सामूहिक रक्षाबंधनाचा कार्यक्रम म्हणजेच ‘अतूट बंधन’ शहरातील छत्रपती शाहू महाराज रुग्णालयासमोरील तेली मंगल कार्यालयातील समाजरत्नअण्णासाहेब आर.टी.चौधरी…

Read More

साईमत, देऊर (जि.धुळे) : प्रतिनिधी तालुक्यातील नांद्रे शिवारात बिबट्याने दोन ठिकाणी हल्ला करून १४ शेळ्या व एक गाय ठार केली. तर, बिबट्याच्या हल्ल्यात पाच शेळ्या जखमी झाल्या. ही घटना मंगळवारी रात्री घडली. या घटनेत दोन्ही शेतकऱ्यांचे सुमारे दोन लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शेतकरी प्रेमचंद रघुनाथ पाटील यांनी शेतात नेहमीप्रमाणे शेळ्या वाड्यात बांधल्या होत्या. वाड्याला तारेचे कुंपण जाळी लावलेली होती. मात्र, मध्यरात्री बिबट्याने जाळी तोडून कुंपणाच्या वरून उडी मारली. बिबट्याने १४ शेळ्या जागीच फस्त केल्या आणि पाच शेळ्या जखमी केल्या. एका बकरीची किंमत पंधरा हजार रुपये असे एकूण दीड लाखाचे नुकसान शेतकऱ्याचे झाले आहे. अन्य दुसऱ्या घटनेत शेतकरी सुनील…

Read More

साईमत, जळगाव, प्रतिनिधी शहरातील नेरी नाका परिसरातील पांझरापोळ संस्थानच्या मैदानात पवित्र श्रावण महिन्यानिमित्त भव्य पाच दिवसीय संगीतमय शिव महापुराण कथेचे दुपारी 1.30 ते सायंकाळी 5:30 यादरम्यान आयोजन करण्यात आले असून आज दि. 31 ऑगस्टपासून कथेला सुरुवात होत आहे. कथेचे मुख्य संयोजक आमदार सुरेश दामू भोळे उर्फ राजूमामा यांच्यासह शिवमहापुराण समिती व दादाजी फाऊंडेशनतर्फे हा पवित्र संगीतमय शिव महापुराण कथा महोत्सव 4 सप्टेंबर 2023 पर्यंत साजरा होणार असल्याची माहिती आयोजन समितीचे प्रशासक विशाल सुरेश भोळे यांनी दिली. यानिमित्ताने बुधवारी सायंकाळी उत्तर प्रदेशातील श्रीधाम वृंदावन येथील आंतरराष्ट्रीय शिव कथाकार महामंडलेश्वर संत श्री बृजभूषणजी शास्त्रीजी यांचे शहरात आगमन झाले असता संपूर्ण भक्तीभावाने व…

Read More

साईमत, जळगाव ः प्रतिनिधी जल जीवन मिशनमध्ये देशपातळीवर घेण्यात आलेल्या सर्वेक्षणात जळगाव जिल्ह्याने ६३.६१ टक्के गुण प्राप्त करत राज्यात प्रथम क्रमांकावर झेप घेतली आहे. तर देशात ६१ वा क्रमांक आला आहे. जल जीवन मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील १४९२ गावांमधील ६ लाख ८० घरांमध्ये नळाद्वारे स्वच्छ पाणी पोहचले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘ हर घर नल हे जल’ संकल्पनेतून साकार झालेल्या जलजीवन मिशनने जिल्ह्यात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आकार घेतला आहे. जिल्ह्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामार्फत एकूण २६ योजना राबविल्या जात असून त्यासाठी ५२६ कोटी ५६ लाख रूपये खर्च करण्यात येत आहेत. जळगाव जिल्हा परिषदेतर्फे…

Read More

साईमत, नाशिक : प्रतिनिधी खानपान सेवा (केटरिंग) पुरविण्याच्या व्यवसायात जे पाणी वापरले जाते, त्याचे नमुने तपासून अनुकूल अहवाल देण्यासाठी दोन हजाराची लाच स्वीकारताना जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेतील वरिष्ठ अणूजीव सहायक वैभव सादिगले यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. तक्रारदाराच्या भावाच्या नावाने नोंदणी केलेली आणि अन्य तीन अशा चार संस्थांचा खानपान सेवा पुरविण्याचा व्यवसाय आहे. या चार संस्था खानपान सेव्ोत जे पाणी वापरतात,त्याचे चार नमुने तपासणीसाठी जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत आणले गेले होते. याव्ोळी वरिष्ठ अणूजीव सहायक सादिगले याने नमुन्यांचे अनुकूल अहवाल देण्याची तयारी दर्शविली, त्यासाठी शासकीय शुल्का व्यतिरिक्त प्रत्येक पाणी नमुन्याचे ५०० रुपये यानुसार चार नमुन्यांचे एकूण दोन हजार रुपये लाच…

