Author: Saimat

साईमत, शिंदखेडा: प्रतिनिधी खानदेशात सरासरीच्या तुलनेत कमी पर्जन्यमान झाले आहे. पावसाने दीड महिन्यापासून ओढ घेतली आहे. त्यामुळे खरिपातील पिके धोक्यात आली आहेत. आता पाऊस झाला तरी पिकांना जीवनदान मिळेल, अशी शक्यता नाही.त्यामुळे खानदेशात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी माजी मंत्री तथा शिंदखेडा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबईत चर्चेव्ोळी केली. आ. रावल म्हणाले, की पावसाअभावी खरिपातील पिके हातची गेली आहेत. शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पावसाअभावी जलस्रोतांची पातळी खालावली आहे. त्यामुळे भाजीपाला व इतर लागवडीवर परिणाम झाला आहे. कापसाची वाढ खुंटली आहे. या सर्व स्थितीचा शेतीप्रधान खानदेशातील अर्थकारणावर विपरीत परिणाम होणार आहे. शिंदखेडा मतदारसंघात बहुतांश…

Read More

साईमत, शिंदखेडा ( प्रतिनिधी ) शिंदखेडा येथील एसएसव्हीपीएस महाविद्यालयात मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिवसाचे औचित्य साधत भव्य मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. प्रथम मान्यवरांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याव्ोळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुषार पाटील, शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पी.आय. दिपक पाटील, उप प्राचार्य डॉ. एस. व्ही. बोरसे, उपप्राचार्य डॉ. विशाल पवार, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य एस. टी. राऊळ, कार्यालयीन अधीक्षक राहुल पाटील, प्रा. आर. के. पवार, ग्रामीण रुग्णालयाचे समुपदेशक प्रशांत जाधव उपस्थित होते. स्पर्धेला हिरवा झेंडा पी.आय. दिपक पाटील यांनी दाखवला. स्पर्धेत स्पर्धकांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. यात प्रथम – कुणाल ईश्‍वरसिंग गिरासे -…

Read More

साईमत, शिंदखेडा : प्रतिनिधी ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा शिंदखेडातर्फे प्रशासकीय अधिकाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरी करण्यात आली. राज्य संघटक मेघा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम घेण्यात आला. ग्राहक पंचायत शिंदखेडा शाखेच्या वतीने संघटक नलिनी व्ोताळे व सदस्य छायाताई पवार यांनी शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील, नगर पंचयात मुख्याधिकारी प्रशांत बिडकर व उपस्थित सदस्यांना राखी बांधली. याव्ोळी जिल्हा संघटक प्रा.चंद्रकांत डागा, तालुका अध्यक्ष माजी प्राचार्य प्रदीप दीक्षित, अशोक राखेचा, जितेंद्र मेखे उपस्थित होते.

Read More

साईमत, नंदुरबार : प्रतिनिधी जिल्ह्यात 19 हजार 500 दिव्यांगांची नोंदणी झाली आहे, दिव्यांग कल्याण विभागामार्फत ‘दिव्यांगाच्या दारी’ अभियानात 7 सप्टेंबर 2023 रोजी दिव्यांग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती, जिल्हाधिकारी तथा दिव्यांग कल्याण अभियानाच्या अध्यक्ष मनीषा खत्री यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. ‘दिव्यांगाच्या दारी’ हे अभियान शासनाच्या राज्यस्तरीय समितीचे अध्यक्ष तथा मुख्य मार्गदर्शक आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून या अभियानाचा एक भाग म्हणून श्री. छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, नंदुरबार येथे 7 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता आयोजित केल्या जाणाऱ्या या मेळाव्यात महसूल, पंचायत समिती, नगरपालिका, सामाजिक न्याय विभाग, सर्व शासकीय महामंडळे, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र,…

Read More

साईमत, नवापूर : प्रतिनिधी पोलीस बांधव हेच खरे रक्षक असून आज खरा दिवस रक्षा करणाऱ्या पोलीस बांधवांचा आहे. आमच्या सुरक्षेसाठी सदोदीत तत्पर असणारे आमचे हे बांधव, 24 तास आमच्या सर्वांच्या रक्षणासाठी झटणारे पोलिस बांधव यांना राखी बांधताना आनंद होत आहे, असे प्रतिपादन दिपांजली गावीत यांनी केले. मातोश्री बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून नवापुर पोलीस स्टेशन येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम राबविण्यात आला. याव्ोळी मातोश्री बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा दिपांजली गावीत व संस्थेच्या पदाधिकारी महिला उपस्थित होत्या. याप्रसंगी पोलीस निरिक्षक ज्ञानेश्‍वर वारे, उपनिरीक्षक मनोज पाटील, जगदीश सोनवणे, अ.स.ई युवराज परदेशी संपुर्ण पोलिस प्रशासन उपस्थित होते. दिपांजली गावीत यांनी सर्व पोलीस बांधवांचा सर्वप्रथम शाल व पुष्प देऊन…

