Author: Saimat

साईमत, नाशिक : प्रतिनिधी सासरच्या मंडळींनी 15 लाखांची मागणी करत विवाहितेचा शारीरिक, मानसिक छळ तसेच, आयटी कंपनी असल्याचे भासवून विवाहास प्रवृत्त केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भद्रकाली पोलिस ठाण्यात पती, सासू- सासरे आणि नणंद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. विवाहितेचा 9 मार्च 2022 ला धार्मिक पद्धतीने थाटामाटात विवाह झाला होता.मुलाची स्वतःची आयटी कंपनी असल्याचे सांगितले होते. प्रत्यक्षात कंपनी बंद असून पतीचे विवाहापूर्वी प्रेमसंबंध आणि विवाहानंतर संबंध असल्याचे उघड झाले. विवाहास 7 ते 8 दिवस उलटत नाही तोच सासू- सासरे आणि पतीने नवीन व्यवसायासाठी पंधरा लाखांची मागणी केली. विवाहात अधिक खर्च झाल्याने विवाहितेने रक्कम आणण्यास नकार दिला. त्यानंतर सासऱ्यांनी मुलीच्या वडीलास…

Read More

साईमत, नाशिक : प्रतिनिधी शहरासह जिल्ह्यातील अपघातांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्याचे सातत्याने दिसून येत असून अपघातांची मालिका सुरूच आहे. शहरातील अंबड लिंकरोडवर पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली असून एका महिलेला जीव गमवावा लागला आहे. येथील रस्त्याच्या दुरावस्थेमुळे दोन दिवसांत दोन अपघाती मृत्यू झाल्याने स्थानिकांसह वाहनचालकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. नाशिकचा सातपूर अंबड-लिंक रोड खड्डे आणि अपघातांच्या घटनेमुळे सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. सोमवारी सकाळी खड्डा चुकवण्याच्या नादात एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलेली असतांनाच सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी दुपारी याच रस्त्यावर पुन्हा अपघात घडला. ट्रकच्या मागच्या चाकाखाली येऊन पूनम नितीन चव्हाण या महिलेचा मृत्यू झाला आहे. अपघाताची…

Read More

साईमत, नाशिक : प्रतिनिधी तब्बल ९०९ कोटींच्या तोट्यात सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचा बँकिंग परवाना रद्द करण्याची प्रक्रिया थांबविण्यासाठी जिल्हा बँकेने सर्वंकष आराखडा तयार करावा आणि राज्य सरकारने भाग भांडवलाबाबत हमी देऊन प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले आहेत. बँकेला नाबार्डने बँकिंग परवाना रद्द करण्याबाबत सूचित करण्याविषयीची अंतिम नोटीस पाठवली आहे. या पार्श्‍वभूमीवर, सत्ताधाऱ्यांनी बँकेवर कारवाई होऊ नये म्हणून धडपड सुरू केली आहे. निश्‍चलनीकरणापासून जिल्हा बँक अडचणीत सापडली आहे. बँकेच्या समस्यांवर मंत्रालयातील सहकार मंत्र्यांच्या दालनात बैठक पार पडली याव्ोळी पालकमंत्री दादा भुसे, राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्यासह सहकार विभागाचे अधिकारी उपस्थित होते. अडचणीत असलेल्या नाशिक…

Read More

साईमत, नांदगाव : प्रतिनिधी पावसाची ओढ, पिकांवर पडलेली कीड आणि होणारा खर्च पाहून पानेवाडी (ता. नांदगाव) येथील निराश झालेल्या शेतकऱ्याने सोयाबीनच्या उभ्या पिकात रोटाव्ोटर फिरवला. पेरलेल्या पिकामुळे कर्जबाजारी होण्याची व्ोळ आली असल्याचे सांगत शेतकऱ्याने हे पाऊल उचलले. पानेवाडी( ता. नांदगाव) येथील शेतकरी दगू कातकडे यांनी आपल्या दोन एकर शेतात सोयाबीनची पेरणी केली होती. पिकाची योग्य ती काळजी घेतली होती. पीक जोमात होते. परंतु पिकावर रोग पडल्याने फवारणी करावी लागली. पिकांवर आलेल्या किडीचा बंदोबस्त करण्यासाठी महागडी कीडनाशक घेऊन फवारणी केली. मात्र काही दिवसापासून पावसाने ओढ दिल्याने पीक येते की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. इतका खर्च करूनही सोयाबीन पिकाला पाहिजे…

Read More

साईमत, प्रतिनिधी, जळगाव  पिंप्राळा येथील मनपा क्षेत्रातील मुस्लिम कब्रस्तानमधील काँक्रिट पाथ-वेच्या पूर्ण झालेल्या कामाची आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी पाहणी केली. यावेळी सदरचे काम समाधानकारक केल्याचे आढळून आले. प्रभागातील नागरिकांनी आयुक्त डॉ. गायकवाड यांची भेट घेऊन काम चांगले केल्याबद्दल समाधान व्यक्त केली. तसेच गणपतीनगरातील आरसीसी गटार बांधकामाची देखील आयुक्तांनी यावेळी पाहणी केली. यावेळी परिसरातील नागरिकांनी रस्त्यांची कामे त्वरित करून मिळावीत, अशी मागणी आयुक्तांकडे केली.