Read More

साईमत, नवीदिल्ली ः वृत्तसंस्था आगामी लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडी आणि एनडीएकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. एनडीएकडून पुढील पंतप्रधान पदाचा चेहरा विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदीच असणार आहेत तर, इंडिया आघाडीतून पंतप्रधान पदासाठी राहुल गांधी यांचें नाव पुढे आले आहे. इंडिया आघाडी स्थापन झाल्यानंतर पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असणार,असा प्रश्न सातत्याने एनडीएतील घटकपक्षातून विचारला जात होता मात्र, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काही दिवसांपूर्वी ‌‘इंडिया’ आघाडीच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवार राहुल गांधी असतील अशी माहिती दिली. दरम्यान, इंडिया आघाडीत विविध विचारधारा असलेले अनेक पक्ष सामील आहेत. यामध्ये आम आदमी पक्षानेही सहभाग घेतला आहे. मुंबईत होणाऱ्या बैठकीच्या निमित्ताने आपच्या मुख्य प्रवया प्रियंंका कक्कर…

Read More

साईमत, नवीदिल्ली ः वृत्तसंस्था संसदीय कामकाजात व्यत्यय आणल्याच्या आणि देशाची बदनामी केल्याच्या आरोपाखाली काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांना तीन आठवड्यांपूर्वी लोकसभेतून निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर हे प्रकरण लोकसभेच्या विशेषाधिकार समितीकडे सोपवण्यात आले होते. विशेषाधिकार समिती याप्रकरणी निर्णय घेईपर्यंत चौधरी निलंबित राहतील असे त्याव्ोळी सांगण्यात आले होते. दरम्यान, लोकसभेच्या विशेषाधिकार समितीने अधीर रंजन चौधरी यांचे निलंबन रद्द केले आहे. हे निलंबन मागे घेण्याची शिफारस करणारा ठराव विशेषाधिकार समितीने मंजूर केला आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्याला मोठा दिलासा मिळाला आहे. संसदीय कामकाज मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे नेते प्रल्हाद जोशी यांनी १० ऑगस्ट रोजी संसदेच्या पावसाळी अधिव्ोशनादरम्यान अधीर रंजन चौधरी यांच्या…

Read More

साईमत, लखनऊ ः वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्यासाठी देशातील २६ विरोधी पक्षांनी एकत्र येऊन अर्थात इंडिया आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीमध्ये काँग्रेस, ठाकरे गट, तृणमूलसह अनेक मोठ्या व प्रमुख विरोधी पक्षांचाही समाव्ोश आहे. उत्तर प्रदेशमधील राजकीय सत्तासमीकरणे लोकसभा निवडणुकांसाठी महत्त्वाची ठरतात. त्यामुळे उत्तर प्रदेशमधून विरोधकांच्या आघाडीला किती पाठिंबा मिळतो? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमधील एक महत्त्वाचा विरोधी पक्ष असणाऱ्या बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी आता आपली भूमिका स्पष्ट करीत आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशमधील दुसरा प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या सपाने इंडिया आघाडीमध्ये समाविष्ट…

Read More

साईमत, मुंबई ः प्रतिनिधी इंडिया आघाडीची आज (३१ ऑगस्ट) मुंबईत बैठक होत आहे.या बैठकीत काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असणार, जागा वाटप कसे होणार,संयोजक कोण असणार या सर्व पार्श्वभूमीवर ही बैठक होत असल्याचे सांगितले जात आहे.दरम्यान आजच्या बैठकीत इंडिया आघाडीचा सामुहिक कार्यक्रम,संयोजकाची नियुक्ती याबाबतचा निर्णय होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.या बैठकीला देशभरातील २८ पक्षांचे नेते, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री हजेरी लावणार आहेत. या बैठकीची माहिती देण्याकरता महाविकास आघाडीकडून आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंना पंतप्रधान पदाच्या चेहऱ्याबाबत विचारणा करण्यात आली. त्याव्ोळी त्यांनी भाजपावर निशाणा साधला…

Read More

साईमत, धुळे: प्रतिनिधी देवपूर भागातील वडेल रोडवरील पोलीस कॉलनीत चोरट्यांनी बंद घर फोडून रोकड आणि दागिने लंपास केले. ही घटना मंगळवारी (ता. २९) सकाळी सातच्या सुमारास निदर्शनास आली.पोलीस कॉलनीत बांधकाम विभागात उपअभियंता राहुल बापू जाधव यांचे सद्गुरू कृपा नामक निवासस्थान आहे. राहूल जाधव यांची मुंबई येथे बदली झाली आहे. त्यामुळे रविवारी ते कुटुंबीयांसह मुंबई येथे गेले.रक्षाबंधन असल्याने त्यांची पत्नी नाशिकला माहेरी थांबली. बंद घराची संधी साधून चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून प्रव्ोश केला. कपाटाचा दरवाजा तोडून सोन्याचे दागिने आणि १२ ते १५ हजारांची रोकड लंपास केली. राहूल जाधव यांच्या शेजारील निवृत्त पोलिस विजय गुरव यांच्या लक्षात ही घरफोडी आली.…

Read More