Read More

साईमत, नंदुरबार : प्रतिनिधी नंदुरबार शहर व परिसरातील खेड्यांमधील वाढते शहरीकरण, लोकसंख्या व गेल्या तीन वर्षांपासून झालेल्या कमी पर्जन्यमानामुळे नंदुरबार शहर, आसपासच्या ग्रामीण क्षेत्राला पाणी पुरवठा करणाऱ्या विरचक धरणातील पाणी पातळीत सातत्याने घट होत असल्याने, नंदुरबार शहरासाठी तापी नदीवरून स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेचा आराखडा तात्काळ सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच वर्षभरात या योजनेला मंजूरी घेऊन नंदुरबारवासीयांना बारमाही, 24 तास पाणी देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती, राज्याचे आदिवासी विकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली आहे. ते या संदर्भात नंदुरबार शासकीय विश्रामगृहात बोलत होते. याव्ोळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित व संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित…

Read More

साईमत, नाशिक : प्रतिनिधी सासरच्या मंडळींनी 15 लाखांची मागणी करत विवाहितेचा शारीरिक, मानसिक छळ तसेच, आयटी कंपनी असल्याचे भासवून विवाहास प्रवृत्त केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भद्रकाली पोलिस ठाण्यात पती, सासू- सासरे आणि नणंद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. विवाहितेचा 9 मार्च 2022 ला धार्मिक पद्धतीने थाटामाटात विवाह झाला होता.मुलाची स्वतःची आयटी कंपनी असल्याचे सांगितले होते. प्रत्यक्षात कंपनी बंद असून पतीचे विवाहापूर्वी प्रेमसंबंध आणि विवाहानंतर संबंध असल्याचे उघड झाले. विवाहास 7 ते 8 दिवस उलटत नाही तोच सासू- सासरे आणि पतीने नवीन व्यवसायासाठी पंधरा लाखांची मागणी केली. विवाहात अधिक खर्च झाल्याने विवाहितेने रक्कम आणण्यास नकार दिला. त्यानंतर सासऱ्यांनी मुलीच्या वडीलास…

Read More

साईमत, नाशिक : प्रतिनिधी शहरासह जिल्ह्यातील अपघातांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्याचे सातत्याने दिसून येत असून अपघातांची मालिका सुरूच आहे. शहरातील अंबड लिंकरोडवर पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली असून एका महिलेला जीव गमवावा लागला आहे. येथील रस्त्याच्या दुरावस्थेमुळे दोन दिवसांत दोन अपघाती मृत्यू झाल्याने स्थानिकांसह वाहनचालकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. नाशिकचा सातपूर अंबड-लिंक रोड खड्डे आणि अपघातांच्या घटनेमुळे सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. सोमवारी सकाळी खड्डा चुकवण्याच्या नादात एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलेली असतांनाच सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी दुपारी याच रस्त्यावर पुन्हा अपघात घडला. ट्रकच्या मागच्या चाकाखाली येऊन पूनम नितीन चव्हाण या महिलेचा मृत्यू झाला आहे. अपघाताची…

Read More

साईमत, नाशिक : प्रतिनिधी तब्बल ९०९ कोटींच्या तोट्यात सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचा बँकिंग परवाना रद्द करण्याची प्रक्रिया थांबविण्यासाठी जिल्हा बँकेने सर्वंकष आराखडा तयार करावा आणि राज्य सरकारने भाग भांडवलाबाबत हमी देऊन प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले आहेत. बँकेला नाबार्डने बँकिंग परवाना रद्द करण्याबाबत सूचित करण्याविषयीची अंतिम नोटीस पाठवली आहे. या पार्श्‍वभूमीवर, सत्ताधाऱ्यांनी बँकेवर कारवाई होऊ नये म्हणून धडपड सुरू केली आहे. निश्‍चलनीकरणापासून जिल्हा बँक अडचणीत सापडली आहे. बँकेच्या समस्यांवर मंत्रालयातील सहकार मंत्र्यांच्या दालनात बैठक पार पडली याव्ोळी पालकमंत्री दादा भुसे, राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्यासह सहकार विभागाचे अधिकारी उपस्थित होते. अडचणीत असलेल्या नाशिक…

Read More

साईमत, नांदगाव : प्रतिनिधी पावसाची ओढ, पिकांवर पडलेली कीड आणि होणारा खर्च पाहून पानेवाडी (ता. नांदगाव) येथील निराश झालेल्या शेतकऱ्याने सोयाबीनच्या उभ्या पिकात रोटाव्ोटर फिरवला. पेरलेल्या पिकामुळे कर्जबाजारी होण्याची व्ोळ आली असल्याचे सांगत शेतकऱ्याने हे पाऊल उचलले. पानेवाडी( ता. नांदगाव) येथील शेतकरी दगू कातकडे यांनी आपल्या दोन एकर शेतात सोयाबीनची पेरणी केली होती. पिकाची योग्य ती काळजी घेतली होती. पीक जोमात होते. परंतु पिकावर रोग पडल्याने फवारणी करावी लागली. पिकांवर आलेल्या किडीचा बंदोबस्त करण्यासाठी महागडी कीडनाशक घेऊन फवारणी केली. मात्र काही दिवसापासून पावसाने ओढ दिल्याने पीक येते की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. इतका खर्च करूनही सोयाबीन पिकाला पाहिजे…

Read More