साईमत, दिंडोरी : प्रतिनिधी
तालुक्यातील महिलांसह तरुणांनी शिवसेना शिंदे गटात प्रव्ोश केला.शिंदे गटाचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी तालुक्यात शिवसेना निरीक्षक हेमंत पवार, संपर्कप्रमुख सुनील पाटील, जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, सहसंपर्क प्रमुख राजेंद्र सोनवणे, माजी आमदार धनराज महाले, सहकार नेते सुरेश डोखळे यांची दिंडोरी-पेठ विधानसभेची आढावा बैठक झाली.
नगरपंचायत कार्यालय, शासकीय रुग्णालय व शहराच्या अनेक समस्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शिवसेना निरीक्षक हेमंत पवार यांच्यासमोर मांडल्या. संपर्कप्रमुख सुनील पाटील यांनी ग्रामीण भागातील अनेक प्रश्न बैठकीत मांडले. दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा, जेणेकरून तालुक्यातील सामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लागतील, अशी मागणी कार्यकर्त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे यांच्याकडे केली.
तालुक्यातील अनेक महिला व तरुणांनी शिवसेना तालुकाप्रमुख किशोर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष प्रव्ोश केला. यात ननाशीच्या समाजसेविका कल्पना वाघमारे, भारती गोडे, मंगल जाधव, मैना वाघमारे, चंद्रकला शिंगाडे, जिजा पारधी, लता वाघमारे, नंदा बोके, अश्विनी शिंगाडे, ताई शार्दुल, तारा शिंगाडे, लक्ष्मी जाधव, सुशीला वाघमारे, पुष्पा पवार, मीरा डंबाळे, भारपुष्पा यशवंत पवार, पुष्पा शेवरे, जयश्री शेखरे, हिरा तांदळे, आरती जाधव, माधुरी वाघमारे, रत्नमाला शिंगाडे आदींचा समाव्ोश होता. आकाश ढगे, विशाल ढगे, प्रथमेश भोसले, नितीन जाधव, यश जाधव, अमोल खुर्दळ, रोहित चव्हाण, अनिकेत जाधव, रोशन जाधव, हर्शल कुंभाडे, जगदीश मालसाने, शुभम मालसाने, देवेंद्र जाधव यांनी युवासेनेत प्रव्ोश केला.