Read More

साईमत, नाशिक : प्रतिनिधी शहरातील मोसम पूल सर्कलजवळ २७ ऑगस्टला टँकरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने अपघातात गंभीर जखमी झालेल्या अलोक जयस्वाल (वय १२) याचे रुग्णालयात उपचार सुरु असताना निधन झाले. अलोकच्या मृत्यूस प्रशासनाचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचा आरोप करत शहरातील विविध सामाजिक संघटनांनी बुधवारी (ता. ३०) सायंकाळी महात्मा गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करुन मनपा व पोलिस प्रशासनाचा तीव्र शब्दांत निषेध केला.मोसम पूल सर्कलजवळ टँकरने (एमएच ४१ एयु ५७९७) दुचाकीला (एमएच ४१ बीबी ११६९) पाठीमागून जबर धडक दिली. यात दुचाकीस्वार पिंटू विश्‍वनाथ यादव (वय ३८, रा. बलेसरा, बिहार, हल्ली रा. सोयगाव), बरखा जयस्वाल व त्यांचा पुतण्या अलोक जयस्वाल हे तिघे जबर जखमी…

Read More

साईमत, दिंडोरी : प्रतिनिधी तालुक्यातील महिलांसह तरुणांनी शिवसेना शिंदे गटात प्रव्ोश केला.शिंदे गटाचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी तालुक्यात शिवसेना निरीक्षक हेमंत पवार, संपर्कप्रमुख सुनील पाटील, जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, सहसंपर्क प्रमुख राजेंद्र सोनवणे, माजी आमदार धनराज महाले, सहकार नेते सुरेश डोखळे यांची दिंडोरी-पेठ विधानसभेची आढावा बैठक झाली. नगरपंचायत कार्यालय, शासकीय रुग्णालय व शहराच्या अनेक समस्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शिवसेना निरीक्षक हेमंत पवार यांच्यासमोर मांडल्या. संपर्कप्रमुख सुनील पाटील यांनी ग्रामीण भागातील अनेक प्रश्‍न बैठकीत मांडले. दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा, जेणेकरून तालुक्यातील सामान्य जनतेचे प्रश्‍न मार्गी लागतील, अशी मागणी कार्यकर्त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे यांच्याकडे केली. तालुक्यातील अनेक महिला व तरुणांनी…

Read More

साईमत, नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात जुलै अखेरपर्यंत ७८ गुन्हे दाखल झाले. यात २५ पोस्को व विनयभंगाचे गुन्हे आहेत. कायद्याच्या अंमलबजावणीमुळे मुलांवरील लैंगिक गुन्ह्यांची नोंद करण्याचे प्रमाण वाढत आहे.यातील गुन्हे आणि खटले अजामिनपात्र असल्याने समाजात मोठ्या प्रमाणात प्रचार-प्रसार होणे काळाची गरज आहे. यामुळे विकृत व्यक्तींवर जरब बसेल.वाढत्या जागरूकतेमुळे अशा प्रकरणांची वाढ काळजीत टाकणारी आहे. ग्रामीण भागात शिक्षणाचा अभाव, कायद्याबद्दल माहिती नसणे अथवा काही संघटनांकडून दिशाभूल करणारी माहिती दिली जात असल्याने प्रभावी असणारा कायदा कुठे तरी मोडीत निघाला का, हे पाहणे गरजेचे आहे. शाळा, महाविद्यालय, चावड्यांवर, विविध सेवाभावी मंडळे यात शिक्षक किंवा समुपदेशकाला लैंगिक अत्याचार किंवा लैंगिक गुन्ह्याच्या कोणत्याही प्रकरणाची जाणीव झाल्यास,…

Read More

साईमत, नाशिक : प्रतिनिधी महापालिका आयुक्तांच्या बंगल्याला सध्या वास्तुदोषाने घेरले आहे. त्यामुळेच विद्यमान आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी बंगल्यात वास्तव्य न करता खासगी फ्लॅटमध्ये राहण्याचा निर्णय घेतल्याच्या चर्चेने राखी पौर्णिमेच्या दिवशी चर्चेला उधाण आले.मात्र, आयुक्तांनी वृत्ताचा इन्कार केला असून, वास्तुदोष वगैरे काही नाही. बंगल्यात दुरुस्ती करावयाची असल्याने खासगी फ्लॅट घेऊन राहत असल्याचा खुलासा केला. महापालिका आयुक्तांचा गडकरी चौकात असलेला बंगला पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे. या व्ोळेची चर्चा मात्र वास्तुदोषाची आहे. यापूर्वी आयुक्तांचा बंगला विविध कारणांमुळे चर्चेला उधाण आले आहे. कृष्णकांत घुगे आयुक्त असताना बंगल्यात चोरी झाली होती. भास्कर सानप आयुक्त असताना चोरांनी वरच्या मजल्यावर डल्ला मारला होता. अभिषेक कृष्णा…

Read More

साईमत, प्रतिनिधी, जळगाव  जिल्ह्यासह परजिल्ह्यातून चोरीच्या दुचाकी आणून त्यांची विल्हेवाट लावणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला. या टोळीकडून चोरीच्या १६ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. शहरातील विविध पोलीस ठाण्यांत दुचाकी चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांचा छडा लावण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी पोलीस पथकाला दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक नेमून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गोपनीय माहितीनुसार सुनील भिल पिंप्रीसिम (ता.एरंडोल)येथील यांच्याकडे चोरीची दुचाकी असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विश्वासात घेत विचारपूस केली असता त्याने इतर चोरीच्या ३ दुचाकी…

Read More